Vada Sambar Marathi Recipe | वडा सांबर रेसिपी मराठी 

Vada Sambar Marathi Recipe

Vada Sambar Marathi Recipe

Vada Sambar Marathi Recipe साऊथ इंडियन खाद्यपदार्थ हे आपल्या टेस्ट आणि शुद्धतेसाठी खूपच लोकप्रिय आहेत. इडली सांबर, मसाला डोसा, उत्तप्पा, अप्पे, उपमा, वडा सांबर, मेदू वडा, अप्पम असे अनेक स्वादिष्ट खाद्यपदार्थ आपल्याकडे सगळेजण खूपच आवडीने खातात.

हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी खूप चांगले तर असतातच आणि पचण्यासाठीही अतिशय हलके असतात त्यामुळे अनेकांची हे खाण्यासाठी पसंती असते.

पुन्हा पुन्हा आपल्याला हे पदार्थ खावेसे वाटतात. पण नेहमी नेहमी बाहेर खाणं शक्य होत नाही. तसेच वारंवार बाहेरचं खाणं हे आपल्या तब्येतीसाठीही चांगलं नाही त्यामुळे हे सर्व पदार्थ घरीच बनवणं योग्य आहे.

आज आपण साऊथ इंडियन पद्धतीचं अत्यंत टेस्टी Vada Sambar Marathi Recipe वडा सांबर घरच्याघरी बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. ही वडा सांबर रेसिपी बनवण्यासाठी खूपच सोपी आहे आणि टेस्टमधेही अगदी बाहेरच्यासारखीच बनते.

वडा सांबर बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

आपल्या घरात जर ४ ते ५ व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी वडा सांबर बनवण्यासाठी आपण खालीलप्रमाणे साहित्य घेणार आहोत.

या रेसिपीमध्ये वडा आणि सांबर हे दोन पदार्थ वेगवेगळे बनवावे लागतात. या दोन पदार्थांसाठी लागणारं साहित्यही वेगवेगळं आहे. 

वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

  • 2 ग्लास उडीद डाळ
  • अर्धी वाटी तांदूळ
  • अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ
  • अर्धा चमचा सोडा
  • 1 चमचा जिरे
  • 1 चमचा ओवा
  • थोडीशी कोथिंबीर
  • चवीप्रमाणे मीठ
  • तेल

सांबर बनवण्यासाठी लागणारं साहित्य :

  • 1 वाटी तूरडाळ
  • चिंच
  • गूळ
  • 2 ते 4 शेवग्याच्या शेंगा
  • 1 छोटासा बारीक चिरलेला दुधी भोपळा
  • 4 ते 5 वाळलेल्या लाल मिरच्या
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1 बारीक चिरलेला टोमॅटो
  • 1 चमचा लाल तिखट
  • 1 चमचा काश्मिरी लाल तिखट
  • 2 चमचे सांबर मसाला
  • 1 चमचा कसुरी मेथी
  • 2 पळ्या तेल
  • आल्या लसणाची पेस्ट
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा मोहरी
  • चवीनुसार मीठ

हिरवी कोकोनट चटणीसाठी लागणारं साहित्य :

  • 1 वाटी किसलेलं ओलं खोबरे
  • अर्धी वाटी डाळ्या
  • 2 ते 3 हिरव्या मिरच्या
  • 5 ते 6 चमचे दही
  • 1 चमचा साखर
  • 7 ते 8 पुदिन्याची पानं
  • थोडीशी कोथिंबीर
  • 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या

Our Vada Sambar Marathi Recipe Is Ready To Go ….

Procedure For Vada Sambar Marathi Recipe | वडा सांबर बनवण्याची कृती :

वडा बनवण्याची कृती :

1. उडीद डाळ, हरभरा डाळ आणि तांदूळ हे सर्व एकत्र 2 – 3 तास पाण्यात बुडवून एका पातेल्यात भिजवून ठेवायचे. 3 तासानंतर एका चाळणीच्या साहाय्याने त्यातील पाणी काढून घ्यायचं.

2. मग हे उरलेलं मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात बारीक दळून घ्यायचं. त्यात थोडंसं पाणी टाकायचं कारण वड्यासाठी आपल्याला घट्ट असं मिश्रण लागतं.

3. सगळं पीठ तयार करून घ्यायचं. मग त्यात अर्धा चमचा सोडा, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ टाकायचं. आता आपलं वड्याचं पीठ तयार आहे.

4. बारीक चिरलेली कोथिंबीर या पिठात टाकावी. हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हातावर किंवा चहाच्या चाळणीवर थोडंसं पीठ घेऊन गोल आकाराचा वडा तयार करायचा आणि त्यात गोल आकाराचं एक होल करायचं आणि आपला वडा तेलात तळून घ्यायचा.

5. असेच बाकीचे वडेसुद्धा तेलात लालसर तळून घ्यायचे. आपले सर्व वडे तयार आहेत.

वडा बनवण्याची कृती
वडा बनवण्याची कृती

सांबर बनवण्याची कृती :

1. एका कुकरमध्ये एक वाटी तूरडाळ टाकायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. पुन्हा त्यात एक ग्लास पाणी टाकायचं. अर्धा चमचा हळद टाकायची.

2. दुधी भोपळा छिलून घ्यायचा आणि त्याचे बारीक काप करायचे आणि डाळीमध्ये शिजायला टाकायचे. कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आता आपली डाळ शिजवून झालीय.

https://faktyojana.com/veg-manchurian-recipe-in-marathi/

3. सर्वात आधी गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर त्यात जिरे, मोहरी टाकायची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या. कांदा लालसर झाल्यानंतर आल्या लसणाची पेस्ट टाकायची. बारीक चिरलेला टोमॅटो तेलात फ्राय करायचा.

4. यानंतर 1 चमचा कसुरी मेथी, 2 चमचे सांबर मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मिरी लाल तिखट हे सगळं फ्राय केलेल्या मसल्यामध्ये टाकायचं.

5. आता हे सगळं मिश्रण फ्राय करायचं. यानंतर उकडलेली तूरडाळ छान हलवून घ्यायची आणि फ्राय केलेल्या मिश्रणामध्ये टाकून द्यायची. त्यानंतर उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा त्या वरणात टाकायच्या. आता या वरणाला गॅसवर 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर उकळू द्यायचं आहे. अशाप्रकारे आपलं सांबर तयार आहे.

6. आता सांबरवर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान गारनिशिंग करायची.

आपलं टेस्टी वडा आणि सांबर दोन्हीही तयार आहे. एका प्लेटमध्ये वडे घ्या आणि त्यावर सांबर टाकून ही प्लेट तुम्ही सर्व्ह करू शकता.

सांबर बनवण्याची कृती
सांबर बनवण्याची कृती

कोकोनट चटणी बनवण्याची कृती :

कोणत्याही पदार्थासोबत चटणी असेल तर त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते. अशीच हिरवी कोकोनट चटणी वडा सांबरसोबत दिली जाते. साऊथ इंडियन जेवणात कोकोनट चटणीला खूप महत्त्व आहे. आज आपण हीच कोकोनट चटणीसुद्धा बनवणार आहोत.

1. 1 वाटी किसलेलं खोबरे मिक्सरमध्ये टाकायचं आणि डाळ्या टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं.

2. यानंतर मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, जिरे, लसूण , चवीनुसार मीठ, 2- 3 चमचे दही, 1 चमचा साखर मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं.

3. आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं. त्यात जिरे मोहरी टाकायची आणि ही फोडणी चटणीत टाकायची. अशाप्रकारे आपली कोकोनट चटणी तयार आहे.

तुम्ही ही हिरवी कोकोनट चटणी Vada Sambar Marathi Recipe वडा सांबरसोबत सर्व्ह करू शकता. या चटणीमुळे खाण्याची मजा आणखीनच वाढेल.

Important Tips For Vada Sambar Marathi Recipe | वडा सांबर रेसिपी बनवण्यासाठी महत्वाच्या टिप्स 

1. आपण जर उडदाच्या डाळीत तांदूळ भिजत टाकले तर आपले वडा क्रिस्पी बनतो.

2. आपण जर वड्याचं पीठ रात्री दळून ठेवलं तर ते सकाळपर्यंत खूप छान फुगतं आणि आपले वडेसुद्धा खूप छान एकदम स्पंजी बनतात.

3. सांबर हे तूर डाळ, दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो, लाल मिरच्या, चिंच, गूळ अशा अनेक भाज्या आणि खूप साऱ्या मसाल्यांपासून बनतं. सांबर हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

4. सांबर आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या टाकलेल्या असतात. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. सांबर खाल्ल्याने आपल्या शरीरात अन्नाचे पचन सुधारते. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडांची मजबूती वाढते.

5. घरी बनवलेलं Vada Sambar Marathi Recipe वडा सांबर हे नेहमीच उत्तम असतं. कारण घरच्या जेवणात आपण चांगल्या भाज्या, तेल, मसाले आणि डाळ वापरतो. स्वच्छतादेखील चांगलीच ठेवतो पण बाहेर कोणी स्वच्छतेकडे लक्ष देत नाही त्यामुळे आपलं आरोग्य बिघडू शकतं. भाज्या आणि दुसऱ्या वस्तूदेखील चांगल्या वापरल्या जात नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेता घरी बनवलेलं अन्न नेहमी चांगलं असतं. घरी आपण बजेटमध्ये सगळं बनवू शकतो पण बाहेर पैसे जास्त खर्च होतात.

6. सांबर हे साऊथ इंडियन जेवणात नेहमी असतंच. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतात. सांबर खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते. सांबर खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात.

7. सांबर खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यातून आपल्या शरीराला प्रोटीन, फायबरसारखे घटकद्रव्ये मिळतात पण कोणत्याही पदार्थाचं जास्त सेवन करणं हे चांगलं नसतं त्यामुळे योग्य प्रमाणातच सांबर खावं. रोज सांबर खाणं टाळावं.

FAQ About Vada Sambar Marathi Recipe | काही महत्त्वाचे प्रश्न :

१. Vada Sambar Marathi Recipe वडा सांबर हा कुठला पारंपरिक खाद्यपदार्थ आहे ?

वडा सांबर ही लोकप्रिय साऊथ इंडियन डिश आहे. वडा सांबर खासकरून नाश्त्यासाठी खाल्ला जातो. पचण्यासाठी खूपच हलका आणि अतिशय स्वादिष्ट असा हा पदार्थ आहे. सगळेजण खूपच आवडीने वडा सांबर खातात.

२. वडा सांबर कशापासून बनवला जातो ?

वडा सांबर ही खूपच स्वादिष्ट रेसिपी आहे. यामध्ये वडा आणि सांबर असतो. वडा हा उडद डाळीपासून बनवलेला असतो तर सांबर हे तूर डाळ आणि भाज्यांपासून बनवले जाते.

३. Vada Sambar Marathi Recipe आरोग्यासाठी चांगलं आहे का ?

वडा सांबर खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. पण त्यात फॅट असतात त्यामुळे ते मध्यम प्रमाणात खाणं योग्य आहे.

४. वडा सांबर अगदी बाहेरच्यासारखा बनण्यासाठी कोणता मसाला वापरावा ?

वडा सांबरमध्ये तुम्ही मार्केटमध्ये मिळणारा तयार मसाला वापरू शकता त्यामुळे अगदी बाहेरच्यासारखी टेस्ट येईल पण जर तुम्हाला बाहेरचा मसाला नको असेल तर तुम्ही घरचा मसालासुद्धा वापरू शकता.

५. वडा सांबर खाल्ल्याने वजन वाढते का ?

वडा सांबर खूपच हेल्दी जेवण आहे. सांबर खाल्ल्याने आपलं वजन कमी होण्यास मदत होते. हे खूप हलकं अन्न मानलं जातं त्यामुळे तुम्ही मनभरून वडा सांबर खाऊ शकता.

Vada Sambar Marathi Recipe खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यातून आपल्या शरीराला प्रोटीन, फायबरसारखे घटकद्रव्ये मिळतात पण कोणत्याही पदार्थाचं जास्त सेवन करणं हे चांगलं नसतं त्यामुळे योग्य प्रमाणातच सांबर खावं. रोज सांबर खाणं टाळावं.

अशा प्रकारे आपलं अतिशय टेस्टी Vada Sambar Marathi Recipe वडा सांबर तयार आहे. अगदी बाहेर रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये मिळणाऱ्या वडा सांबरसारखंच टेस्टी वडा सांबर आपण बनवलं आहे. वडा सांबर खूपच टेस्टी आणि पचण्यास हलकं जेवण आहे त्यामुळे आपण मन भरून खाऊ शकतो. तुमच्या कुटुंबातील सर्वांना ही रेसिपी नक्कीच आवडेल यात शंका नाही. सर्वांचं पोट भरेल पण मन भरणार नाही अशी Vada Sambar Marathi Recipe ही रेसिपी आहे. सगळे तुमचं खूपच मनापासून कौतुक करतील.

अशाच नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी वेबसाईटला नक्कीच फॉलो करा. तुमचे खूप खूप धन्यवाद.

Scroll to Top