Parents And Son Marathi Sad Story “आई बाबा मला या महिन्याचे पैसे मिळालेत, पण मला एवढ्या पैशांची गरज नव्हती. कारण मी येथे एक छोटासा जॉब करतोय. कॉलेजच्या लायब्ररीत काम करतोय. मी त्यातून माझा खर्च भागवेल. तुम्ही कशाला इतका जास्त भार स्वतःवर घेताय ? हे पैसे तुमच्याकडेच ठेवा किंवा पुढच्या महिन्यापासून कमी पैसे पाठवत जा. त्यातून भागेल माझं.
आणि तुम्ही या पैशांचा वापर मला फोन करण्यासाठी करत जा. किती दिवस झाले तुमचा आवाज नाही ऐकला मी. Parents And Son Marathi Sad Story आता येथे अमेरिकेमध्ये कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. आपण स्काइपसारख्या एप्लीकेशनवर ऑनलाईन व्हिडिओ कॉलही करू शकतो. पण तुमच्याकडे कॉम्प्युटर नाहीये ना. त्यामुळे तुम्हाला पाहता येत नाहीये. पण कमीत कमी तुमचा आवाज ऐकला तर बरं वाटेल. आई बाबा पाहता पाहता चार वर्षे झालीत, मी तुमचा आवाजही ऐकलेला नाहीये. तुम्ही फक्त मनी ऑर्डर पाठवता, पत्र पाठवता, पण तुमचा आवाज ऐकायची खूप इच्छा आहे. प्लिज एक कॉल करा ना मला.”
Parents And Son Marathi Sad Story
अमेरिकेत शिकत असलेला गौतम त्याच्या आई-बाबांना पत्र लिहीत होता. मागील चार वर्षांपासून तो अमेरिकेत शिकत होता. गौतमची घरची परिस्थिती खूप गरीबीची होती. बाबा रिक्षा चालवायचे, तर आई चार घरची धुणी भांडी करायची. परंतु गौतम हा लहानपणापासूनचं खूप हुशार होता. संपूर्ण शाळेत त्याचा पहिला नंबर यायचा.
आयुष्यात Parents And Son Marathi Sad Story खूप मोठ व्हायचं, काहीतरी करून दाखवायचं, असं गौतमने ठरवलं होतं. त्यामुळे विदेशात शिक्षण घेण्यासाठी तो आला होता. स्कॉलरशिप आणि अनेक लोकांची मदत घेऊन तो इथपर्यंत पोहोचला होता. मागील चार वर्षापासून अमेरिकेत शिकत असतानाही त्याने खूप चांगले मार्क्स मिळवले होते. आता त्याला खूप मोठ्या पगाराची नोकरीही मिळणार होती. आपल्याला नोकरी मिळाली की, आई बाबालाही येथेच अमेरिकेत राहायला घेऊन यायचं, असं त्याने ठरवलं होतं.
अमेरिकेला गेल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने आई बाबा त्याला फोन करायचे. परंतु त्यानंतर त्यांनी फोन करण कमी केलं आणि फक्त पत्रचं पाठवत होते. त्यांनी कारण दिलं की, फोन करायला खूप पैसे लागतात आणि आमच्याकडे एवढे पैसे नाहीयेत. Parents And Son Marathi Sad Story त्यापेक्षा पत्रात बोललेलं बरं. त्यामुळे मागील साडेतीन वर्षापासून गौतमने आई-बाबाचा आवाजही ऐकला नव्हता.
Marathi Sad Story
पंधरा दिवसानंतर आई-बाबांचं पत्र गौतमला अमेरिकेत मिळतं. गौतम खूप खुश होतो आणि पत्र वाचू लागतो. तर यात आई बाबांनी लिहिलेलं असतं, “ठीक आहे गौतम, Parents And Son Marathi Sad Story तुला पुढच्या वेळेस जास्त पैसे नाही पाठवणार. परंतु फोन कशाला करायचा, त्यामध्ये पैसेच वाया जातात ना आणि तुझं ते काय कॉम्प्युटर सुद्धा आमच्याकडे नाहीये. आता तुला फक्त एक वर्ष राहिलंय ना, तू लवकर परत ये. त्यानंतर समोरासमोरचं भेट होईल आपली. आवाज ऐकून तरी काय फायदा ?”
आई बाबांचं हे उत्तर वाचून गौतमला विचित्र वाटतं. परंतु त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून भारतात परत जायचं, अस तो ठरवतो Parents And Son Marathi Sad Story आणि एक एक दिवस मोजू लागतो. पाहता पाहता एक वर्ष उलटून जातं. गौतम त्याच्या शेवटच्या परीक्षेत खूप चांगल्या मार्काने पास होतो .त्याला एक मोठ्या पगाराची नोकरीही लागते. परंतु जॉइनिंग आधी तो भारतात काही दिवसांसाठी यायचं ठरवतो, आई-बाबांना भेटण्यासाठी.
Marathi Emotional Story
गौतम आई-बाबांना सरप्राईज द्यायचं ठरवतो आणि भारतात परत येतो. भारतात उतरल्यानंतर त्याला खूप आनंद झालेला असतो. तो रिक्षा पकडतो आणि घराकडे यायला निघतो. तो चाळीत पोहोचतो. Parents And Son Marathi Sad Story कोणालाही न भेटता सर्वात आधी तो त्याच्या घरी येतो आणि दरवाजा वाजवतो, काही क्षणानंतर दरवाजा उघडतो. परंतु त्याच्यासमोर त्याचे आई-बाबा नसतात, तर एक वेगळाच माणूस उभा असतो. तो विचारतो, “कोण हवय तुम्हाला ?”
गौतम दचकतो आणि म्हणतो, “माझे आई-बाबा येथे राहायचे ना. तुम्ही कोण आहात ?” हा माणूस म्हणतो, “आम्ही मागील चार वर्षांपासून येथे राहतोय. तू कोण आहेस, आम्हाला माहित नाही आणि तुझ्या आई बाबाबद्दलही माहित नाही. उगाच टाइमपास करू नको.” Parents And Son Marathi Sad Story असं म्हणून हा माणूस दरवाजा बंद करून घेतो. गौतमला काही कळतचं नाही की, हे काय चाललंय ? आपलं आई बाबा कुठे गेले आहेत.
गौतम खाली उतरतो आणि चाळीतील कट्ट्यावर येऊन बसतो. तो विचार करू लागतो, आई बाबांनी घर बदललं, याबद्दल काही सांगितलं नाही. आता ते कोठे राहत असतील ? त्यांचा फोन नंबर आपल्याकडे नाहीये. Parents And Son Marathi Sad Story तेवढ्यात गौतमच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवतं. गौतम मागे वळून पाहतो, तर त्याच्या वडिलांचे बेस्ट फ्रेंड सुनील काका असतात.
सुनील काकांना पाहून गौतम खूप खुश होतो आणि म्हणतो, “काका मी आई बाबांना भेटायला पाच वर्षांनी परत आलोय आणि आई-बाबा घरी नाहीयेत. दुसरेच कोणीतरी आहेत. काय चाललय मला तर काहीच कळत नाहीये.” सुनील म्हणतो, “गौतम नको काळजी करू, Parents And Son Marathi Sad Story चल माझ्याबरोबर. गौतम विचारतो, “आई-बाबा कुठे राहताय, तुम्हाला माहितीये का ? चला मग.” असं म्हणून तो बॅग उचलतो. सुनील गौतमला घरी घेऊन येतो.
सुनीलची बायको कावेरी येते. गौतमला पाहून तिलाही खूप आनंद होतो. गौतम या दोघांच्या पाया पडतो आणि म्हणतो, Parents And Son Marathi Sad Story “आता तरी सांगा कोठे आहेत आई बाबा ?” हे ऐकून कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती आतमध्ये निघून जाते. गौतम विचारतो, “काकूला काय झालं काका ?”
सुनील म्हणतो, “मी तुला आता तुझ्या आई बाबांबद्दल जे सांगणार आहे ना, ते मन घट्ट करून ऐक.” हे ऐकून गौतमलाही मोठा धक्काचं बसतो. गौतम विचारतो, “काका असं काय बोलताय ? काय झालं आहे ? बाबां Parents And Son Marathi Sad Story आजारी आहेत का ? की दुसरा काही प्रॉब्लेम झालाय ? सांगा ना मला. आता पैशांची काळजी करायची काही गरज नाही. मला खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळालीये अमेरिकेत. मी काही दिवसानंतर त्यांना अमेरिकेला घेऊनही जाईल.”
सुनील काकाच्या डोळ्यातही पाणी येतं आणि ते म्हणतात,”गौतम आता ते शक्य नाहीये. कारण अमेरिकेत न्यायला तुझे आई बाबा या जगात नाहीये, देवा घरी गेले ते.” Parents And Son Marathi Sad Story गौतमच्या पायाखालची जमीनचं सरकते. त्याच्या कानावर जे शब्द पडलेले असतात, त्यावर त्याचा विश्वासचं बसत नाही. गौतमच्या तोंडून एक शब्दही फुटत नाही. तो फक्त आश्चर्याने काकांकडे पाहत असतो.
सुनील म्हणतो, “गौतम मला माहितीये, तुझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. तुला हे सत्य पचवता येत नाहीये. परंतु हे खरं आहे. आता मी जे काही सांगतोय, Parents And Son Marathi Sad Story ते सगळं शांतपणे ऐकून घे. पाच वर्षांपूर्वी तू अमेरिकेला गेला, त्यानंतर पुढील सहा महिने तुझे आई बाबा तुला नित्यनियमाने दर महिन्याला पैसे पाठवत होते. परंतु तुझा अमेरिकेसारख्या मोठ्या देशातील खर्च भागवण त्यांना खूप जड जात होतं.
महादेवाच्या मंदिराबाहेर आईला सोडून आला मुलगा आणि सून
त्यामुळे तुझ्या बाबांनी रात्रंदिवस रिक्षा चालवायला सुरुवात केली. दिवसाचे 22-22 तास रिक्षा चालवत होते ते. त्यांची तब्येत खूप बिघडत चालली होती. Parents And Son Marathi Sad Story दुसरीकडे तुझी आईसुद्धा खूप काम करायची. लोकांची धुनी भांडी करण्या बरोबरचं तिने स्वयंपाकाचं कामही सुरू केलं होतं. टिफिन सुद्धा ती पोहोचवायची. त्यातच एक दिवस रात्री रिक्षा चालवत असताना एका मोठ्या गाडीवरशी तुझ्या बाबांच्या रिक्षाचा एक्सीडेंट झाला आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर काही तासांत ते गेले.”
गौतम हे सगळं स्तब्धपणे ऐकत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. सुनील काका सांगतात, “तुझे Parents And Son Marathi Sad Story बाबा हे जग सोडून गेले, हा धक्का तुझ्या आईला सहन नाही झाला आणि त्यांच्या मृतदेहावर डोकं ठेवून तुझ्या आईने हंबरडा फोडला, तो शेवटचा आणि तीही देवाघरी गेली. एकाचं दिवशी तू अनाथ झाला. तुझे आई बाबा हे दोघेही जग सोडून गेले.
गौतम ढसाढसा रडू लागतो आणि म्हणतो, “काका हे काय Parents And Son Marathi Sad Story बोलताय तुम्ही आणि हे सगळं पाच वर्षांपूर्वी झालं, तर मग मला का नाही कळलं ? तुम्ही मला का अंधारात ठेवलं ?”
सुनील म्हणतो, “बेटा, जेव्हा तुझे बाबा त्यांच्या शेवटच्या घटका मोजत होते, त्यांनी मला बोलावलं होतं आणि म्हणाले की, गौतम अमेरिकेला आहे. जर त्याला समजलं, मी या जगात नाहीये. तर कदाचित तो तेथील शिक्षण सोडून भारतात परत येईल.Parents And Son Marathi Sad Story पण मला त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं हवंय. तो मोठा माणूस बनला पाहिजे. त्यामुळे त्याला कधी सांगू नको, मी या जगात नाहीये. Parents And Son Marathi Sad Story जेव्हा तो शिक्षण पूर्ण करून भारतात येईल ना, तेव्हाच त्याला सत्य समजलं पाहिजे. तुझ्या बाबांनी जाता जाता माझ्याकडून हेच वचन घेतलं होतं.
तुझे आई बाबा गेल्यानंतर तुला सत्य कळू द्यायचं नाही, असं आम्ही दोघांनी ठरवलं. आम्ही दोघेच तुला त्यांच्या नावाने पत्र पाठवायचो, तुला सत्य कळू नये, म्हणून तुझ्याशी कधी फोनवर बोललो ही नाही.” गौतमवर दुःखांचा डोंगर कोसळलेला असतो. हा त्याच्यासाठी Parents And Son Marathi Sad Story खूप मोठा धक्का असतो. गौतम खूप रडत असतो. सुनील त्याला रडू देतो, त्याचं मन मोकळ करू देतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी गौतम त्याची बॅग भरतो. सुनीलं विचारतो, “कुठे चाललास गौतम ?” गौतम म्हणतो, “काका आता येथे राहून तरी काय करू, जातो मी अमेरिकेत परत. कुठेतरी मन रमावं लागेल ना. Parents And Son Marathi Sad Story आई-बाबा नाहीयेत ही कल्पनाच मला सहन होत नाहीये.” सुनील म्हणतो, “खरं बोलतोयस तू. नको राहू येथे. येथे राहिला तर दुःखी होशील. तेथे कामात मन जमलं, तर बरं वाटेल तुला.”
गौतम सुनीलच्या पायावर डोकं ठेवतो आणि म्हणतो, “तुम्ही खूप महान आहात. माझ्या बाबांनी तुमच्याकडून एक वचन मागितलं आणि त्यासाठी मागील Parents And Son Marathi Sad Story साडेचार वर्षांपासून तुम्ही हे सगळं करताय. आपलं रक्ताचा नातं नाहीये, परंतु तुम्ही माणुसकीच्या नात्याने माझ्यासाठी जे केलंय, ते मी कधीही विसरणार नाही.”
सुनील म्हणतो, “तुझा बाप माझा बेस्ट फ्रेंड होता आणि मैत्रीचं नातं याला तर म्हणतात. मित्र संकटात असला, मित्राने एखाद वचन मागितलं, मग प्राण गेला तरी बेहत्तर तर पण ते पूर्ण करायचं असतं. मित्राला Parents And Son Marathi Sad Story मदत करायची असते. मी कधी हा विचार केलाच नाही की, तू माझ्या मित्राचा मुलगा आहे. माझाच मुलगा अमेरिकेत शिकतोय आणि त्याला पैसे पाठवायचेत, त्याला धीर द्यायचा आहे, हिम्मत द्यायची आहे, असा विचार करूनच मी हे सगळं केलं.
गौतमच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो सुनीलला घट्ट मिठी मारतो. कावेरी काकूलाही नमस्कार करून तो घराबाहेर पडतो. तो पुन्हा एकदा त्या खोलीबाहेर येतो, जेथे Parents And Son Marathi Sad Story त्याचं संपूर्ण बालपण गेलं होतं. जेथे त्याचे बाबा शेवटपर्यंत राहत होते. तो दरवाजा वाजवतो. एक माणूस दरवाजा उघडतो. गौतम काही बोलणार एवढ्यात हा माणूस म्हणतो, “काही नको बोलूस. सुनीलने सगळं सांगितलं आम्हाला. ये आत.”
गौतम खोलीमध्ये येतो. तर येथे सगळं बदललेलं असतं. पण त्याच्या डोळ्यासमोर पाच वर्षांपूर्वीची तीच खोली येते. जेथे त्याचे आईबाप असतात. जेथे तो शेवटचा दिवस राहिलेला असतो. जेथे तो लहानपणापासून आई-बाबांच्या अंगा खांद्यावर खेळलेला असतो. गौतम या खोलीला डोळे भरून पाहतो, त्याच्या पानावलेल्या डोळ्यांनी आणि निरोप घेऊन तेथून निघून जातो.
त्यानंतर गौतम पुन्हा कधीही भारतात येत नाही. परंतु खूप मोठा माणूस झाल्यानंतर तो अशी एक सेवाभावी संस्था तयार करतो, जेथे गोरगरिबांची मुलं विदेशात जाऊन शिकू शकतात आणि त्यांचा खर्च भागवण्यासाठी Parents And Son Marathi Sad Story आई बापाला स्वतःच्या जीवावर उदार होऊन जास्त काम करण्याची गरज पडणार नाही. आई बाबांसाठी हीच योग्य श्रद्धांजली आहे, असं त्याला वाटतं.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !