Senior Citizen Savings Scheme
Senior Citizen Savings Scheme केंद्र सरकार वेळोवेळी देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असतं. यामध्ये काही बचत योजना असतात. आज आपण अशाचं एक सरकारी बचत योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या सरकारी बचत योजनेचे नाव आहे वरिष्ठ नागरिक बचत योजना. या योजनेला इंग्रजीत Senior Citizen Savings Scheme असंही म्हणतात.
नावाप्रमाणे ही योजना सरकारने वरिष्ठ नागरिकांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मग ही वरिष्ठ नागरिक बचत योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेत किती गुंतवणूक करता येते ? या गुंतवणुकीवर परतावा किती मिळतो ?Senior Citizen Savings Scheme योजनेच्या अटी काय आहेत ? कागदपत्र काय काय लागतात ? या योजनेअंतर्गत अकाउंट कसे उघडायचं, आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.
वरिष्ठ नागरिक बचत योजनेची वैशिष्ट्ये
ही एक सरकारी छोटी बचत योजना असून 60 वर्षांवरील नागरिक सरकारी / प्रायव्हेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेअंतर्गत अकाउंट उघडून गुंतवणूक करू शकतात आणि या गुंतवणुकीवर त्यांना परतावा मिळतो. ही एक सरकारी बचत योजना असल्यामुळे परतावा हा कोणत्याही जोखमीशिवाय मिळू शकतो.
अनेक वरिष्ठ नागरिक हे वयाच्या 60 वर्षानंतर रिटायरमेंट होतात. तेव्हा त्यांना रिटायरमेंटवर एकरकमी मोठी रक्कम मिळते. अशावेळेस ही रक्कम गुंतवायची कोठे ? हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. या प्रश्नावरचं तोडगा म्हणून केंद्र सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेकदा वरिष्ठ नागरिक शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये त्यांच्या आयुष्यभराची कमाई गुंतवतात आणि अशा स्कीममध्ये खूप जोखीम असते. या योजनांमधून मोठ्या प्रमाणात परतावा मिळू शकतो. परंतु त्याचबरोबर त्यांची आयुष्यभर जमा केली रक्कम बाजारात बुडूही शकते.
म्हणूनचं अनेक वरिष्ठ नागरिक रिस्क फ्री गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करत असतात. जिथे त्यांच्या आयुष्यभराची कमाई रिटायरमेंटनंतर गुंतवता येईल. त्यांना परतावाही चांगला मिळेल, त्याचबरोबर बाजारातील कोणत्याही घडामोडींचा गुंतवणुकीवर फरक पडणार नाही.
हेही वाचा : Atal Pension Yojana 2024|अटल पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती
सेवानिवृत्तीनंतर मिळालेली एकरकमी मोठी रक्कम वरिष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवून वरिष्ठ नागरिक चांगला परतावा मिळवू शकतात.
या योजनेत तुम्ही जी रक्कम गुंतवता, त्या जखमेवर दर तीन महिन्यांनी मिळालेलं व्याज तुमच्या अकाउंटवर जमा केलं जातं, म्हणजेचं वरिष्ठ नागरिकांसाठी ही एक पेन्शन योजनासुद्धा आहे.
वरिष्ठ नागरिक बचत योजनेत जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. परंतु ही रक्कम 30 लाखांपर्यंतही वाढवता येते. जर तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नी बरोबर जॉईंट अकाउंट उघडलं तर हा डबल बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो.
(Senior Citizen Savings Scheme) वरिष्ठ नागरिक बचत योजनेच्या अटी
1) साठ वर्षे पूर्ण झालेले नागरिक वरिष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत सरकारी बँक, प्रायव्हेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकतात.
2) 55 ते 60 वर्ष वय असलेले वरिष्ठ नागरिक ज्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीमचा उपयोग केला आहे, ते सुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकता.
3) जे रक्षा कर्मचारी 50 ते 60 या वयामध्ये निवृत्त झाले आहेत. ते सुद्धा या योजनेत रक्कम गुंतवू शकता, पण निवृत्त झाल्याच्या तीन दिवसातचं त्यांनी या योजनेत सहभागी व्हायला हवं.
4) Senior Citizen Savings Scheme योजनेत कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त 15 लाख रुपये रक्कम गुंतवता येते.
5) या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड पाच वर्षांचा आहे. जो तुम्ही एकदाचं तीन वर्षही वाढवू शकतात. म्हणजे जास्तीत जास्त आठ वर्ष तुम्ही या योजनेत एकरकमी पैसे गुंतवू शकता.
6) मॅच्युरिटी पीरियड पूर्ण होण्याआधीही तुम्ही या योजनेतून पैसे काढू शकता. परंतु त्यासाठी काही नियम अटी अटी आहेत. जसं की, एक वर्षाच्या आत जर तुम्हाला या योजनेतून पैसे काढायचे, असतील तर तुम्हाला जमा रकमेवर कोणतंही व्याज मिळणार नाही.
7) एक वर्षानंतर जर तुम्हाला या योजनेतून पैसे काढायचे असतील, तर तुम्हाला जमा रकमेच्या दीड टक्के दंड भरावा लागेल.
वरिष्ठ नागरिक बचत योजनेसाठी अकाउंट कसे उघडावं
या Senior Citizen Savings Scheme योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही सरकारी बँक, प्रायव्हेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करू शकता.
त्यासाठी सदर बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागेल आणि नियमानुसार कागदपत्र जमा करावी लागतील. त्यानंतर तुम्ही 1 हजार रुपये कमीत कमी ते जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
वरिष्ठ नागरिक बचत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या Senior Citizen Savings Scheme योजनेत सहभागी होण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्र आवश्यक आहेत.
1) अर्जदाराचं आधार कार्ड
2) अर्जदाराचं पॅन कार्ड
3) अर्जदाराचा वयाचा दाखला
4) अर्जदाराचे पासपोर्ट फोटो
5) अर्जदार मोबाईल नंबर
वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर आयकर सूट
या Senior Citizen Savings Scheme योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कलम 80 C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची बचत करता येते.
परंतु या योजनेवर तुम्हाला जे व्याज मिळेल, त्या व्याजावर मात्र तुम्हाला टीडीएस भरावा लागेल.
अकाउंट होल्डरचा मृत्यू झाल्यास नियम
या Senior Citizen Savings Scheme योजनेशी निगडित लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास फॉर्ममध्ये नमूद केल्याप्रमाणे वारसाला ही रक्कम ट्रान्सफर केली जाते आणि अकाउंट बंद केलं जातं.
Senior Citizen Saving Scheme Benefits
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम म्हणजेचं वरिष्ठ नागरिक बचत योजना भारत सरकारद्वारे सुरू केलेली खूपचं लोकप्रिय योजना आहे. वरिष्ठ नागरिक या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.
1) अनेक वरिष्ठ नागरिकांना रिटायरमेंटनंतर मोठी रक्कम मिळते. ती रक्कम घरात ठेवणं शक्य नसतं. अशावेळेस अनेक वरिष्ठ नागरिक ही रक्कम गुंतवण्याचा विचार करतात आणि भारत सरकार द्वारे सुरू केलेली ही सीनियर सिटीजन सेविंग स्कीम म्हणजेचं वरिष्ठ नागरिक बचत योजना त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
2) (Senior Citizen Savings Scheme) वरिष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत सध्या 8.2% व्याजदर मिळतं आणि कोणत्याही बँकेच्या एफडीपेक्षा किंवा सरकारी बचत योजनेपेक्षा सर्वाधिक मिळणार हे व्याजदर आहे.
3) या योजनेअंतर्गत पैसे गुंतवल्यामुळे उच्च व्याजदर तर मिळतंच, त्याचबरोबर आयकरात सूटही मिळते. म्हणजेचं गुंतवणूकदारांचा डबल फायदा होतो.
4) वरिष्ठ नागरिकांना पुन्हा पुन्हा बँकेत जाणं किंवा बँकेच्या खेपा मारणं, हे अवघड असतं. परंतु वरिष्ठ नागरिक बचत योजनेचं अकाउंट उघडणं खूपच सोपं आहे. अनेक बँका तर घरी येऊन ही सुविधा उपलब्ध करून देतात.
5) इतर अनेक सरकारी योजनांमध्ये किंवा एफडीमध्ये जे व्याज मिळतं ते तुमच्या अकाउंटवर जमा होत असतं. मूळ रक्कम वाढत असते आणि मॅच्युरिटीनंतर ही रक्कम तुम्हाला दिली जाते. परंतु वरिष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये तुमच्या मूळ रकमेवर मिळणारे व्याज दर तीन महिन्याला तुमच्या अकाउंटवर जमा केलं जातं. म्हणजे ती एक प्रकारची पेन्शनचं तुम्हाला मिळते.
FAQ About Senior Citizen Saving Schemes | सीनियर सिटीजन सेविंग स्कीम्सबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : Senior Citizen Savings Scheme योजनेत कोण सहभागी होऊ शकतं ?
उत्तर : ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते या योजनेत सहभागी होऊ शकतात, गुंतवणूक करू शकतात.
2) प्रश्न : वरिष्ठ नागरिक बचत योजनेत किती रक्कम गुंतवता येते ?
उत्तर : या योजनेत एक वरिष्ठ नागरिक जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवू शकतो.
3) प्रश्न : Senior Citizen Savings Scheme योजनेत गुंतवलेल्या रकमेवर किती व्याज मिळतं ?
उत्तर : या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 8.2% व्याजदर सध्या मिळते. या व्याजात सरकार बदल करू शकतं.
4) प्रश्न : वरिष्ठ नागरिक बचत योजना सुरक्षित आहे का ?
उत्तर : होय, वरिष्ठ नागरिक बचत योजना सुरक्षित आहे. कारण ही एक सरकारी छोटी बचत योजना आहे.
5) प्रश्न : वरिष्ठ नागरिक बचत योजनेत जॉईंट अकाउंट उघडता येतं का ?
उत्तर : होय, या Senior Citizen Savings Scheme योजनेअंतर्गत जॉइंट अकाउंट उघडता येते आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येईल.
एकूणचं वरिष्ठ नागरिक बचत योजनेने (Senior Citizen Savings Scheme) रिटायर झालेल्या वरिष्ठ नागरिकांचा एक खूप मोठा प्रश्न सोडवला आहे. रिटायरमेंटनंतर मिळालेल्या रकमेचं काय करायचं ? गुंतवणूक कोठे करायची ? हा खूप मोठा प्रश्न वरिष्ठ नागरिकांसमोर होता.
पण आता भारत सरकारनेचं सीनियर सिटीजन सेविंग स्कीम म्हणजेचं वरिष्ठ नागरिक बचत योजना सुरू केली आहे. सरकारद्वारे सुरू केलेली ही योजना रिस्क फ्री आहे. बाजारातील कोणत्याही घडामोडींचा या योजनेच्या परताव्यावर कोणताही फरक पडत नाही. सध्या शेअर मार्केटबद्दल लोकांमध्ये जी अनिश्चितता आहे, त्यामुळे लोक अशाच योजनांचा शोध घेत आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यावर कोणतीही रिस्क राहणार नाही. म्हणूनच भारत सरकारने वरिष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेली ही योजना नक्कीच खूप स्वागतार्ह आहे.
मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक करताय. तुमच्याही मनात या योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या इतर योजनाबद्दल माहिती जाणून घ्यायची असल्यास आमच्या संकेतस्थळावरील इतर लेखही नक्कीच वाचा.
खूप खूप धन्यवाद !