Chotya Bayochi Mothi Swapna Actress Engagement रंग माझा वेगळा या मालिकेत आदित्यची भूमिका साकारणारा अभिनेता अंबर गणपुलेने नुकतंच अभिनेत्री शिवानी सोनारसोबत धुमधडाक्यात लग्न केलं. आता याच मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने साखरपुडा उरकला आहे. अभिनेत्री सोनाली साळुंकेने साखरपुडा केला आहे. तिच्या होणाऱ्या पतीबद्दल जास्त काही माहिती मिळू शकलेली नाही.
सोनालीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. सोनाली आणि तिच्या होणाऱ्या पतीने हातातील अंगठी दाखवत आपला साखरपुडा झाल्याचे फोटोंमध्ये दाखवले. याशिवाय सोनालीने आपल्या साखरपुड्याच्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. साखरपुड्यासाठी सोनाली आणि तिच्या होणाऱ्या पतीने पारंपरिक लूक केला होता.
Chotya Bayochi Mothi Swapna Actress Engagement
साखरपुड्यासाठी सोनाली आणि तिच्या होणाऱ्या पतीने मॅचिंग रंगाचे कपडे घातले होते. सोनालीने मरून कलरची सुंदर साडी नेसली होती त्यावर एम्ब्रॉयडरी आणि खडीचं वर्क आहे. तर तिच्या होणाऱ्या पतीने मरून कलरचा कुर्ता, गोल्डन कलरची पॅन्ट आणि व्हाईट पिंक कलरचा जॅकेट घातला होता. डोक्यावर व्हाईट फर टोपीसुद्धा घातली होती.
Chotya Bayochi Mothi Swapna Actress Engagement यानंतर दोघांनी दुसरा लूकसुद्धा केला होता. इथेही दोघांनी सारख्याच रंगाचे कपडे घातले होते. सोनालीने पिस्ता कलरचा स्लीवलेस लेहंगा आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी घातली होती. तर तिच्या होणाऱ्या पतीने पिस्ता कलरचा कुर्ता, पॅन्ट आणि त्यावर पगडी घातली होती. त्यांनी रथावर बसूनदेखील फोटो काढले. हे दोघे एकमेकांसोबत खूपच सुंदर दिसत होते. सोनालीचा साखरपुडा हा धुळे शहरात पार पडला.
तेजश्री प्रधानला करायचंय दुसरं लग्न
सोनालीच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोललं तर मागील अनेक वर्षांपासून ती मालिकांमध्ये काम करते. तिने रंग माझा वेगळा, गाथा नवनाथांची, विघ्नहर्ता गणेशा या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सोनाली सध्या सोनी मराठीवरील छोट्या बयोची मोठी स्वप्नं Chotya Bayochi Mothi Swapna Actress Engagement या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका करतेय. ती नाटकांमध्येही काम करते.
सोनालीच्या साखरपुड्यानंतर तिचे फॅन्ससुद्धा खूप आनंदात आहेत. तिने शेअर केलेल्या साखरपुड्याच्या फोटोंवर मालिकेतील सहकलाकार आणि फॅन्सनी कमेंट्स करत साखरपुड्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोनालीचा साखरपुडा तर खूपच धुमधडाक्यात पार पडला पण आता सर्वजण तिच्या लग्नासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लग्नाबद्दल काही माहिती देईल अशी आशा आहे.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद !