Ashi Hi Banwa Banwi Movie : अवघ्या 40 व्या वर्षी जग सोडून गेलाय, अशी ही बनवाबनवी चित्रपटाचा शांतनू

Ashi Hi Banwa Banwi Movie

Ashi Hi Banwa Banwi Movie तुम्ही कोणत्याही मराठी माणसाला विचारलं की, तुझा फेवरेट चित्रपट कोणता ? तर कमीत कमी 90% लोक तरी म्हणतील, अशी ही बनवाबनवी. कदाचित तुमचं उत्तर सुद्धा हेच असेल. या चित्रपटाने खरंच मराठी मनांवर मोहिनी घातली आहे. सर्वांची मन जिंकली आहेत.

आजही कधी अशी ही बनवाबनवी चित्रपट सुरू असला की, लोक जागेवरचं बसतात आणि चित्रपट पूर्ण पाहतात. 34 वर्षानंतर सुद्धा या चित्रपटाची जादू तसूभरही कमी झालेली नाहीये. हा चित्रपट आजही लोकांना बोर करत नाही.

Ashi Hi Banwa Banwi Movie 

ही किमया साधली होती, सचिन पिळगावकर यांच्या लेखणीने. त्यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले होते. त्याचबरोबर कलाकारांची तगडी फौज आणि सुमधुर गाणी सुद्धा चित्रपटाच्या यशासाठी कारणीभूत होतं. राहायला घर नसलेले चार मित्र, धनंजय माने, त्याचा भाऊ शांतनू आणि त्यांचे मित्र सुधीर आणि परश्या हे कशाप्रकारे खोटं जोडपं बनून, बाईचं रूप घेऊन भाडोत्री राहतात आणि पुढे काय धमाल होते, हे या चित्रपटाचं कथानक.

अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, विजू खोटे, अश्विनी बर्वे या सर्वांनी चित्रपटात धमाल उडून दिली होती आणि या कलाकारांच्या गर्दीमध्ये आणखीन एक असा अभिनेता होता, ज्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली होती. या अभिनेत्याचे नाव होतं, शांतनुची भूमिका साकारणारा “सिद्धार्थ रे.”

अशी ही बनवाबनवीचा शंतनू आता जगात नाही

सिद्धार्थ रेची Ashi Hi Banwa Banwi Movie सर्वात मोठी ओळख करून द्यायची म्हटलं, तर तो प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांचा नातू होता. त्याला लहानपणापासूनचं अभिनयाची आवड होती. व्ही शांताराम यांनीच त्याला बालकलाकार म्हणून आपल्या चित्रपटात संधी दिली. पुढे तो हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करू लागला.

आई कुठे काय करते फेम आशुतोष नव्या भूमिकेत

अशी ही बनवाबनवी आणि बाळाचे बाप ब्रह्मचारी हे त्याचे लक्षात राहण्यासारखे मराठी चित्रपट. तर हिंदी चित्रपटातसुद्धा त्याने मोठ नाव कमावलं. तुम्हाला शाहरुख खानचा बाजीगर तर नक्कीच आठवत असेल. यात काजलवर प्रेम करणारा आणि तू प्यार है किसी और का, असं गाणं म्हणणारा इन्स्पेक्टर करण सक्सेना  तुम्हाला आठवत असेल. या भूमिकेत सिद्धार्थने प्राण ओतले होते आणि शाहरुखलासुद्धा तगडी फाईट दिली होती.

पण बाजीगरनंतर Ashi Hi Banwa Banwi Movie सिद्धार्थचं करियर म्हणावं तसं आकार नाही घेऊ शकलं. तो छोट्या मोठ्या भूमिका करत राहिला. 1999 मध्ये त्याने दक्षिणात्य अभिनेत्री शांतीप्रियाशी लग्न केलं। या दोघांचा सुखी संसार सुरू होता. त्यांना दोन मुलही झाली, परंतु शेवटी अघटीत घडलं आणि 2004 मध्ये अवघ्या वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तो हे जग सोडून गेला.

सिद्धार्थ रे ची पत्नी करतेय मुलाचा सांभाळ

पुढे एकट्या शांतिप्रियाने Ashi Hi Banwa Banwi Movie आपल्या दोन्ही मुलांना वाढवलं. आज सिद्धार्थची मुलं मोठी झाली आहेत. अगदी त्याच्यासारखी दिसतात. परंतु मराठी प्रेक्षकांच्या मनात सिद्धार्थ शांतनू म्हणून कायम राहिला. तो खूप लवकर सोडून गेला, याची खंत सुद्धा मराठी प्रेक्षकांना नेहमीचं राहील.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला आठवतो का शांतनु म्हणजेच सिद्धार्थ रे. नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top