Suyash Tilak New Serial : अबोली मालिकेनंतर अभिनेता सुयश टिळक या नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका

Suyash Tilak New Serial 

Suyash Tilak New Serial नुकताच लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक आपल्याला लोकप्रिय अबोली मालिकेत खलनायकी भूमिकेत दिसून आला होता. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसाददेखील मिळाला होता. त्याने मालिकेत सचित राजे ही भूमिका साकारली होती. अनेक वेगवेगळ्या रूपातही तो आपल्याला दिसून आला होता.

आता त्याचा या मालिकेतील रोल संपला आहे त्यामुळे फॅन्स त्याला खूप मिस करत होते. पण लवकरच सुयश आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन जबरदस्त मालिका घेऊन येतोय. सुयशने आपल्या इंस्टाग्रामवरून नवीन मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

 Suyash Tilak New Serial 

सुयशच्या नवीन मालिकेचं (Suyash Tilak New Serial) नाव आहे आदिशक्ती. या मालिकेत सुयश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री पल्लवी पाटील, सुश्रुत मंकणी, अंबरीश देशपांडे, बालकलाकार सावी केळकरसुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. आदिशक्ती मालिका येत्या ६ मेपासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता सन मराठी वाहिनीवर दाखवली जाणार आहे.

भगरे गुरुजींची लेक आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

या मालिकेच्या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहलंय की, सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ….सहज नाही लागणार या आदिशक्तीचा ठाव….

ही मालिका आदिशक्ती देवीच्या महतीवर आधारित असणार आहे.

अभिनेता सुयश टिळकची नवी मालिका  

सुयश या नवीन मालिकेत Suyash Tilak New Serial खूपच धडाकेबाज भूमिकेत दिसून येतोय. मालिकेचा प्रोमोसुद्धा खूपच जबरदस्त आहे. या नवीन प्रोमोनंतर प्रेक्षकांमध्ये मालिकेची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. प्रेक्षक आतुरतेने या मालिकेची वाट पाहताय. सुयशचा नवीन रोलदेखील त्याच्या अभिनय कारकिर्दीला कलाटणी देणारा असेल असंच दिसतंय.

सुयश का रे दुरावा या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानंतर त्याने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. क्लासमेंट्स चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

मग तुम्हीसुद्धा उत्सुक आहात ना सुयश टिळकच्या नवीन मालिकेसाठी नक्कीच सांगा.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.

Scroll to Top