Vishwakarma Yojana 2024
Vishwakarma Yojana 2024 भारत सरकार देशातील लोकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करत असतं. मग यातील काही योजना शेतकऱ्यांसाठी असतात, काही महिलांसाठी असतात, काही मुलींसाठी असतात, तर काही बेरोजगारांसाठी असतात. आज आपण अशाचं एका योजनेबद्दल चर्चा करणार आहोत ज्या योजनेचं उद्दिष्ट व्यवसाय वृद्धी करण्यासाठी आहे.
आम्ही बोलतोय भारत सरकारची नवीन योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबद्दल. 17 सप्टेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत 18 प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे. मग ही विश्वकर्मा योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेचा लाभ कोणत्या व्यवसायांना मिळणार आहे ? Vishwakarma Yojana 2024 योजनेसाठी अर्ज करायला काय काय अटी आहेत ? आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
विश्वकर्मा योजना म्हणजे काय ?
तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात अशी अनेक माणसं पाहत असाल, जी पारंपारिक व्यवसाय करतात. हे त्यांचे पिढीजात व्यवसाय असतात. त्यांचे आई वडील, आजी-आजोबा, पंजोबा हाच व्यवसाय करत होते आणि तेही तोच व्यवसाय करतात. उदाहरणार्थ शिंपी काम, केस कापणे, लोहार काम, सुतार काम, इत्यादी.
या पारंपरिक व्यवसायांमध्ये करोडो लोक आपल्या देशात काम करतात. परंतु त्यांना त्यांचा हा व्यवसाय वाढवण्यासाठी बँकांकडून कोणतंही आर्थिक सहाय्य दिलं जात नाही. कारण त्यांच्याकडे कोणताही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेला नसतो किंवा त्यांचं जे दर महिन्याचं उत्पन्न असतं तेही स्थायी नसतं. त्यामुळे आपला व्यवसाय कसा वाढवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो आणि याबद्दल त्यांच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नसतो.
पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांची हीच गरज लक्षात घेऊन भारत सरकारने विश्वकर्मा योजना (Vishwakarma Yojana 2024) सुरू केली आहे. आता आपण पाहूया की, या योजनेअंतर्गत कोणता व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होणार आहे.
विश्वकर्मा योजनेचा कोणत्या व्यवसायांना लाभ मिळेल
भारत सरकारने अशा 18 व्यवसायांची यादी प्रसिद्ध केली आहे, जो व्यवसाय करणाऱ्या लोकांना विश्वकर्मा योजनेचा फायदा मिळेल.
1) लाकूड काम करणारे सुतार
2) होडी बनवणारे नाविक
3) मासे पकडणारे मच्छीमार
4) लोहार
5) हातोडा आणि इतर लोखंडाचे उपकरण बनवणारे
6) कुलूप आणि चावी बनवणारे
7) कवचकार
8) सोनार
9) माती काम करणारे कुंभार
10) विणकाम करणारे विणकार
11) मूर्तिकार आणि दगड काम करणारे
12) चपलांविषयी काम करणारे चांभार
13) घरकाम करणारे मिस्त्री
14) झाडू, चटई अशा वस्तू बनवणारे कारागीर
15) केस कापणारे न्हावी
16) फुलांच्या माळा बनवणारे माळी
17) धोबी
18) कपडे शिवणारे टेलर
या अठरा व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना सरकार विश्वकर्मा योजनेअंतर्गत (Vishwakarma Yojana 2024) स्वस्त दरात कर्जही पुरवणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण सुद्धा देणार आहे.
(Vishwakarma Yojana 2024) विश्वकर्मा योजनेचा फायदा काय आहे
या Vishwakarma Yojana 2024 योजनेमध्ये आपण ज्या 18 ट्रेडबद्दल बोलतोय, त्या ट्रेडमध्ये व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना सरकारच्या या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. अर्ज मान्य झाल्यानंतर सर्वात आधी त्यांना या व्यवसायाशी संबंधित आठ दिवसांची ट्रेनिंग दिली जाईल. या ट्रेनिंगमध्ये व्यवसाय कसा करायचा आणि वाढवायचा, हे त्यांना शिकवलं जाईल. त्याचबरोबर 500 रुपयांची स्टायपेंडही दिली जाईल.
ही ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर या व्यवसायिकाला सरकार 5% व्याजदराने सर्वप्रथम 1 लाख रुपये देईल. हे 1 लाख रुपये व्यवसाय सुरू करण्यासाठी असतील आणि पैसे परत करण्यासाठी त्यांना 18 महिन्यांचा वेळ दिला जाईल.
व्यवसाय यशस्वी केल्यानंतर आणि 1 लाख रुपये परत केल्यानंतर या व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी 2 लाख रुपयांचं कर्ज देण्यात येईल आणि हे कर्ज परत करण्यासाठी त्यांना 30 महिन्यांचा वेळ दिला जाईल.
हे कर्ज देताना कोणतीही गॅरंटी पाहिली जाणार नाही. अशाप्रकारे या 18 व्यवसाय करणाऱ्या भारतीय नागरिकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सरकार खूप मोठी संधी देत आहे आणि या संधीचा फायदा त्यांनी नक्कीचं घ्यायला हवा.
विश्वकर्मा योजनेत अर्ज करण्यासाठी कोणत्या अटी आहेत
जर तुम्हाला विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला खालीलपैकी सर्व अटी पूर्ण कराव्या लागतील.
1) अर्जदार व्यक्ती भारताचा नागरिक असावा.
2) अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 50 वर्षा दरम्यान असावं.
3) अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे संबंधित व्यवसायाचं एखाद्या मान्यता प्राप्त संस्थेकडून ट्रेनिंग मिळाल्याचं सर्टिफिकेट असावं.
4) या योजनेत ज्या 140 जातींची लिस्ट दिली आहे, त्या जातींपैकी असलेला व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा आणि कोठे करायचा ?
या Vishwakarma Yojana 2024 योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी भारत सरकारने एक संकेतस्थळ म्हणजेचं पोर्टल सुरू केलं आहे.
खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो करून तुम्ही विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करू शकतात.
1) सर्वात आधी तुमच्याकडे मोबाईल किंवा कम्प्युटर असावं, ज्यावर इंटरनेट कनेक्शन आहे.
2) प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वेबसाईटवर अथवा पोर्टलवर या पत्त्याच्या साहाय्याने जाता येईल.
3) या संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला हाऊ टू रजिस्टर (How To Register) हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल.
4) या विंडोमध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक इनपुट करावा लागेल.
5) त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला जी काही माहिती भरण्यास सांगितली आहे, ती माहिती भरून तुम्ही हा फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर या फॉर्मचं व्हेरिफिकेशन होईल आणि मग तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यातर्फे पुढील प्रोसिजर सांगण्यात येईल.
अशाप्रकारे तुम्ही (Vishwakarma Yojana 2024) प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करू शकतात.
जर तुम्हाला स्वतःहून ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, तर तुम्ही कॉमर्स सर्विस सेंटरद्वारे (CSS) या योजनेसाठी अर्ज करू शकता.
आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, अर्ज केल्यानंतर पुढे काय होईल, तर आपण त्याबद्दलही जाणून घेऊया.
1) सर्वात आधी तुम्ही अर्ज करताना आधार आणि मोबाईल व्हेरिफिकेशन होईल.
2) त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाईल की, तुम्ही कोणते कारागीर आहात ? तुम्ही कोणत्या व्यवसायात काम करतात ?
3) तुमचा अर्ज मान्य झाल्यानंतर संबंधित व्यवसायाचं तुम्हाला प्रशिक्षण ट्रेनिंग दिले जाईल आणि तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र दिले जाईल.
4) या प्रमाणपत्राच्या सहाय्याने तुम्ही लोन मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत लोन मिळवण्याच्या दोन स्टेप्स आहेत.
1) सर्वात आधी तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांचं कर्ज दिलं जातं.
2) आणि मग एकदा का तुमचा व्यवसाय सुरू झाला, तुम्हाला या व्यवसायात वाढवायचा आहे. तर त्यासाठी 2 लाख रुपयांचं अतिरिक्त कर्ज दिलं जातं. अशाप्रकारे एकूण 3 लाख रुपयांचं कर्ज Vishwakarma Yojana 2024 योजनेअंतर्गत देण्यात येईल.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे महत्त्व
आपल्या भारत देशात कोणतंही कर्ज मिळवायचं असेल, मग ते घरासाठी असो, तुमच्या वैयक्तिक गरजांसाठी असो, व्यवसाय करण्यासाठी वाढवण्यासाठी असो, तर बँका हा एकमेव पर्याय आहे.
आणि जेव्हा तुम्ही बँकांमध्ये जाता, तेव्हा तुम्ही मिळालेलं कर्ज परत फेडू शकतात की नाही, याबद्दल व्हेरिफिकेशन केलं जातं. मग तो तुमचा क्रेडिट स्कोर असो किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरता की नाही, हे चेक केलं जातं.
हेही वाचा : Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजनेची माहिती
अशावेळेस आपल्या देशात जे लोक पारंपारिक व्यवसाय करतात, कारागिरी करतात, त्यांचा क्रेडिट स्कोर ही चांगला नसतो किंवा त्यांनी कोणता इन्कम टॅक्सही भरलेला नसतो. त्यामुळे त्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळत नाही.
अशावेळेस त्यांना काही खाजगी संस्थांकडून किंवा सावकाराकडून कर्ज घ्याव लागतं. ज्यावर भरमसाठ व्याज आकारलं जातं आणि या लोकांचं खूप मोठ नुकसान होतं.
भारत सरकारने ही समस्या ओळखत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबवली आहे आणि या योजनेअंतर्गत भारत सरकार अतिशय अल्प व्याजदरामध्ये 1 ते 3 रुपयांपर्यंत कर्ज या व्यवसायिकांना देईल.
ज्यामुळे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना त्यांचा व्यवसाय सुरू करणं आणि वाढवणं हे खूप सोपं झालंय.
FAQ About Vishwakarma Yojana प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) प्रश्न : Vishwakarma Yojana 2024 योजनेअंतर्गत किती रुपयाचं कर्ज दिलं जातं ?
उत्तर : या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं.
2) प्रश्न : Vishwakarma Yojana 2024 योजनेत व्यवसाय करण्याचं प्रशिक्षणही मिळतं का ?
उत्तर : हो या योजनेअंतर्गत तुम्हाला व्यवसायाचं प्रशिक्षणही दिलं जातं.
3) प्रश्न : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कोणत्या व्यवसायिकांना प्रशिक्षण आणि कर्ज मिळतं ?
उत्तर : विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षण आणि कर्ज मिळतं, जसं की लोहार काम, सुतार काम, न्हावी, शिंपी, मूर्तिकार, इत्यादी.
4) प्रश्न : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जाची परतफेड कशी केली जाते ?
उत्तर : या योजनेअंतर्गत मिळालेलं कर्ज 18 ते 30 महिन्यांमध्ये परत करावं लागतं.
5) प्रश्न : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये दिलेल्या कर्जावर व्याज आकारलं जात का ?
उत्तर : हो या योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जावर पाच टक्के वार्षिक दराने व्याजदर आकारणी केली जाते.
एकूण आज (Vishwakarma Yojana 2024) प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी खूप मोठी संधी म्हणून आली आहे. ज्या पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना बँका कर्ज देत नाही, त्यांनी नक्कीचं या योजनेचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढवायला हवा.
तुमच्या मनात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. भारत सरकार आणि राज्य सरकारच्या इतर योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
धन्यवाद !