Marathi Moral Story कुंदन नाचत नाचत घरी येतो आणि घरी आल्या आल्या प्रकृतीला पेढा भरवतो. प्रकृती विचारते, “काय झालंय कुंदन ? एवढा खुश का आहेस आणि हा पेढा कशाचा ?” कुंदन सांगतो, “खूप खूप आनंदाची बातमी आहे. मला प्रमोशन मिळालंय आणि फक्त प्रमोशन नाही माझा पगार सुद्धा वीस हजार रुपये महिन्याने वाढला आहे.”
हे ऐकून प्रकृतीलाही खूप आनंद होतो आणि ती कुंदनला घट्ट मिठी मारते. कुंदन खूप रोमँटिक होतो आणि प्रकृतीच्या जवळ येऊ लागतो. तेवढ्यात कुंदनची आई रुक्मिणीच्या खोकण्याचा आवाज येतो. प्रकृती खूप चिडते आणि कुंदनला दूर लोटते. ती म्हणते, “जोपर्यंत हा आवाज माझ्या कानात घुमतोय ना, तोपर्यंत माझ्या अंगाला हात नाही लावायचा.” आणि ती रागारागाने तिच्या खोलीत निघून जाते. कुंदन खूप चिडतो.
Marathi Moral Story
तेवढ्यात रुक्मिणी तिच्या खोलीबाहेर येते आणि कुंदनला म्हणते, “आलास का रे पोरा ?” कुंदन म्हणतो, “हा आलोय आणि तू कशाला आली बाहेर ? जा ना खोलीत, नको आम्हाला डिस्टर्ब करू.” रुक्मिणी म्हणते, “अरे पोरा, आता खोकला येतोय, तर काय करणार ? तुला किती वेळेस सांगितलं, मला दवाखान्यात घेऊन चल. तर तुला वेळचं नसतो. सुनबाईला म्हटलं, तर ती धड माझ्याशी बोलतही नाही.”
Marathi Moral Story कुंदन म्हणतो, “हा पाहू पाहू, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा घेऊन जाईल तुला हॉस्पिटलमध्ये. आता वेळ नाहीये माझ्याकडे” असं म्हणून कुंदन खोलीत निघून जातो. रुक्मिणीला खूप वाईट वाटतं आणि ती तिच्या खोलीत जाऊन बसते.
कुंदन रूममध्ये येतो, तर प्रकृती तोंड फुगवुन बसलेली असते. कुंदन खूप प्रेमाने तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, “काय झालं बच्चू, असं का करतेस तू ?” प्रकृती म्हणते, “उगाचंच लाडीगोडी नको लावू मला. जोपर्यंत तुझी आई या घरात राहणार, तोपर्यंत मी या घरात राहूनसुद्धा तुझी बायको नसेल. अंगाला हात नाही लावायचा माझ्या.”
Marathi Emotional Story
कुंदन म्हणतो, “मग काय करू मी माझ्या आईचं ? आई आहे ती माझी. आजकाल वृद्धाश्रमात आपण तिला येऊन सोडलं, तर ते लोक चार गोष्टी सुनावतात. आपला व्हिडिओ वगैरे व्हायरल करतील. नोकरी जाईल माझी.”
Marathi Moral Story प्रकृती म्हणते, “ते नाही मला माहित. परंतु दिवसभर त्यांच्या खोकल्याने आणि त्यांच्या आजारपणाने वीट आलाय मला. नुसतं सुनबाई मला दवाखान्यात घेऊन जा. माझा इलाज कर. असं बोलत असतात त्या. आता त्यांना खरंही नाही सांगू शकत ना की, तुमचा आजार हा कधी बरा होणारा नाहीये. आज ना उद्या तुम्हाला देवाकडे जायचंय.”
कुंदन म्हणतो, “असं नको बोलूस, आई आहे ती माझी. लहानच मोठं केलंय, जन्म दिलाय तिने मला.” प्रकृती म्हणते, “हा इमोशनल अत्याचार माझ्यावर नाही करायचा. तुझी आई आहे ना, मग तू त्यांचा त्रास सहन करायचा. तू माझ्या आई बापाचा त्रास सहन करतोस का ? Marathi Moral Story उद्या मी त्यांना येथे आणून ठेवलं, तर तू सांभाळणार आहेस का त्यांना ?” कुंदनला काय उत्तर द्यावं हे समजतचं नाही आणि तो म्हणतो, “तू सांग आता काय करायचं ?”
घटस्फोटाच्या ५ वर्षांनंतर नवरा बायको समोर आले तेव्हा
प्रकृती म्हणते, “त्यांना आपण वृद्धाश्रमात नाही सोडून येऊ शकत, तर कुठेतरी मंदिराबाहेर सोडून येऊ.” हे ऐकून कुंदनला मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो, “हे काय बोलतेस तू ? डोकं फिरलय का काय तुझं ?” Marathi Moral Story प्रकृती म्हणते, “हो डोकं फिरलय माझं. जोपर्यंत तुझी आई या घरात राहील, तोपर्यंत माझ्याकडे पाहायचं सुद्धा नाही.” असं म्हणून ती रागारागाने निघून जाते.
Marathi Sad Story
कुंदन खूप चिडतो. कुंदन आणि प्रकृतीच्या लग्नाला अवघ एक वर्ष झालं होतं आणि मागील आठ नऊ महिन्यांपासून रुक्मिणीची तब्येत खूपचं खराब होती. त्यांना सलग खोकला यायचा. कुंदन त्यांना सुरुवातीला दवाखान्यातही घेऊन गेला होता. Marathi Moral Story तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की, त्यांना दुर्धर आजार झाला आहे आणि यातून त्या काही बऱ्या होणार नाहीत. त्यांच्याकडे खूप थोडा वेळ बाकी आहे.
प्रकृतीला मात्र राजा राणीचा संसार हवा होता. नव्या नव्या संसारात सासू आणि तेही आजारी सासू तिला नको होती. कुंदनला कोणते नातेवाईकही नव्हते ? Marathi Moral Story त्यामुळे आता आईला कोणाकडे नेऊन सोडावं, तिचं काय करावं, हाच प्रश्न त्याला पडला होता. त्यामुळे संसारासाठी कुंदन एक भयानक निर्णय घेतो आणि रुक्मिणीला एका मंदिराबाहेर सोडण्याचा विचार करतो.
Marathi Heart touching Story
प्रकृती फ्रेश होऊन येते. तेव्हा कुंदन तिला म्हणतो, “ठीक आहे, मी तिला एका मंदिराबाहेर सोडून येतो.” कुंदनला प्रकृती म्हणते, “आजपर्यंत खूप वेळेस बोललाय तू असं, कधी काही केलं नाही. जेव्हा करशील ना, Marathi Moral Story तेव्हा माझ्याकडे पाहायचं. तोपर्यंत डोळे बंद करून घे.” कुंदनला समजतं त्याच्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नाहीये.
कुंदन लगेच रुक्मिणीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, “आई चल तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो.” रुक्मिणी विचारते, “एवढ्या रात्री का ?” तर कुंदन म्हणतो, “हो स्पेशलिस्ट डॉक्टर आहे. त्यांची अपॉइंटमेंट Marathi Moral Story आत्ताच मिळालीये, चल लवकर.” रुक्मिणी कुंदनबरोबर निघते. कुंदन एका महादेवाच्या मंदिरासमोर गाडी थांबवतो आणि म्हणतो, “आई चल आधी देवाचे दर्शन घेऊया. मग तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो.” रुक्मिणीला खूप आनंद होतो आणि ती कुंदनबरोबर मंदिरात जायला तयार होते.
कुंदन आणि रुक्मिणी मंदिरात येतात. तेव्हा कुंदन रुक्मिणीला म्हणतो, “आई तू बस येथे. मी देवासाठी फुलं आणतो.” रुक्मिणी हो म्हणते आणि कुंदन Marathi Moral Story तेथून निघून जातो. हे सगळं त्याचं नाटक असतं. कुंदन रुक्मिणीला या मंदिरातचं सोडून घरी निघून येतो.
रुक्मिणी खूप वेळ कुंदनची वाट पाहते. आजूबाजूला त्याला शोधते. पण कुंदन तिला कोठेचं दिसत नाही. रुक्मिणीला वाटतं की, कुंदन काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी गेला असेल. गाडी वगैरे खराब झाली असेल आणि ती तिथेच कुंदनची वाट पाहत बसते. वाट पाहता पाहतात तिला मंदिरातचं झोप लागते.
Marathi Bodhkatha
इकडे कुंदन घरी पोहोचतो. तो खूप खुश असतो. तो प्रकृतीला म्हणतो, “तुझी इच्छा पूर्ण केलीये मी. आईला मंदिरात सोडून आलोय.” हे ऐकून प्रकृतीला खूप आनंद Marathi Moral Story होतो आणि ती कुंदनला घट्ट मिठी मारते. आज तिचं राजा राणीच्या संसाराचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी उठते. तेव्हा तिला सगळं आठवतं, रात्री कुंदन डॉक्टरांकडे घेऊन जायचं म्हणून येथे घेऊन आला आणि मंदिरात सोडून तो गायब झाला. तेव्हा रुक्मिणीला समजतं की, कुंदन आपल्याला येथे कायमचा सोडून गेला आहे. त्याला आपण घरात नको होतो, म्हणून त्याने असं केलंय. रुक्मिणीला खूप वाईट वाटतं. तिच्या Marathi Moral Story डोळ्यातून पाणी येऊ लागतं. तेवढ्यात तिला समोर महादेव दिसतात. ती ती महादेवाजवळ येते आणि हात जोडून म्हणते, “देवा दुःख मानू की आनंद मानू, हेच कळत नाहीये. माझ्या मुलाच्या घरातून मी माझ्या महादेवाच्या घरात आलेय. खरं सांगायचं तर आनंद होतोय मला. आयुष्याचा शेवटचा काळ तुझ्याजवळ राहता येईल. रात्रंदिवस तुझी सेवा करता येईल.”
तेव्हा रुक्मिणी ठरवते की, कुंदन आपल्याला मंदिरात सोडून गेला आहे, याचं दुःख नाही मानायचं. तर आता नेहमी देवाच्या सानिध्यात राहता येईल याचा आनंद मानायचा आणि तेव्हापासून रुक्मिणी Marathi Moral Story मंदिरात देवाची सेवा करू लागते. मंदिरात झाडझुड करणे, देवाला फुल वाहणे, पूजा करणं, तेथील लोकांची सेवा करण अशी अनेक कामं ती करू लागते.
इकडे कुंदन आणि प्रकृती दोघेही खूप खुश असतात. आता घरात दोघेचं म्हणून त्यांची चंगळ सुरू असते. घरात सासू नाही म्हणून प्रकृती कुंदनचा पूर्ण फायदा उचलते. त्याच्याकडून उंची उंची कपडे, अत्तर, खाण्यापिण्याच्या वस्तू, फिरायला जाणं, चित्रपट पाहायला जाणं, हॉटेलमध्ये खायला जाणं, Marathi Moral Story पार्टी करणं, महागाची घड्याळ, मोबाईल, असं सगळं ती खरेदी करते आणि प्रकृतीच्या प्रेमात कुंदन तिच्यावर वारेमाप खर्च करतो.
या खर्चामुळे कुंदनकडे जी काही बचत होती, ती सगळी खर्च होते आणि क्रेडिट कार्डवर तो कर्जही काढतो. आपला पगार वाढला आहे, पुढच्या महिन्यात पगार आल्यावर सगळी कर्ज फेडू, असा विचार तो करतो. परंतु एक दिवस कंपनीत त्याच्याकडून खूप मोठी चूक होते आणि कंपनीचा हातून एक मोठं कॉन्ट्रॅक्ट जातं. त्यामुळे कुंदनला दोषी ठरवून कंपनीतून काढून टाकलं जातं.
यामुळे कुंदन Marathi Moral Story आणि प्रकृतीला मोठा धक्काचं बसतो. कारण आता कसं जगायचं, कर्ज कशी फेडायची हाच प्रश्न कुंदनसमोर असतो. कुंदन नवीन नोकरी मिळवण्याचा खूप प्रयत्न करतो. परंतु जुन्या कंपनीतून का काढून टाकलं, या कारणामुळे त्याला कुठेही नवीन नोकरी मिळत नाही.
इकडे रुक्मिणी महादेवाची सेवा करत असते. तेथील भक्तांची Marathi Moral Story सेवा करते आणि याचं फळ तिला मिळतं. हळूहळू तिचा खोकला कमी होतो आणि ती ठणठणीत बरी होते. चमत्कारचं घडतो.
कुंदन आणि प्रकृतीची आर्थिक परिस्थिती खूप बिघडते. नोकरी नसल्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण होऊ लागतात. प्रकृतीला फक्त ऐश हवी असते आणि कुंदनला Marathi Moral Story मात्र तिच्यावर एक रुपयाही खर्च करायला जमत नाही. आता फक्त देवच आपल्याला यातून वाचवू शकतो, असा विचार करून कुंदन त्याच महादेवाच्या मंदिरात येतो, जेथे त्याने रुक्मिणीला सोडलेलं असतं.
मंदिरामध्ये येताचं रुक्मिणी आणि कुंदनची नजरा नजर होते. रुक्मिणी खूप आनंदी असते, तर कुंदनच्या चेहऱ्यावरचा रंगचं उडालेला असतो. कुंदन आणि प्रकृतीची हिम्मतचं होत नाही की, रुक्मिणीच्या नजरेला नजर द्यावी. परंतु रुक्मिणी पुढे येते आणि म्हणते, “कशाला आलास येथे ?”
कुंदन म्हणतो, Marathi Moral Story “आई माझी नोकरी गेली. मला दुसरी नोकरीही मिळत नाहीये. कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा आहे. त्यामुळे देवाच्या शरणेत आलोय. आता देवच आम्हाला या संकटातून बाहेर काढेल. त्यानेच आमच्यावर ही वेळ आणलीये.”
रुक्मिणीच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि ती म्हणते, “नाही रे, देवाने तुमच्यावर ही वेळ नाही आणली आहे. ही वेळ तुम्ही स्वतःवर ओढून घेतली आहे. जैसे ज्याचे कर्म, Marathi Moral Story तैसे फळ देतो रे ईश्वर, हे तर तू ऐकलंचं असेल. स्वतःच्या आजारी आईला घराबाहेर काढलं तुम्हीझ मंदिरात सोडून आलात, यापेक्षा मोठ पाप कोणतं असू शकतं ? त्याचं फळ मिळतंय तुम्हाला आणि खरं सांगू तर तुम्ही कितीही देवाची भक्ती केलीझ तरी हे पाप आता नाही कमी होणार. तुम्हाला तुमच्या कर्माची फळ भोगावीचं लागतील.
नाही असं नका समजू की, मी तुम्हाला श्राप देत आहे. पण जे खरं आहे, ते खरं आहे.” कुंदन म्हणतो, “आई तुझा खोकला गेला का ? तू आता खोकत नाहीयेस.” रुक्मिणी म्हणते, “कदाचित या पुण्याचं फळ तुला मिळेल. Marathi Moral Story तू मला घरातून बाहेर काढून या मंदिरात आणून सोडलं आणि माझ्यावर देवाची कृपा झाली. मी बरी झाले. शेवटी आई आहे रे मी तुझी, देवाला प्रार्थना करेल, हे देवा माझ्या पोराचं भलं कर.” शेवटी तू आणि तुझं कर्म असं म्हणून रुक्मिणी पुन्हा एकदा देवाच्या सेवेत रुजू होते. कुंदनला काय बोलावं हे समजतचं नाही. दोघे देवासमोर हात जोडतात. कुंदनच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि तो तिथून जातो.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची Marathi Moral Story कथा. नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !