Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजनेची माहिती

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana आपल्या भारत देशात कन्या भ्रूण हत्या, मुलींचे बालविवाह यांसारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या समस्यांवर तोडगा म्हणूनचं भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा दिली. परंतु या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा हवा असेल तर कन्या भ्रूण हत्या आणि मुलींचे बालविवाह यांसारख्या गोष्टी का घडतात हे जाणून घ्यावं लागेल.

या समस्यांचं मुख्य कारण म्हणजे अशा घटना ज्या कुटुंबांमध्ये घडतात, त्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती दयनीय असते. आपल्या घरात जर मुलीचा जन्म झाला, तर तिला शिकवायचं कसं ? तिचं लग्न कसं करून द्यायचं ? तिची जबाबदारी कशी घ्यायची ? असा प्रश्न या कुटुंबाला पडतो. म्हणूनचं अशी चुकीची पाऊलं उचलली जातात.

त्यामुळेचं बेटी बचाओ बेटी पढाओ या घोषणेला बळ देण्यासाठी भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे. सुकन्या समृद्धी योजना ही एक छोटी बचत योजना असून या योजनेचा फायदा मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी होतो. या योजनेत मुलीचे आई वडील दरमहा किंवा वार्षिक एक ठराविक रक्कम गुंतवून मुलगी मोठी झाल्यानंतर एकरकमी मोठा परतावा मिळवू शकतात. म्हणजेच या योजनेमुळे मुलीचं भविष्य सुरक्षित होऊ शकतं . या योजेनच्या अशा फायद्यांमुळेच थोड्याचं काळात सुकन्या समृद्धी योजना चांगलीच लोकप्रिय झाली असून भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहे.

मग ही Sukanya Samriddhi Yojana नेमकी आहे तरी काय ? या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ? अटी काय आहेत ? या योजनेत काय फायदा होतो ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.

सुकन्या समृद्धी योजना नेमकी काय आहे ?

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक छोटी बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत मुलीचे आई-वडील तिच्या नावावर बँक किंवा पोस्टमध्ये एक अकाउंट उघडतात आणि अकाउंटवर दर महिना किंवा दरवर्षाला त्यांना जसे जमेल, तसं रक्कम जमा करतात. या योजनेत कमीत कमी 15 वर्ष आर्थिक गुंतवणूक करावी लागते आणि मग 21 वर्षांनंतर मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी जो फंड जमा झाला आहे, ती एकत्रित झालेली रक्कम या मुलीच्या नावावर वर्ग केली जाते.

(Sukanya Samriddhi Yojana) सुकन्या समृद्धी योजनेसाठी अटी काय आहेत ?

भारत सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी ठरवून दिलेल्या आहेत.

1) कुटुंबातील फक्त दोनचं मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो

2) जर कुटुंबात दोन पेक्षा जास्त मुली असतील तरीही लाभ मिळू शकतो. उदाहरणार्थ जर घरात पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्यांदा दोन जुळ्या मुली झाल्या, तर तिसऱ्या मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकतो.

3) परंतु जर घरात पहिल्यांदा दोन जुळ्या मुली झाल्या आणि मग दुसऱ्यांदा मुलगी झाली, तर तिसऱ्या मुलीला या योजनेचा लाभ मिळत नाही.

4) कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलीलासुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो.

5) Sukanya Samriddhi Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा जास्त नसावं.

6) एका वर्षात कमीत कमी 250 रुपये ते जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक या योजनेत करता येते.

7) या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 15 वर्ष गुंतवणूक करण अनिवार्य आहे.

8) 21 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरचं या योजनेत जमा झालेली संपूर्ण रक्कम लाभार्थ्याला दिली जाते.

9) 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर किंवा दहावीची परीक्षा पास केल्यानंतरही तुम्ही 50 % रक्कम या योजनेतून काढू शकतात.

10) परंतु एका वर्षात फक्त एकाचं वेळेस तुम्ही रक्कम काढू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे काय आहेत ?

1) भारत सरकारने सुरू केलेली Sukanya Samriddhi Yojana ही एक छोटी बचत योजना आहे.

2) प्रत्येक वर्षी भारत सरकार या योजनेवर दिले जाणारे व्याज कमी किंवा जास्त करतं. जसं की, या योजनेच्या सुरुवातीला 8.4% व्याजदर दिला जायचा. आता तो 7.6 टक्क्यांवर आला आहे.

3) Sukanya Samriddhi Yojana एक सरकारी सेविंग स्कीम असल्यामुळे बाजारातील कोणत्याही घडामोडींचा या योजनेवर फरक पडत नाही आणि तुम्हाला गॅरेंटीड रिटर्न मिळतो.

4) या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर इन्कम टॅक्समध्येही सवलत मिळते.

5) त्याचबरोबर या योजनेतून तुम्हाला जो रिटर्न येणार आहे, ती रक्कम टॅक्समुक्त असेल. त्या रकमेवर तुम्हाला कोणताही टॅक्स भरण्याची गरज पडणार नाही.

सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवलेल्या रकमेवर किती व्याज मिळतं ?

सरकार प्रत्येक वर्षी Sukanya Samriddhi Yojana योजनेवरील व्याज कमी किंवा जास्त करत असतं. सुरुवातीला या योजनेवर 8.1% व्याजदर होतं. जे पुढे 8.4% करण्यात आलं. सध्या 2023 – 2024 या आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेच्या जमा रकमेवर 7.6% व्याजदर दिला जातो.

सुकन्या समृद्धी योजनेचे खातं कसं उघडावं ?

या योजनेअंतर्गत खातं उघडण्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो करा.

1) Sukanya Samriddhi Yojana योजनेसाठी तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्टात अकाऊंट उघडू शकता.

2) अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला बँकेतून किंवा पोस्टातून अर्ज आणावा लागेल.

3) या अर्जात नमूद केल्याप्रमाणे तुमचं नाव, पत्ता, मुलीचे नाव, वय यांसारखी सर्व माहिती भरावी लागेल.

त्याचबरोबर अर्जात नमूद केल्याप्रमाणे कागदपत्र जसं की, आई-वडिलांचं उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, मुलीचं आधार कार्ड, वयाचा दाखला, जन्माचा दाखला, अशी कागदपत्र जोडून तुम्ही हा अर्ज जमा करायचा आहे आणि मग तुमचं या योजनेअंतर्गत अकाउंट ओपन होतं.

Sukanya Samriddhi Yojana Important Documents

1) अर्जदार मुलीच्या आई-वडिलांचं उत्पन्न प्रमाणपत्र
2) आईवडीलांचं आधार कार्ड
3) मुलीचं आधार कार्ड
4) मुलीच्या वयाचा दाखला
5) मुलीचा जन्माचा दाखला

सुकन्या समृद्धी योजनेचा अकाउंट बॅलन्स कसा चेक करायचा ?

काही बँका आणि पोस्ट तुमच्या Sukanya Samriddhi Yojana अकाउंट बॅलन्स चेक करण्याची सुविधा तुम्हाला पुरवतात. हा बॅलन्स तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. यासाठी तुमच्याकडे लॉगिन डिटेल्स असायला हवेत.

सुकन्या समृद्धी अकाउंटवरून पैसे काढण्याचे नियम काय आहेत ?

या योजनेचा कालावधी पूर्ण होण्यासाठी 21 वर्षे लागतात. परंतु त्याआधीही मुलगी दहावी पास झाल्यानंतर तुम्ही या अकाउंटवरील 50% रक्कम तिच्या उच्च शिक्षणासाठी काढू शकता. किंवा लग्नासाठी मुलीचं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 50% रक्कम काढता येते.

सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत

मागील काही वर्षात भारत सरकारने सुरू केलेली Sukanya Samriddhi Yojana ही खूप वैशिष्ट्यपूर्ण अशी योजना आहे.

1) मुलीच्या पालकांना त्यांच्या लग्नाची आणि शिक्षणाची सर्वात जास्त काळजी असते आणि ही योजना मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी एक रकमी जास्तीत जास्त पैसे मिळावे, यासाठीचं तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा : Jan Dhan Yojana | प्रधानमंत्री जनधन योजना माहिती

2) ही एक सरकारी बचत योजना असल्यामुळे यामध्ये कोणतीही बाजारातील रिस्क नाहीये आणि तुम्हाला तुमच्या गुंतवलेल्या रकमेनुसार परतावा मिळणारचं आहे.

3) ज्या पालकांना आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी एकरकमी पैसे हवे आहेत. त्यांना थोडे थोडे पैसे जमा करून एकरकमी जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो.

सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर

या योजनेअंतर्गत जर तुम्ही पैसे गुंतवले, तर तुम्हाला किती परतावा मिळू शकतो. हे आपण या कॅल्क्युलेटरद्वारे तपासू शकतो.

Sukanya Samriddhi Yojana Calculator

https://groww.in/calculators/sukanya-samriddhi-yojana-calculator

FAQ About Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजनेबाबत सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घरातील किती मुलींना मिळतो ?

उत्तर : एका कुटुंबातील दोन मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळू शकतो.

2) प्रश्न : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवलेल्या रकमेवर किती व्याजदर मिळतं ?

उत्तर : Sukanya Samriddhi Yojana योजनेवर मिळणारं व्याजदर सरकार प्रत्येक वर्षी बदलत असतं. सध्या या योजनेवर 7.6% व्याजदर मिळतो.

3) प्रश्न : सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवलेली रक्कम परत कधी मिळते ?

उत्तर : या योजनेचा कालावधी 21 वर्षांचा असून तुम्ही मुलगी दहावी पास झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा 18 वर्षे पूर्ण झाल्यावर तिच्या लग्नासाठी 50% रक्कम काढू शकता.

4) प्रश्न : सुकन्या समृद्धी योजनेचे अकाउंट कुठे उघडता येते ?

उत्तर : या योजनेच्या अकाउंट तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता.

5) प्रश्न : Sukanya Samriddhi Yojana योजनेत पैसे गुंतवल्यावर कोणती रिस्क आहे का ?

उत्तर : नाही, ही एक सरकारी बचत योजना असून बाजारपेठेचा कोणताही परिणाम या योजनेच्या परताव्यावर होत नाही. या योजनेत कोणतीही रिस्क नाही.

एकूणचं सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने उचललेलं अतिशय स्तुत्य पाऊल आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना नेहमीचं आपल्या घरात जन्मलेल्या मुलींचे शिक्षण आणि लग्न याबद्दल काळजी वाटत असते. या योजनेत पैसे गुंतवून जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो आणि मुलींनाही त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल.

बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत सरकारने ही योजना सुरू केली आहे आणि हे खूप स्वागतार्ह आहे.

तुमच्या मनात Sukanya Samriddhi Yojana द्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्की कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू.

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारशी निगडित इतर योजनाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळावरील इतर लेखही नक्कीचं वाचा.

धन्यवाद !

Scroll to Top