How To Order PVC Aadhar Card आपण नेहमीचं आपलं ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड बरोबर घेऊन फिरत असतो. पण कधी कधी आधार कार्ड हरवतं. अशावेळेस सर्वांनाचं प्रश्न पडतो की, आता काय करायचं ? आधार कार्ड परत कसं काढायचं ? तर आज आम्ही तुम्हाला घरबसल्या PVC आधार कार्ड (How To Order PVC Aadhar Card) काढण्याची प्रोसेस सांगणार आहोत.
पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar Card) म्हणजे काय ?
पॉलीविनायाईल क्लोराइड कार्डला पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar Card) असं म्हटलं जातं. हे आधार कार्ड तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करू शकता.
पीव्हीसी आधार कार्डमध्ये सामान्य आधार कार्डपेक्षा अनेक फीचर्स असतात. जसे की, सिक्युअर क्यूआर कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, आधार कार्ड काढण्याची आणि प्रिंट केल्याची तारीख.
(How To Order PVC Aadhar Card) पीव्हीसी आधार कार्डसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा ?
पीव्हीसी आधार कार्डसाठी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्जही करू शकता. यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
१) सर्वात आधी आधारची ऑफिशियल वेबसाईट https://www.uidai.gov.in भेट द्या.
२) या वेबसाईटवर My Aadhaar सेक्शनमध्ये जाऊन Order Aadhaar PVC Card या ऑप्शनवर क्लिक करा.
३) येथे तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक, 16 अंकी आधार व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार नोंदणी क्रमांक टाकावा लागेल.
४) यानंतर तुम्हाला कॅपच्या एंटर करावा लागेल.
५) तुमच्या आधार कार्डबरोबर जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे, त्यावर एक ओटीपी येईल, तो सबमिट करा.
६) ओटीपी सबमिट केल्यावर तुम्हाला तुमच्या पीव्हीसी आधार कार्डचा प्रिव्ह्यू पाहायला मिळेल.
घरबसल्यापॅन कार्ड कसं ऑर्डर करायचं ?
७) सर्व डिटेल्स बरोबर असल्यास तुम्ही पन्नास रुपयांचं ऑनलाईन पेमेंट करून हे पीव्हीसी आधार कार्ड घरबसल्या ऑर्डर करू शकता.
८) ऑनलाइन पेमेंट पूर्ण झाल्यानंतर पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डरची प्रोसेस पूर्ण होते.
९) यानंतर UIDAI तुमचं पीव्हीसी आधार कार्ड प्रिंट करेल आणि भारतीय पोस्टकडे सुपूर्द करेल.
१०) भारतीय पोस्ट स्पीड पोस्टने तुमच्या पत्त्यावर हे पीव्हीसी आधार कार्ड पोहोच करेल.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्ही कधी ऑर्डर करताय तुमचं आधार पीव्हीसी कार्ड (How To Order PVC Aadhar Card), नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !