Lakshman Wife Urmila In Ramayana : रामायणात लक्ष्मणची बायको उर्मिला 14 वर्षं झोपली होती ?

Lakshman Wife Urmila In Ramayana 

Lakshman Wife Urmila In Ramayana रामायणाचा विषय निघाला की, प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण आणि विभीषण यांचा उल्लेख प्रामुख्याने येतो. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त रामायणात अशी अनेक पात्र आहेत ज्यांना रामायणात विशेष महत्त्व आहे. अशी काही पात्र आहेत, ज्यांचा त्याग उच्च कोटीचा होता.

आपण लक्ष्मण यांचा नेहमीचं आदर करतो. ते आपलं सगळं राज्य, ऐशोआराम सोडून भावासाठी 14 वर्षांच्या वनवासाला निघून गेले. खरं तर त्यांना वनवास दिला गेला नव्हता. परंतु प्रभू श्रीराम वनवासाला जात आहेत, म्हणून लक्ष्मणही त्यांच्या बरोबर निघाले. ही कथा तर आपल्या सर्वांना माहितेय.

पण तुम्ही कधी लक्ष्मण यांची Lakshman Wife Urmila In Ramayana पत्नी उर्मिलाबद्दल जाणून घेतलं आहे का ? जेव्हा प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचं लग्न झालं, तेव्हाचं लक्ष्मण आणि  उर्मिला यांचंही लग्न झालं.उर्मिला ही सीता मातेची बहीण होती.

Lakshman Wife Urmila In Ramayana 

कैकयीच्या सांगण्यावरून प्रभू श्रीराम यांना 14 वर्षांचा वनवास मिळाला. तेव्हा श्रीरामांची पत्नी माता सीताही त्यांच्याबरोबर वनवासाला निघाल्या आणि लक्ष्मणही त्यांच्याबरोबर निघाले. मग लक्ष्मण यांची पत्नी उर्मिला का त्यांच्याबरोबर वनवासाला गेल्या नाहीत. जेव्हा लक्ष्मण हे प्रभू श्रीराम यांच्याबरोबर 14 वर्षे वनवासात होते, तेव्हा उर्मिलाने काय केलं ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

जेव्हा प्रभू श्रीराम आणि माता सीता हे वनवासाला निघाले, तेव्हा लक्ष्मण यांनीही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणने त्यांची माता सुमित्राची आज्ञा घेतली आणि मग ते त्यांची पत्नी उर्मिलाजवळ आले. उर्मिलानेही तिचा पत्नीधर्म निभावण्याचा निश्चय केला आणि ती लक्ष्मण यांना म्हणाली की, मी तुमच्या बरोबर येईल.

रामायणात लक्ष्मणची पत्नी उर्मिला 14 वर्षं झोपली होती ?

परंतु तेव्हा लक्ष्मण उर्मिलाला म्हणाले, पत्नीधर्म निभावण्यापेक्षा तुला माझ्या कुटुंबाची काळजी घेणं जास्त गरजेचे आहे. आता प्रभू श्रीराम, माता सीता आणि मी येथे नाही राहणार. तेव्हा येथे राहून माझ्या मातांची काळजी तुलाचं घ्यायची आहे. तू येथे थांब आणि त्या सर्वांची काळजी घे. मला आणखीन एक वचन दे की, मी तुझ्याजवळ नाही, याचं तू कधीही दुःख मानणार नाही. कधी तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहणार नाहीत. कारण जर तू दुःखी राहिली, तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहत असले, तर तू माझ्या मातांची काळजी घेऊ शकणार नाही.

Lakshman Wife Urmila In Ramayana उर्मिला पतिव्रता होत्या. त्यांच्या पतीने त्यांच्याकडे जी इच्छा मागितली, ती त्यांनी पूर्ण करण्याचं ठरवलं. त्या म्हणाल्या ठीक आहे, मी येथे राहून सर्वांची काळजी घेईल आणि डोळ्यात कधीही एक अश्रू येऊ देणार नाही. उर्मिलाने त्यावेळेस एक दिवा लावला आणि ती लक्ष्मणाला म्हणाली, जोपर्यंत हा दिवा पेटतोय, तोपर्यंत तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही सुखरूप असाल.

लक्ष्मण यांनी उर्मिलाचा निरोप घेतला आणि ते प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्याबरोबर वनवासाला गेले. वनवासात असताना या दोघांची सेवा करायची, असं त्यांनी ठरवलेलं. वनवासाच्या पहिल्या दिवशी रात्र झाली आणि निद्रादेवी  लक्ष्मण यांच्याजवळ आली आणि त्यांना झोपण्यास सांगितलं. परंतु लक्ष्मण निद्रा देवीला म्हणाले की, मी येथे माता सीता आणि प्रभु श्रीराम यांची सेवा करण्यासाठी आलोय. ते जेव्हा झोपतील, तेव्हा मला येथे पहारा ठेवावा लागेल, जेणेकरून कोणी त्यांना त्रास देणार नाही. म्हणून पुढील 14 वर्षे वनवासात मी एक क्षणही झोपणार नाही.

महाभारतात भीष्म पितामह यांचा मृत्यू कसा झाला ?

Lakshman Wife Urmila In Ramayana निद्रा देवी यासाठी तयार झाली आणि ती म्हणाली, मी तुम्हाला वरदान देते की, पुढील 14 वर्षे तुम्ही झोपणार नाहीत. परंतु त्याऐवजी तुमची झोप दुसरा एखाद्या व्यक्तीने घ्यायला हवी आणि ती व्यक्ती तुमच्या जवळची असावी. तेव्हा लक्ष्मण म्हणाले, ठीक आहे माझ्याऐवजी माझी पत्नी झोप घेईल. निद्रा देवी यासाठी तयार झाल्या आणि त्या म्हणाल्या, ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत जाल, तेव्हा उर्मिला झोपेतून जागी होईल आणि तुम्हाला लगेच झोपावे लागेल. लक्ष्मण यासाठी तयार झाले.

Lakshman Wife Urmila In Ramayana निद्रा देवी उर्मिलाजवळ आल्या आणि उर्मिलाला त्यांनी झालेली सगळी घटना सांगितली. उर्मिला लगेच यासाठी तयार झाली आणि त्यानंतर पुढील 14 वर्ष उर्मिलाने लक्ष्मणची झोप घेतली. त्या सदैव झोपून राहिल्या. आता तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की, जेव्हा लक्ष्मण वनवासाला चालले होते, तेव्हा त्यांनी उर्मिलाकडून वचन घेतलं होतं, तू येथे राहून माझ्या मातांची काळजी घे, मग ते वचन त्यांनी झोपलेल्या अवस्थेत कसं पूर्ण केलं ?

Ramayana Unknown Facts

तर याबद्दलही Lakshman Wife Urmila In Ramayana पुराणांमध्ये एक कथा सांगितली जाते. माता सीता यांनी उर्मिलाला एक वरदान दिलं होतं की, एकाचं वेळेस तू 3 काम करू शकशील. त्यामुळे उर्मिलाने 14 वर्षे झोपलेल्या अवस्थेत असतानाही लक्ष्मणाला वचन दिल्याप्रमाणे त्याच्या मातांची सेवा केली.

पुराणांमध्ये उर्मिलाबद्दल आणखीन एक कथा सांगितली जाते की, जेव्हा लक्ष्मण हे मृत्यूच्या दाढेत आहेत ही बातमी उर्मिलाला समजली, तेव्हा ती हसू लागली होती. झालं असं की मेघनादच्या शस्त्रामुळे लक्ष्मण मूर्च्छित झाले आणि त्यांना वाचवण्यासाठी संकटमोचन हनुमान संजीवनी बुटी घ्यायला जात होते. त्याच वेळेस त्यांना भरतने पाहिलं आणि कारण विचारलं. हनुमान यांनी झालेला सगळा प्रकार भरतला सांगितला.

लक्ष्मण Lakshman Wife Urmila In Ramayana मूर्च्छित झाले आहेत, हे एकूण सर्वांना काळजी वाटू लागली. परंतु उर्मिलाच्या चेहऱ्यावर कोणतीही काळजी नव्हती. जेव्हा उर्मिलाला विचारलं गेलं की, लक्ष्मण इतक्या मोठ्या संकटात आहेत, मग तुमच्या चेहऱ्यावर कोणतीही काळजी का दिसत नाहीये ? तेव्हा उर्मिला हसू लागली आणि म्हणाली, वनवासाला जाताना त्यांनी मला जो दिवा दिला होता, तो दिवा अजूनही पेटतोय. याचा अर्थ त्यांना काही झालेलं नाहीये आणि काही होणार नाही. त्यामुळे मला कशाचीही चिंता नाहीये आणि त्या पुन्हा झोपण्यास निघून गेल्या.

Lakshman Wife Urmila In Ramayana उर्मिलाच्या या त्यागाचा लक्ष्मणाला रावणाविरुध्दच्या युद्धातही फायदा झाला. आपल्याला माहितेय की, रावणाचा मुलगा मेघनाद खूप शक्तिशाली होता. त्याला हरवणं जवळपास अशक्य होतं. कारण त्याला ब्रम्हादेवांकडून वरदान मिळालं होतं की, तुला फक्त तोच व्यक्ती मारू शकेल, त्याने मागील अनेक वर्षे ब्रम्हचर्याचं पालन केलं आहे आणि अनेक वर्षांपासून तो झोपलेला नाहीये. आणि उर्मिलाच्या त्यागामुळे हे सगळं लक्ष्मण यांनी केलं होतं. त्यामुळेचं त्यांना मेघनादचा वध करता आला.

Ramayana Interesting Facts

अशाप्रकारे Lakshman Wife Urmila In Ramayana उर्मिला यांनी त्यांचा पत्नीधर्म निभावला होता आणि लक्ष्मण 14 वर्ष वनवासाला गेल्यानंतर पतीला दिलेली सर्व वचनं निभावली.

पुढे जेव्हा लक्ष्मण, प्रभू श्रीराम आणि माता सीता  वनवासावरून परत अयोध्येत आले. त्यानंतर प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक करण्याचं ठरलं. परंतु त्याचवेळेस लक्ष्मण हसू लागले, हे पाहून सर्वांनाचं आश्चर्य वाटलं.

त्यांना Lakshman Wife Urmila In Ramayana हसण्याचं कारण विचारलं गेलं, तेव्हा ते म्हणाले की, हा क्षण स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी मी आयुष्यभर वाट पाहत होतो. परंतु निद्रादेवीला दिलेल्या वचनामुळे आता मला झोपावं लागेल. माझ्याऐवजी उर्मिला राज्याभिषेक पाहील.

आणि झालं ही तसंच, उर्मिलाने प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक पाहिला आणि लक्ष्मण त्यावेळेस झोपले होते. लक्ष्मण आणि उर्मिला यांच्याबद्दल अशा अनेक आख्यायिका आहेत. या कथा वाल्मिकी रामायणामध्ये सापडत नाहीत, परंतु दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या रामायणामध्ये या कथा आढळतात.

तर तुम्हाला माहीत होत्या का, लक्ष्मण आणि उर्मिला Lakshman Wife Urmila In Ramayana यांच्याबद्दल प्रचलित असलेल्या कथा ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि आमच्या चैनलवरील इतर कथाही नक्कीचं पहा. अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग पौराणिक कथा आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !