WhatsApp New Feature काही वर्षांपूर्वी मोबाईल फोनचा वापर एकमेकांना एसएमएस (SMS) पाठवण्यासाठी व्हायचा. पण जर आज तुम्हाला विचारला की, तुम्ही शेवटचा एसएमएस कधी पाठवला होता, तर कदाचित याचं उत्तर अनेक लोकांना देता येणार नाही. कारण आता एसएमएसची जागा घेतली आहे whatsapp मेसेजने.
व्हाट्सऍप स्मार्टफोनवर सर्वात जास्त वापरलं जाणारं ॲप्लिकेशन आहे. एकमेकांना मेसेजेस पाठवण्यासाठी, चॅटिंग करण्यासाठी, व्हाट्सऍपचा खूप वापर केला जातो. परंतु तुम्ही एखाद्याशी चॅटिंग करत असाल, एखाद्याला मेसेज पाठवला असेल, पण हा मेसेज चुकला तर तुम्ही तो डिलीट करता. मग समोरच्या व्यक्तीला संशय येतो. हा मॅसेज डिलीट का केला ? नेमकं या मेसेजमध्ये काय होतं ? कधीकधी हा मेसेज डिलीट करण्याआधीच समोरचा व्यक्ती वाचतो, तेव्हा तर आणखीनचं प्रॉब्लेम होतो.
WhatsApp New Feature
परंतु आता व्हाट्सऍपने एक नवीन फिचर आणलं आहे आणि ते म्हणजे “तुम्ही पाठवलेला मेसेज एडिट करू शकता” त्यामध्ये बदल करू शकता, सुधारणा करू शकता. हे खूपचं फायद्याचं नवीन फिचर व्हाट्सऍपने आणलं आहे.
या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पाठवलेला व्हाट्सऍप मेसेज WhatsApp New Feature कसा एडिट करू शकता आणि याबद्दल नियम काय आहेत.
१) तुम्ही व्हाट्सऍप मेसेज पाठवला आणि त्यामध्ये काहीतरी चुक झाली आहे किंवा तुम्हाला काही बदल करायचा असल्यास त्या पाठवलेल्या व्हाट्सऍप मेसेजला होल्ड करा.
२) यानंतर तुम्हाला एडिट मेसेज हा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही मेसेज एडिट करू शकतात.
३) परंतु एडिट केलेल्या मेसेजवर एडिटेड हा टॅग दिसेल. म्हणजे तुम्ही ज्याला मेसेज पाठवला आहे, त्यालाही समजेल की तुम्ही हा मेसेज एडिट केलेला आहे.
४) मॅसेज केल्यानंतर फक्त पंधरा मिनिटांच्या आतच तुम्ही हा मेसेज एडिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसणार नाही.
५) WhatsApp New Feature मेसेज एडिट केल्यानंतर आधी मेसेज काय होता, हे समोरच्या व्यक्तीला पाहता येणार नाही. त्याला फक्त तुमचा एडिटेड मेसेजेस दिसेल, त्याची हिस्टरी दिसणार नाही.
एकूणचं व्हाट्सऍपने एक खूपचं कमालीचं आणि चांगलं फीचर आणलं आहे, ज्याचा फायदा अनेकांना नक्कीचं होईल.
जर तुमच्या मोबाईलमध्ये हे फिचर आलं नसेल, तर लवकरात लवकर whatsapp एप्लीकेशन अपडेट करा आणि तरीही नाही आलं तर येत्या काही दिवसात नक्कीचं ते अपडेट होईल.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, ही WhatsApp New Feature माहिती फायदेशीर वाटल्यास आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !