Credit Card Information In Marathi खिशातून पाकीट बाहेर काढलं की, त्यामध्ये खूप सारे क्रेडिट कार्ड असावेत. एक क्रेडिट कार्ड स्वाईप केलं की, हवी ती वस्तू घेता यावी, असं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. कारण क्रेडिट कार्डवर एखादी वस्तू खरेदी करायची आणि मग 45 ते 50 दिवस तुम्हाला ते पैसे फेडण्यासाठी वेळ भेटतो. म्हणजेचं बिनव्याजी कर्ज त्यामुळे क्रेडिट कार्ड दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहेत.
Credit Card Information In Marathi
तुम्हालाही अनेक बँकांचे फोन येत असतील, फोनवरून तुम्हाला फ्री लाईफटाईम क्रेडिट कार्ड, मोठी क्रेडिट लिमिट, रिवोर्ड पॉईंट, नो कॉस्ट ईएमआय, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जात असतील. परंतु क्रेडिट कार्डचे Credit Card Information In Marathi जितके फायदे आहेत, तितके नुकसानही आहेत. अनेक छुपे करही आहेत. हे मात्र कोणी सांगत नाही आणि जर या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील, तर तुम्हाला हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.
सर्वाधिक योजना देणाऱ्या बचत योजना
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड (Credit Card Information In Marathi) बद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
१) क्रेडिट कार्ड बिल : क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी एक नियोजित तारीख असते. पण तुम्ही जर या तारखेच्या आज बिल भरलं नाही, तर तुम्हाला लेट फीज आकारली जाते. त्यामुळे तुम्हाला पैशांचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो. अनेक वेळेस बँका तुम्हाला रिमाइंडर देत नाही, कारण लेट फीस हा त्यांच्या उत्पन्नाचा एक प्रमुख सोर्स असतो.
२) क्रेडिट कार्डवर भरायची संपूर्ण रक्कम : जेव्हा कधी तुम्हाला क्रेडिट कार्डचं किती बिल भरायचं आहे, असा मेसेज येतो. तेथे संपूर्ण भरायची रक्कम आणि कमीत कमी भरायची रक्कम असे दोन ऑप्शन असतात. अनेक लोक हे कमीत कमी भरायची रक्कम भरतात. परंतु त्यामुळे बँक तुम्हाला उरलेल्या रकमेवर व्याज लावतं आणि तुम्हाला पैशांचा भुर्दंड सहन करावा लागतो.
३) क्रेडिट कार्ड अपग्रेडेशन : तुम्हालाही अनेकवेळेस बँकांचे फोन आले असतील की, तुमचं सिल्वर किंवा गोल्ड क्रेडिट कार्ड आता प्लॅटिनम क्रेडिट कार्डमध्ये अपग्रेड केलं जातंय, तेही फ्रीमध्ये. परंतु अनेकवेळेस ही फ्री ऑफर फक्त पहिल्या वर्षासाठी असते. त्यानंतर तुम्हाला मोठी रिन्यूअल फी भरावी लागते.
४) रिवॉर्ड्स पॉईंट : सध्या अनेक कार्डवर खूप सारे रिवार्ड दिले जातात. जसे की एअरपोर्ट लौंज एक्सेस. परंतु अनेकदा ते एक्सपायर होतात आणि तुम्हाला या गोष्टींचा फायदा होत नाही.
५) नो कॉस्ट ई एम आय : सध्या अनेक ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट आणि ॲपवर क्रेडिट कार्ड कंपनी नो कॉस्ट ई एम आय ऑफर करत असतात. परंतु हे खरोखरचं नो कॉस्ट एम आय आहे ,की त्यावर अनेक अटी आणि शर्ती लागू आहेत, हे चेक करण खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर नो कॉस्टच्या ई एम आयच्या लालसेत तुमचा खर्च आणखीनचं वाढू शकतो.
हा Credit Card Information In Marathi लेख फायदेशीर वाटला असेल, तर नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !