Maharashtra Antarjatiy Vivah Yojana : महाराष्ट्र सरकारची आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

Maharashtra Antarjatiy Vivah Yojana

Maharashtra Antarjatiy Vivah Yojana जातिवाद आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी चांगला नाही, असं आपण नेहमीचं म्हणतो. त्यामुळे आपलं राज्यसरकारही जातिवाद कमी करण्यासाठी अनेक योजना आणत असतं. अशीचं एक योजना आहे, “आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना.” आज आम्ही तुम्हाला “महाराष्ट्र सरकारची आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना” याबद्दल माहिती सांगणार आहोत.

काय आहे (Maharashtra Antarjatiy Vivah Yojana) महाराष्ट्र सरकारची आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना

अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. जेथे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन राशी दिली जाते, जी जवळपास तीन लाख रुपयांची आहे.

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेसाठी पात्रता

१) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२) विवाहित जोडप्यापैकी एक जण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा.

३) विवाहित जोडप्याचे लग्नाचे वय वरासाठी 21 वर्षे आणि वधूसाठी 18 वर्ष असावे. पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला असावा.

सरकारी सायकल योजना

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन (Maharashtra Antarjatiy Vivah Yojana) योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

१) दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारस पत्रे

२) वधू-वराचे एकत्रित फोटो

३) विवाह कोर्ट मॅरेज पद्धतीने झालेला असावा. विवाहाचे प्रमाणपत्र.

Maharashtra Antarjatiy Vivah Yojana अर्ज करण्याची पद्धत

विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून घेऊन कागदपत्रांसहित प्रत्यक्षात सादर करावा.

आंतरजातीय प्रोत्साहन योजनेचा लाभ

मागील वर्षीपर्यंत महाराष्ट्र सरकारकडून या Maharashtra Antarjatiy Vivah Yojana  योजनेसाठी 50 हजार रुपयांचा लाभ दिला जायचा.

परंतु या वर्षापासून 3 लाख रुपयांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आलं आहे.

हा Maharashtra Antarjatiy Vivah Yojana लेख फायदेशीर वाटला असेल, तर नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top