Nilesh Sable Chala Hawa Yeu Dya निलेश साबळे लवकरचं कलर्स मराठीच्या हसताय ना ? हसायलाच पाहिजे. या कॉमेडी कार्यक्रमात दिसून येणार आहे. या निमित्ताने तो अनेक मुलाखती देतोय आणि त्याला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्ही चला हवा येऊ द्या कार्यक्रम का सोडला ?
आणि आता एका मुलाखतीत निलेश साबळे ने या प्रश्नाचे उत्तर दिलंय की, (Nilesh Sable Chala Hawa Yeu Dya) त्याने चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम का सोडला ? निलेशने सांगितलं, झी मराठी वाहिनीकडून त्याला सांगण्यात आलं, आपण काही महिन्यांचा गॅप घेऊया आणि हा गॅप जवळपास आठ ते नऊ महिन्यांचा होता.
Nilesh Sable Chala Hawa Yeu Dya
एक कलाकार म्हणून आठ ते नऊ महिने गॅप घेणं, त्या काळात कोणतंही काम न करणं आणि आठ महिन्यानंतर परत येणे, याबद्दल त्याला शाश्वती नव्हती. सगळी टीम विखरली जाईल, त्यानंतर पुन्हा तशी गट्टी जमून येणार नाही. या विचाराने निलेश साबळेने चला हवा येऊ द्या सोडण्याचं ठरवलंय.
निलेश साबळे महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहतो का ?
निलेशला हेही विचारलं गेलं की, तुम्ही महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहता का आणि या कार्यक्रमाशी स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल ? तेव्हा निलेशने सांगितलं, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा असलेले सचिन गोस्वामी सर हे त्याचे गुरु आहेत. तो त्यांच्याकडूनचं लिखाण शिकला. त्यामुळे तो हा कार्यक्रम पाहतो.
फिल्मफेअर अवॉर्डमध्ये मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अवतार
आणि आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या खूप मोठी आहे. काही लोकांना आम्ही हसवू, काही लोकांना ते हसवतील. सर्वांनाचं प्रेक्षक वर्ग मिळतो असेही त्याने सांगितलं.
हसताय ना हे कार्यक्रमाचं नाव कसं सुचलं ?
हसताय ना, हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाचं नाव कसं सुचलं याबद्दलही त्याने उत्तर दिलं की, एक दिवस कलर्स मराठीचे केदार शिंदे यांचा त्याला फोन आला आणि त्यांनी विचारलं की, सध्या एखादं महत्त्वाचं काम हातात आहे का ? तर निलेश साबळेने नकार दिला.
त्यानंतरच केदार शिंदेंबरोबर त्याने या नवीन कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कार्यक्रमाचं नाव काय ठेवावं, हा विचार करत असताना केदार शिंदे यांनी त्याला हसताय ना, हसायलाच पाहिजे हे नाव ठेवूया, असं सुचवलं आणि निलेशही तयार झाला.
Nilesh Sable Chala Hawa Yeu Dya एकूणचं हसताय ना, हसायलाचं पाहिजे येत्या काही दिवसात प्रेक्षकांच्या भेटीस येईल आणि नक्कीचं प्रेक्षकांना हसवेल असं वाटतंय.
Nilesh Sable Chala Hawa Yeu Dya तर तुम्ही सुद्धा एक्साईटेड आहात का हा कार्यक्रम पाहण्यासाठी ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !