Aai Kuthe Kay Karte News : सतत रडण्याचे सीन्स केल्याने अरुंधतीला झाला हा आजार

Aai Kuthe Kay Karte News

Aai Kuthe Kay Karte News मागील पाच वर्षांपासून स्टार प्रवाह वाहिनीची प्रसिद्ध मालिका आई कुठे काय करते प्रेक्षकांची फेवरेट आहे. या मालिकेला अनेकदा ट्रोलही करण्यात येतं. परंतु प्रत्येकाच्या तोंडात या मालिकेचचं नाव असतंचं. सध्या आशुतोषचा मृत्यू आणि त्यानंतर अरुंधतीचं दुःख, तिची होणारी घुसमट या मालिकेतून दाखविली जातेय.

Aai Kuthe Kay Karte News

मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूळकरने या सर्वांवर भाष्य केलं आहे. तिने नुकतीचं एक मुलाखत दिली आणि या मालिकेत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगितलं. मधुराणी सांगते की, डेली सोपमध्ये काम करायचं म्हणजे रोज 12 – 13 तास काम करावं लागतं.

या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

आणि मी जेव्हा कोणतीही भूमिका करते, मी पूर्णपणे त्या भूमिकेशी समरस होते. माझ्या वैयक्तिक आयुष्यभर सुद्धा मला त्याचा प्रभाव जाणवतो. काही दिवसांपूर्वी जेव्हा आशुतोषचा मृत्यू झाला, हा ट्रॅक सुरू होता. तेव्हा सलग तीन-चार दिवस माझे 12 – 13 तास रडण्याचे सीन्स होते.

आई कुठे काय करते मालिकेमुळे अरुंधतीला झाला हा आजार

त्यामुळे माझ्या छातीवर खूप दडपण आलं होतं. मला एक दिवस तर चक्करही आली. त्यानंतर मी काही गोळ्या घेऊन काम केलं. मी त्यातून बरे झाले. परंतु मला खूप थकवा आला होता. एकदा मी माझ्या बहिणीकडे गेले, तिला बरं नव्हतं म्हणून तिची मदत करायला. पण तेथे जाऊन मी झोपले.

जेव्हा तुम्ही एखाद्या भूमिकेत पूर्णपणे समरस होतात. तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही होतो. काही लोकांना जमतं की, पर्सनल आयुष्य आणि अॅक्टींग करिअर वेगळं ठेवण. पण मला तसं जमत नाही. हे एक नुकसान आहे, पण त्याचबरोबर मी माझ्या भूमिकेला चांगला न्याय देऊ शकते, हेही तेवढचं खरं.

एकूणचं या Aai Kuthe Kay Karte News मालिकेला सोशल मीडियावर कितीही ट्रोल केलं गेलं तरी मालिकेतील कलाकारांची कामं ही खूपचं उत्तम होत आहेत, यात दुमत नाही. त्यातचं अरुंधती म्हणजे मधुराणीने तर जसं जीव ओतून काम केलं आहे, तिचा अभिनय हा वाखाण्याजोगा आहे.

2019 मध्ये लॉकडाऊन सुरू होण्याआधी ही मालिका सुरु झाली होती. या मालिकेने स्टार प्रवाह वाहिनीचं भाग्य सुद्धा बदललं. या मालिकेनंतरच स्टार प्रवाह ही महाराष्ट्रातील नंबर वन मालिका बनली. त्यामुळे मालिकेला कितीही ट्रोल केलं गेलं, तरी मालिका बंद न करण्याचं स्टार प्रवाहने ठरवलेलं दिसतंय.

तर तुम्ही पाहतात का आई कुठे काय करते Aai Kuthe Kay Karte News मालिका ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेख नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top