How To Open Bank Account जसं प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड आणि रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. तसंच बँक अकाउंट असणंही गरजेचं आहे. बँक अकाउंट असण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही एक बचत करण्याचं साधन म्हणूनसुद्धा बँक अकाउंटचा वापर करू शकता.
आज-काल शहरांमध्ये तर बँक अकाउंट उघडणं, प्रत्येकालाचं माहीत असतं. परंतु अनेक गावांमध्ये बँका नसतात. तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावांमध्ये बँकेच्या शाखा असतात. अशा वेळेस तेथे खूप गर्दी असते आणि बँक अकाउंट उघडणं शक्य होत नाही.
How To Open Bank Account
त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही बँक अकाउंट सोप्या पद्धतीने कसे उघडू शकता आणि (How To Open Bank Account) घरबसल्या बँक अकाउंट उघडता येतं का ?
काही वर्षांपूर्वी फक्त बँकेत जाऊनचं तुम्हाला अकाउंट उघडता यायचं. त्यासाठी खूप मोठी रांग असायची. परंतु आता प्रत्येक बँकेने ग्राहक सेवा केंद्र उघडलं आहे. तेथे तुम्हाला फॉर्मही मिळतो आणि सर्व माहितीही सांगितली जाते आणि अवघ्या काही तासांमध्ये तुमचं बँक अकाउंट उघडता येतं. त्यामुळे तुम्ही अशा ग्राहक सेवा केंद्रांना भेट देऊ शकता.
त्याचबरोबर अनेक प्रायव्हेट आणि सरकारी बँकांचे अकाउंट तुम्ही घरबसल्या मोबाईल वरून किंवा कॉम्प्युटरवरून उघडू शकता. काही प्रायव्हेट बँकांचे कर्मचारी तर घरी येऊन तुमची सगळी कागदपत्र गोळा करतात आणि तुमचं अकाउंट उघडतात. ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक अशा काही बँकांचे अकाउंट घरबसल्या ऑनलाईन उघडता येऊ शकतात.
How To Open Bank Account बँकेचं अकाउंट उघडण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्र
१) ओळखपत्र
बँक अकाउंट उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे बँकेत चौकशी केल्यास तुम्हाला इतर ओळखपत्रांबद्दलही माहिती समजू शकते.
२) पॅन कार्ड
३) रहिवासी असल्याची कागदपत्र
यामध्ये तुमच्याकडे लाईट बिल किंवा रेशन कार्डची मागणी केली जाऊ शकते.
(How To Open Bank Account) बँकेत अकाउंट उघडण्यासाठी लागणारी फीस
जनधन योजनेसारख्या अनेक योजनांमध्ये तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट उघडू शकता. परंतु जर तुम्हाला अनेक सुविधांचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यात बँकेच्या नियमानुसार बचत ठेवावी लागते.
सरकारी बँकांमध्ये एक हजार रुपये जमा करावे लागतात, तर काही प्रायव्हेट बँकांमध्ये दहा हजार रुपये बॅलन्स ठेवावा लागतो.
बँक अकाउंटचे प्रकार
१) बचत खाते
२) चालू खाते
बँक अकाउंट उघडण्याचे फायदे
(How To Open Bank Account) आजच्या आधुनिक युगात बँक अकाउंट असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या पैशांची बचत तर होतेचं. परंतु त्याचबरोबर तुम्ही एखादी नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, तर समोरची व्यक्ती तुम्हाला या बँक अकाउंटवर पैसे पाठवू शकते. त्याचबरोबरचं तुम्हाला एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, चेकबुक, ओव्हर द्राफ्ट, अशा अनेक फॅसिलिटीही मिळू शकतात.
या How To Open Bank Account लेखातील माहिती फायदेशीर वाटली असेल, तर नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
धन्यवाद !