Honeymoon First Night Story पंकज आपल्या खोलीमध्ये बसून फोनवर मेसेजेस चेक करत होता. त्याला मित्रांचे, नातेवाईकांचे खूप सारे मेसेजस आले होते. सर्वांच्या लग्नाच्या शुभेच्छाना तो थँक्यू म्हणून रिप्लाय करत होता. पंकज घड्याळाकडे पाहतो आणि विचार करतो, “माझी बायको आज रूममध्ये येईल की नाही काय माहित ? दिवस तर बदललाय. माझं लग्न काल झालं होतं. रात्रीचे एक वाजलेत. कधी येते कोणास ठाऊक ? या सर्वांना मेसेज करण्यातचं रात्र संपेल की काय मधुचंद्राची ?”
तेवढ्यात बेडरूमच्या दरवाजावर कोणीतरी नॉक करतं. पंकज विचारतो, “कोण आहे ?” परंतु समोरून काहीच आवाज येत नाही. फक्त हसण्याचा आवाज येतो. चार मैत्रिणी आणि नातेवाई पंकजची बायको रश्मीला खोलीमध्ये ढकलतात आणि दरवाजा बाहेरून बंद करून घेतात.
Honeymoon First Night Story
रश्मी खूप घाबरलेली असते. कावरी बावरी झालेली असते. तिच्या हातात दुधाचा ग्लास असतो. लग्नामध्ये रश्मीकडे पाहून पंकज हा स्तब्ध झाला होता आणि आताही तिचं सौंदर्य पाहून तो तिच्याकडे एकटक पाहतचं बसतो. रश्मीच्या लक्षात ही गोष्ट येते. परंतु पंकजच्या नजरेला नजर देण्याची तिची काही हिम्मत होत नाही आणि ती जागेवरचं उभी राहते.
Honeymoon First Night Story पंकज भानावर येतो आणि रश्मीला विचारतो, “काय झालं, का थांबलीस ? ये ना बस येथे.” रश्मी होकारात मान डोलावते आणि पुढे येते. ती पंकजसमोर दुधाचा ग्लास पकडते. पंकज तिला म्हणतो, “आता याची काही गरज नाहीये, ठेव बाजूला.” रश्मी दुधाचा ग्लास साईड टेबलवर ठेवते आणि तशीच उभी राहते.
पंकज रश्मीला विचारतो, “जोपर्यंत मी तुला काही सांगणार नाही, तोपर्यंत तू काहीचं करणार नाहीस का ? Honeymoon First Night Story आजपासून तुझीचं बेडरूम आहे ही, बस येथे.” रश्मी पंकजशेजारी बसते, परंतु ती खूप घाबरलेली आहे, हे पंकजच्या लक्षात येतं. पंकज तिचा हात हातात घेतो. रश्मीच्या अंगावर शहारे येतात. पंकजलासुद्धा खूप छान वाटतं. पंकज रश्मीला म्हणतो, “घाबरू नकोस, तुला काही त्रास होतोय का, सांग मला.”
रश्मी म्हणते, “काही नाही. बाहेर सगळे खूप चेष्टा मस्करी करत होते. विचित्र बोलत होते. मला खूप भीती वाटली.” पंकज गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो, “इकडे पहा माझ्याकडे.” रश्मीची नजर अजूनही खालीच असते. ती पंकजकडे घाबरलेल्या नजरेने पाहते. पंकज तिला म्हणतो, “घाबरू नकोस. तू बाहेर जे काही ऐकलं असेल किंवा मधुचंद्राच्या रात्री बद्दल तुला जे काही माहीत असेल, तसं आपल्यामध्ये काहीही होणार नाहीये. आज रात्री आपण फक्त एकमेकांना समजून घेणार आहोत. मस्त गप्पा मारणार आहोत.
मधुचंद्राच्या रात्रीची गोष्ट
Honeymoon First Night Story आपल्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे. महिन्याभरापूर्वीचं आपण एकमेकांना भेटलो. मग घाई गडबडीत लग्न झालं. एकमेकांशी बोलण्याचा, विचार जाणून घेण्याचा जास्त वेळही नाही मिळाला. मला कोणतीही घाई नाहीये. आधी आपण एकमेकांना समजून घेऊया, जाणून घेऊया आणि मग आपण आपल्या संसाराला सुरुवात करू.”
Honeymoon First Night Story रश्मीच्या चेहऱ्यावरही स्माईल येते आणि ती म्हणते, “मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचं होतं. परंतु भीती वाटत होती. मी माझ्या ताईला म्हणाले, तर ताई म्हणाली, असं चुकूनही बोलू नकोस. नाहीतर तुझा नवरा नाराज होईल.” पंकज म्हणतो, “नाही मी नाही नाराज होणार, कारण माझासुद्धा हाच विचार आहे.
Honeymoon First Night Story नवरा बायको होण्याआधी, संसाराला सुरुवात करण्याआधी, आपण दोघे चांगले मित्र होऊया. एकमेकांना समजून घेऊया. तरचं आपला संसार हा आणखीन सुखाचा होईल.” रश्मी म्हणते, “खरंच मला सुद्धा मैत्रीचं नातं खूप आवडतं. मला तुमच्याशी सगळं शेअर करायचंय. तुम्हाला सर्व सांगायचय. आपण खूप मस्त राहूया. आनंदाने संसार करूया.”
Honeymoon First Night Story पंकज म्हणतो, “पाहिलं का, आता कशी घडाघडा बोलायला लागलीस, एवढा वेळ तर खूप घाबरली होतीस ना.” रश्मी म्हणते, “हो ना, मला खूप टेन्शन आलं होतं. परंतु तुम्ही माझं टेन्शन एका मिनिटात कमी केलंत थँक्यू.” पंकज म्हणतो, “आता तर म्हणालीस की, आपण मित्र होऊ आणि मित्रामध्ये सॉरी आणि थँक्यू नसतं, हे तुला माहित नाही का ?” रश्मी हसते. पंकज म्हणतो, “मला तुझी ही स्माईल खूप आवडते, जर तुझ्याकडे ही स्माईल नसती, तर कदाचित मी तुला पसंतचं केल नसतं.”
मराठी कथा
रश्मी पुन्हा एक गोड स्माईल देते. पंकज म्हणतो, “आता जास्त स्माईल करू नकोस, नाहीतर मी जे काही बोललोय, तेही विसरून जाईल.” रश्मी खळखळून हसू लागते. संपूर्ण रूम तिच्या हसण्याच्या आवाजाने भरून जातो. पंकज म्हणतो, “आता जर बाहेरच्या लोकांनी हा हसण्याचा आवाज ऐकला, तर त्यांना शंका वाटेल की, मी असं काय करतोय, ज्यामुळे तू इतकी हसायला लागलीस ?” पंकजचं बोलण ऐकून रश्मी आणखीन जोरात हसू लागते. पंकजलासुद्धा हसू कंट्रोल होत नाही. संपूर्ण घरात या दोघांच्या हसण्याचा आवाज येऊ लागतो.
Honeymoon First Night Story मधुचंद्राच्या त्या रात्री पंकज आणि रश्मी दोघे एकमेकांशी खूप गप्पा मारतात. आपल्या बालपणाविषयी, शिक्षणाविषयी, आपल्या आयुष्यातील विविध घटनांविषयी, एकमेकांच्या आवडी निवडी सगळ्या जाणून घेतात आणि दोघेही आनंदाने एकमेकांचा हात हातात घेऊन झोपी जातात.
तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही मधुचंद्राची अनोखी रात्र Honeymoon First Night Story , नक्कीचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !