Ashutosh Sharma In IPL आयपीएलमध्ये मुंबई विरुद्ध पंजाब या दोन संघांमध्ये रंगतदार सामना झाला. मुंबई इंडियन्सने पंजाबचा ९ धावांनी पराभव केला. परंतु या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पंजाबच्या आशुतोष शर्मा या फलंदाजाने.
मुंबईच्या गोलंदाजांसमोर पंजाबच्या फलंदाजांची नामुष्की होत असताना त्यांच्या सहा विकेट्स पडलेल्या असतानाही आशुतोष शर्मा मैदानात आला आणि त्याने धमाका केला. तुफान फटकेबाजी करत त्याने अर्धशतक झळकावलं. मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. जसप्रीत बुमराला त्याने मारलेला षटकार तर पुढील अनेक वर्ष सर्वांच्याचं लक्षात राहील.
Ashutosh Sharma In IPL
त्यामुळे सगळेचं आशुतोष शर्माबद्दल सोशल मीडियावर चर्चा करताना दिसत आहेत. मग हा आशुतोष शर्मा नेमका आहे तरी कोण ? तो कोणत्या संघाकडून खेळतो ? त्याचा प्रवास कसा आहे ? आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
Ashutosh Sharma In IPL आशुतोष शर्मा हा मूळचा मध्य प्रदेशमधील रतलाम या शहरातील आहे. लहानपणापासूनचं त्याला क्रिकेटर बनायचं होतं. परंतु रतलाम शहरात क्रिकेटशी निगडीत सुविधा नसल्यामुळे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्याने आपलं शहर सोडलं आणि तो इंदोरला आला.
रोहित शर्माची प्रेमकहाणी माहितेय का ?
येथेचं इंदोर क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये त्याने क्रिकेटबद्दलचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. मागील वर्षी त्याने अरुणाचल प्रदेश विरुद्ध अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकत युवराज सिंगचा सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा रेकॉर्ड मोडला होता. तेव्हा तो चांगलाचं चर्चेत आला.
बुमराहची धुलाई करणारा आशुतोष शर्मा कोण ?
मध्यप्रदेश क्रिकेट संघाकडून खेळता खेळता त्याने रेल्वे क्रिकेट संघाचंही प्रतिनिधित्व केलं आहे. आपल्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलताना तो सांगतो की, 2021 ते 2023 हे दोन वर्ष त्याच्यासाठी खूप अवघड होते.
मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे एका कोच आहेत. त्यांनी त्याला पूर्णपणे दुर्लक्षित केलं आणि आवडीच्या खेळाडूंना संधी दिली. या दोन वर्षांमध्ये कोणताही सामना खेळणं त्याच्यासाठी अवघड होतं. तो परफॉर्मन्स देत होता, परंतु संघात त्याची निवड केली जात नव्हती.
परंतु आता आशुतोष शर्माने आयपीएलमध्ये आपली चमक दाखवली आहे आणि सगळ्यांच्या तोंडात त्याचचं नाव आहे. तो जर अशी चमकदार कामगिरी करत राहिला, तर लवकरचं भारतीय संघाचे दरवाजेही त्याच्यासाठी उघडे होतील, यात शंका नाही.
Ashutosh Sharma In IPL तर तुम्हाला आवडली का आशुतोष शर्माची ही खेळी ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि खेळाशी निगडित अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !