Hitman Rohit Sharma Love Story : हिटमॅन रोहित शर्माची लव्हस्टोरी माहितेय का ?

Hitman Rohit Sharma Love Story

Hitman Rohit Sharma Love Story भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या सर्वांचा आवडता आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्येही तो तुफान फटकेबाजी करतोय आणि येणाऱ्या टी – ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये तोच भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे.

क्रिकेटच्या मैदानात रोहित शर्माला क्लीन बोल्ड करणं भल्या भल्या गोलंदाजांना जमत नाही. परंतु रोहित शर्माला एका मुलीने क्लीन बोल्ड केलं होतं आणि ती मुलगी आज रोहित शर्माची बायको आहे. आज आपण रोहित शर्माची प्रेम कहाणी जाणून घेणार आहोत.

Hitman Rohit Sharma Love Story

2009 मध्ये रितिका आणि रोहित या दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हा रितिका सजदेव ही भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगची स्पोर्ट्स मॅनेजर होती. तशीच ती त्याची लांबच्या नात्यातील बहीणही आहे.

पहिल्या भेटीतचं रोहित शर्माला रितिका खूप आवडली होती. परंतु तेव्हा रोहित हा एवढा प्रसिद्ध नव्हता, मोठा खेळाडू नव्हता. त्यामुळे रितिकाने त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. परंतु रोहितला रितिका आवडते, ही गोष्ट युवराज सिंगच्या लक्षात आली होती आणि त्याने रोहितला समज दिली की, ती माझी बहीण आहे, तिच्यापासून लांब राहा.

Hitman Rohit Sharma Love Story परंतु रोहित शर्मा हा रितिकाच्या प्रेमात पडला होता. हळूहळू या दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. त्यांच्यात मैत्री झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु रितीकाला आय लव्ह यु म्हणण्याची रोहितची हिम्मत होत नव्हती.

तात्या विंचू परतणार

शेवटी 2015 मध्ये रोहित शर्माने आपलं क्रिकेट करियर ज्या बोरिवली स्पोर्ट्स अकॅडमीमधून सुरू केलं होतं, तेथे रितिकाला नेलं आणि तेथेचं गुडघ्यावर बसून तिला प्रपोज केलं होतं. रितिका त्याच्या प्रपोजला नाही म्हणू शकली नाही आणि मग 2015 मध्ये त्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये लग्न केलं.

Hitman Rohit Sharma Love Story 2018 मध्ये या दोघांना एक गोंडस मुलगी ही झाली. रितिका नेहमीचं रोहितला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर दिसून येते. या दोघांची केमिस्ट्री खूप क्युट आहे. हे कपल सर्वांनाचं आवडतं.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2023 च्या वर्ल्डकप फायनल पर्यंत पोहोचला होता. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या हातून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आता 2024 च्या t20 वर्ल्ड कपमध्ये भारतीयांचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न नक्कीचं पूर्ण होईल, अशी अपेक्षा केली जातेय.

क्रिकेटच्या अशाचं नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top