Zapatlela 3 Release Date ओम फट स्वाहा असं म्हणणारा तात्या विंचू आठवला की, सर्वांचीच बोबडी वळते. झपाटलेला या चित्रपटातून सर्वांच्या भेटीस आलेला तात्या विंचू आज 30 वर्षानंतरही सर्वांच्या आठवणीत आहे. मराठीतील सर्वात खतरनाक विलन म्हणून त्याला ओळखलं जातं.
महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुख्य भूमिका असलेला झपाटलेला आजही सगळ्या मराठी प्रेक्षकांचा फेवरेट सिनेमा आहे . काही वर्षांपूर्वी महेश कोठारेने आपला मुलगा आदिनाथ कोठारेला घेत या चित्रपटाचा दुसरा भाग तयार केला होता. हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडलेला आणि आता महेश कोठारे यांनी झपाटलेला 3 Zapatlela 3 Release Date या चित्रपटाची घोषणा केली आहे.
Zapatlela 3 Release Date
झपाटलेला 3 या आधीच्या दोन्ही चित्रपटांपेक्षा जास्त भव्य दिव्य असेल. या चित्रपटात नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. आदिनाथ कोठारे झपाटलेला 3 मध्ये मुख्य भूमिका साकारेल आणि त्याचबरोबर तात्या विंचू पुन्हा एकदा प्रेक्षकांना घाबरवण्यास येईल, हे मात्र नक्की.
महाराष्ट्राची हास्यजत्रा अभिनेत्याने घेतली नवी कार
झपाटलेला 3 चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर चांगलंच व्हायरल झालंय आणि सगळेचं झपाटलेला 3 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 1993 मध्ये रिलीज झालेला झपाटलेला मराठीतील क्लासिक म्हणून ओळखला जातो.
महेश कोठारेंचा झपाटलेला 3 लवकरचं रिलीज होणार
त्या काळात टेक्नॉलॉजी एवढी पुढारलेली नसतानाही महेश कोठारे यांनी बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारे कलाकार रामदास पाध्ये यांच्या मदतीने तात्या विंचू या बाहुल्याला जिवंत केलं होतं. त्याच्या हालचाली पडद्यावर जिवंत केल्या होत्या. ज्यामुळे सर्वांनाचं आश्चर्य वाटलं होतं.
Zapatlela 3 Release Date अशा धाटणीचा त्यावेळेस तो मराठीतील पहिला चित्रपट होता आणि संपूर्ण देशभरात या चित्रपटाने बातम्या जमवल्या. मराठीत हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. तात्या विंचू समोर आल्यावर महेश महेश म्हणून ओरडणारा लक्ष्या आणि त्याला वाचवण्यासाठी जीवाचं रान करणारा इन्स्पेक्टर महेश जाधव आजही प्रेक्षकांच्या आठवणी ताजा आहे.
झपाटलेला 3 लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येईल. परंतु लक्ष्मीकांत बेर्डे आता हयात नाहीत. त्यांची कमी सर्वांनाचं जाणवते आणि सोशल मीडियावर सगळे याबद्दलच बोलत आहे की, लक्ष्या मामाशिवाय झपाटलेला चित्रपटाला ती मज्जा नाही.
तर तुम्ही एक्साईटेड आहात का झपाटलेला 3 Zapatlela 3 Release Date पाहण्यासाठी ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !