All Information About VISA In Marathi आयुष्यात एकदा तरी विमानात बसायचं आणि विमानात बसून परदेशात जायचं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकांचं हे स्वप्न पूर्णही होतं आणि त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळते मग ते काही कामानिमित्त असो किंवा फिरण्यासाठी. परंतु परदेशात जाण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची सर्वात जास्त आवश्यकता आहे, पहिली गोष्ट म्हणजे “पासपोर्ट” आणि दुसरी म्हणजे “व्हिसा.”
पासपोर्टबद्दल सर्व माहिती आम्ही आधीचं एका लेखात दिली आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक करून ती पाहू शकता.आज या लेखामध्ये आपण व्हिसाबद्दल (All Information About VISA In Marathi) सर्व माहिती जाणून घेऊया.
All Information About VISA In Marathi
अगदी सोप्या शब्दात व्हिसा म्हणजे “तुम्हाला ज्या देशात जायचंय, त्या देशाने तुम्हाला दिलेली परवानगी की, हो तुम्ही आमच्या देशात येऊ शकता आणि येथे काही काळ राहू शकता.”
व्हिसा या शब्दाचा फुल फॉर्म
“Visitors International Stay Admission” हा व्हिसा या शब्दाचा फुल फॉर्म आहे.
व्हिसाचे कोणते प्रकार आहेत ?
तुम्हाला परदेशात कोणत्या कामासाठी जायचंय, तुमचा उद्देश काय, यानुसार व्हिसाचे अनेक प्रकार आहेत.
१) ट्रॅव्हल व्हिसा : जर तुम्हाला परदेशात फिरण्यासाठी पर्यटनासाठी जायचं असेल तर त्यासाठी ट्रॅव्हल व्हिसासाठी अप्लाय करावा लागतो. हा व्हिसा मिळवणं खूपच सोपं असतं.
२) ट्रान्झिट व्हिसा : जर तुम्हाला दुसऱ्या देशात जायचं आहे, परंतु या प्रवासामध्ये तुम्ही एका तिसऱ्या देशात थांबणार असाल, तर त्यासाठी ट्रान्झिट व्हिसा आवश्यक असतो.
३) स्टुडन्ट व्हिसा : परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट व्हिसा आवश्यक असतो.
४) मेडिकल व्हिसा : तुम्हाला जर परदेशात इलाजासाठी जायचं असेल, ट्रीटमेंटसाठी जायचं असेल, तर त्यासाठी मेडिकल व्हिसा लागतो.
५) मॅरेज व्हिसा : प्रदेशात जर तुम्हाला लग्न करायचं असेल, तर त्यासाठी मॅरेज व्हिसा लागतो.
६) बिजनेस व्हिसा : जे लोक प्रदेशात जाऊन बिजनेस करतात, त्यांच्यासाठी बिझनेस विजा आवश्यक असतो.
७) All Information About VISA In Marathi व्हिसा ऑन अरायव्हल : असे अनेक देश आहेत, जेथे व्हिसा ऑन अरायव्हलची फॅसिलिटी उपलब्ध असते. म्हणजे तुम्हाला भारतातून व्हिसासाठी अप्लाय करण्याची गरज नाही. त्या देशाच्या विमानतळावर पोहोचल्यावर तुम्हाला ते व्हिसा देतात.
याव्यतिरिक्त वर्क परमिट, प्रोजेक्ट रिसर्च, डिप्लोमॅट, असे अनेक प्रकारचे व्हिसाही असतात.
(All Information About VISA In Marathi) व्हिसासाठी अर्ज कसा करायचा ?
व्हिसासाठी अर्ज करायला तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.
१) ऑफलाइन : तुम्हाला ज्या देशाचा व्हिसा हवा आहे, त्या देशाच्या दूतावासात जाऊन अर्ज भरून, कागदपत्र जमा करून तुम्ही व्हिसासाठी अप्लाय करू शकता.
२) ऑनलाइन : सध्याच्या इंटरनेटच्या जगात व्हिसासुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतो. त्या संबंधित देशाचे याबद्दलचे नियम आहेत.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, ही All Information About VISA In Marathi माहिती तुम्हाला फायदेशीर वाटली असल्यास नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.
धन्यवाद !