First Airplane Journey विमान प्रवास करणं हे प्रत्येक भारतीय मध्यमवर्गीय माणसाचं स्वप्न असतं. आयुष्यात एकदा तरी विमानात बसायचं, हे स्वप्न प्रत्येकानेचं पाहिलेलं असतं. आधीच्या काळात तर विमान प्रवास खूप महागाचा होता. सामान्य माणूस फक्त स्वप्न पाहू शकत होता. पण आता मात्र हे सहज शक्य आहे कारण सध्या पाच हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्ही दोन शहरांमध्ये विमान प्रवास करू शकतात.
त्यातचं जर तुम्ही पहिल्यांदाचं विमान प्रवास करणार असाल तर सर्वांनाच भीती वाटते की, आपल्याकडे कोण कोणती कागदपत्रे असायला हवीत ? पासपोर्ट असायला हवा का ? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.
First Airplane Journey
पहिल्यांदा विमान प्रवास करताय, मग तुमच्याकडे ही कागदपत्र असणं खूप गरजेचं आहे.
जर तुम्ही देशांतर्गत विमान प्रवास करत असाल, तर तुमच्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं नाहीये.
देशांतर्गत विमान प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे विमानाचं तिकीट आणि भारत सरकारने जारी केलेलं एखादं छायाचित्र प्रमाणित ओळखपत्र असायला हवं.
असं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर आयडी.
जर तुम्ही विदेशात प्रवास करत असाल, आपल्या देशातून दुसऱ्या देशात विमानाने जात असाल, तर मात्र तुमच्याजवळ पासपोर्ट असणं बंधनकारक आहे.
विदेशात प्रवास करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
असे अनेक देश आहेत, ज्या देशांमध्ये भारतीयांना विजाची गरज नसते किंवा विजा ऑन अरायव्हल असतं. अशावेळेस तुमचा पासपोर्ट तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. विदेशात हीच तुमची भारतीय असल्याची ओळख आहे.
वेळोवेळी पासपोर्ट वैध आहे की नाही, म्हणजेच पासपोर्टची एक्सपायरी डेट चेक करायला हवी.
एकूणच देशांतर्गत आणि देशाबाहेर विमानाने प्रवास करण्यासाठी First Airplane Journey वेगवेगळे नियम आहेत. परंतु जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल, तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नसेल, एवढं मात्र नक्की.
तर मग कधी करताय तुमच्या First Airplane Journey पहिल्या विमान प्रवासाचं तिकीट बुक ? की तुम्ही याआधी कधी विमान प्रवास केलाय ? केला असेल तर कसा होता तुमचा अनुभव ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि ही माहिती फायदेशीर वाटली असल्यास, आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
धन्यवाद !