Bramha Temple In Pushkar : ब्रम्हदेवाच्या एकमेव मंदिराची कथा माहितेय का ?

Bramha Temple In Pushkar

Bramha Temple In Pushkar भारत देशाच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात आपल्याला विविध देवदेवतांची हजारो लाखो मंदिरे दिसतात. जर प्रत्येक देवाची या देशामध्ये किती मंदिर आहेत, हे शोधायला गेलं तर प्रत्येक देवाची नक्कीचं शेकडो, हजारो, लाखोंच्या घरात मंदिरं आपल्याला सापडतील.

परंतु तुम्हाला माहितीये का, जे त्रिमूर्ती आद्यदेवता म्हणून ओळखले जातात. त्या ब्रम्हा विष्णू आणि महेश यांच्यापैकी ब्रह्मदेव यांचं संपूर्ण भारतात फक्त Bramha Temple In Pushkar एकचं मंदिर आहे. मग इतर देवतांची हजारो लाखो मंदिरं देशात आहेत, तर मग ब्रह्मदेवांबरोबरचं असा भेदभाव का ? संपूर्ण देशात त्यांचे एकच मंदिर का आहे ? ब्रह्मदेवांचं एकमेव मंदिर आहे तरी कोठे ? आणि यामागे काय कथा आहे ? आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

Bramha Temple In Pushkar 

भारतातील राजस्थान या राज्यामध्ये पुष्कर या ठिकाणी ब्रह्मदेवाचं एकमेव पुरातन मंदिर आहे. संपूर्ण देशात तुम्हाला ब्रह्मदेवाचं दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी मंदिर सापडणार नाही. सर्वात आधी आपण या मंदिरामागे असलेली कथा Bramha Temple In Pushkar जाणून घेऊया.

भारतात ब्रह्मदेवांचं एकचं मंदिर असल्याचं कारण म्हणजे त्यांना मिळालेला एक श्राप. ही कथा अशी आहे की, एकदा ब्रह्मदेवांनी राजस्थानातील पुष्कर येथे एक यज्ञ आयोजित केला. हा यज्ञ कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा या काळात होता.

या यज्ञासाठी ब्रह्मदेवांनी सर्व देवी देवता, पृथ्वीवरील प्रतिष्ठित नागरिक, प्राणी पक्षी या सर्वांना आमंत्रण दिलं आणि सगळे लोक तेथे उपस्थित झाले. ब्रह्मदेव स्वतः यज्ञासाठी बसणार होते. ते स्वतः सुद्धा या यज्ञासाठी आले. यज्ञ समारंभाची वेळ झाली, परंतु त्यांची पत्नी सावित्री त्या ठिकाणी पोहोचल्या नाहीत.

पुष्करमध्ये ब्रम्हदेवाचं एकमेव मंदिर

यज्ञासाठी असलेला शुभ मुहूर्त निघून जात होता आणि अजूनही ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री तेथे पोहोचली नव्हती. हा मुहूर्त निघून जाऊ नये, यासाठी ब्रह्मदेवांनी तेथे उपस्थित असलेल्या नंदिनी गाईच्या मुखातून गायत्रीला प्रकट केलं आणि तिच्याशी लग्न केलं. ब्रम्हदेवांनी मग आपली पत्नी म्हणून गायत्रीला बाजूला बसवून हा यज्ञ पूर्ण केला.

त्यांनी असं केलं कारण जर ब्रह्मदेव पत्नीशिवाय या यज्ञात बसली असते, त्यांनी हा यज्ञ पूर्ण केला असता, तर त्याचं फळ मिळालं नसतं. हा यज्ञ पूर्ण झाला. परंतु त्याचंवेळेस ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री तेथे आली आणि ब्रह्मदेवांनी आपल्याला सोडून दुसऱ्या एका मुलीशी लग्न केलंय, हे पाहून त्यांना खूप राग आला.

Bramha Temple In Pushkar आणि त्याचंवेळेस त्यांनी ब्रह्मदेव यांना एक श्राप दिला. या जगात कोणीही ब्रह्मदेवांची पूजा करणार नाही. कुठेही ब्रह्मदेवांचं मंदिर असणार नाही. हा श्राप ऐकून सर्व देवी देवतांना जबर धक्का बसला आणि त्यांनी सावित्री देवींना प्रार्थना केली की, तुम्ही तुमचा श्राप मागे घ्या.

सावित्री देवी यासाठी तयार झाल्या आणि त्यांनी दिलेल्या श्रापात बदल केला की, फक्त जगभरात पुष्कर या ठिकाणी ब्रह्मदेवांचं एकमेव मंदिर असेल आणि तेथेचं त्यांची पूजा केली जाईल. या व्यतिरिक्त संपूर्ण जगात कोठेही त्यांचं मंदिर नसेल आणि पूजा केली जाणार नाही.

कलियुग कधी सुरु झालं आणि कधी संपणार ?

Bramha Temple In Pushkar सावित्री देवींनी ब्रह्मदेवांना दिलेला श्राप तर बदलला, परंतु त्या खूप चिडलेल्या होत्या. त्यामुळे हा यज्ञ ज्या ब्राह्मणांनी पूर्ण केला, त्या ब्राह्मणांना सुद्धा त्यांनी श्राप दिला की, ब्राह्मणांना कितीही दान दिलं, तरी ते कधीही संतुष्ट होणार नाहीत.

त्याचबरोबर ज्या नंदिनी गायीच्या मुखातून गायत्री प्रकट झाली होती, तिलाही सावित्रीने श्राप दिला की कलियुगात तू घाण खाशील. नारद मुलींना सावित्रीने श्राप दिला की, तुम्ही जन्मभर बिन लग्नाचे राहाल आणि अग्निदेवलाही सावित्रीने श्राप दिला की, कलियुगात तुम्हाला अपमानित व्हावं लागेल.

Bramha Temple In Pushkar असं म्हणून ब्रह्मदेवांवर क्रोधित असलेल्या सावित्री देवी त्यांच्यावर रागावून पुष्करमधील ब्रह्मदेवांच्या मंदिरापासून दूर असलेल्या एका डोंगरावर जाऊन विराजमान झाल्या.

तर ही आहे जगातील एकमेव ब्रह्मदेवांच्या मंदिराची कथा (Bramha Temple In Pushkar).

पुष्करमधील ब्रह्मदेवांच्या मंदिराची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

Bramha Temple In Pushkar पुष्करमध्ये गोड पाण्याचं एक सरोवरसुद्धा आहे. या सरोवराची निर्मिती स्वतः ब्रह्मदेवांनी केली होती आणि या सरोवराला पुष्करराज असंही म्हटलं जातं.

पुष्करमध्ये सध्या जे मंदिर Bramha Temple In Pushkar आहे, ते इसवी सन 1809 मध्ये गोकलचंद पारेख यांनी बनवलं होतं.

पुष्करमध्ये जगातील सर्वात मोठा उंट मेला म्हणजेच उंटांची जत्रा भरवली जाते. या जत्रेसाठी देश विदेशातून हजारो लाखो पर्यटक येत असतात आणि येथे 25000 उंटांचा व्यापार होतो.

पुष्करबद्दल त्रेतायुग आणि द्वापर युगामध्येही नोंदी आढळतात. असं म्हटलं जातं की, प्रभू श्रीराम यांनी त्यांचे वडील राजा दशरथ यांचं श्राद्ध पुष्कर मध्येचं केलं होतं.

त्याचबरोबर द्वापर युगामध्ये प्रभू श्रीकृष्ण यांनी  पुष्करमध्ये तपश्चर्या केली होती. सुभद्रेचं अपहरण केल्यानंतर अर्जुनने पुष्करमध्येचं आराम केला होता.

तर आधुनिक काळात चौथ्या शतकात भारतात आलेला चिनी यात्री फाह्यानने सुद्धा त्याच्या लिखाणात पुष्करबद्दल वर्णन केलं आहे.

Bramha Temple In Pushkar पुष्कर हे तीर्थक्षेत्र ब्रह्मदेवांच्या हातात जे कमळ आहे, त्या कमळाच्या पाकळ्यांनी बनलं आहे. परंतु सध्या पुष्करमध्ये गुलाबांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि संपूर्ण देशात आणि जगात येथूनचं गुलाबांची निर्यात केली जाते.

चारधाम यात्रेबद्दल आपल्या सर्वांना माहितीये. जगन्नाथ, बद्रीनारायण, रामेश्वरम आणि द्वारका या चार धामची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत पुष्कर येथील तीर्थात आंघोळ केली जात नाही, तोपर्यंत चारधामची यात्रा यशस्वी झाली, असं मानलं जात नाही.

ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री ज्यांनी ब्रह्मदेवांना श्राप दिला, त्याही जवळच असलेल्या एका मोठ्या डोंगरावर जाऊन वसल्यात आणि आता तेथे त्यांचीही पूजा केली जाते. स्त्रिया त्यांच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी त्यांची प्रार्थना करतात पूजा करतात.

आता ब्रह्मदेवांनी या यज्ञासाठी पुष्करची निवड कशी केली ? Bramha Temple In Pushkar हा प्रश्नही तुमच्या मनात असेल. यज्ञ करण्यासाठी योग्य स्थान शोधायला ब्रह्मदेव यांनी त्यांच्या हातात असलेल्या कमळाची एक पाकळी तोडून पृथ्वी लोकावर टाकली आणि ही पाकळी जिथे जाऊन विसावली, तेच ठिकाण आज पुष्कर नावाने ओळखलं जातं.

तर अशी होती जगातील एकमेव ब्रह्मदेवांच्या मंदिराची कथा आणि पुष्कर या तीर्थक्षेत्राची वैशिष्ट्ये. तुम्ही कधी पुष्कर या तीर्थक्षेत्राचं दर्शन केलंय का ? नक्कीचं कमेंट करुन सांगा. आमच्या चॅनलवर असलेल्या इतर पौराणिक कथाही नक्कीच पहा आणि अशाच नवीन नवीन पौराणिक कथांसाठी आणि माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !


Scroll to Top