Marathi Goshta : मुलगा हवा म्हणून आई बापाने एक दिवसाच्या मुलीला अनाथ आश्रमात सोडलं आणि

Marathi Goshta

Marathi Goshta अमोल आणि तृप्ती या दोघांच्या लग्नाला जवळपास पाच वर्षे उलटून गेली होती. त्यांना राधिका नावाची एक मुलगी होती आणि आता तृप्ती दुसऱ्यांदा गरोदर होती. अमोल गर्भ श्रीमंत होता. वाड वडिलांचा पैसा, शेती, दागदागिने त्याच्याकडे सगळं होतं, परंतु आता हे सगळं सांभाळण्यासाठी त्याला वंशाचा दिवा हवा होता, मुलगा हवा होता.

पहिली मुलगी झाल्यामुळे तो नाराज होता. परंतु दुसऱ्यांदा मुलगा होईल या आशेने तो दुसऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होता. परंतु घडलं भलतंच, तृप्तीची डिलिव्हरी झाली आणि नर्सने बाहेर येऊन सांगितलं, “अभिनंदन, तुम्हाला मुलगी झालीये.” हे ऐकून अमोलला खूप मोठा धक्का बसतो.

Marathi Goshta

दुसऱ्यांदा मुलगी झाली, मग पुढे कसं होणार ? माझ्या एवढ्या संपत्तीचा वारस कोण असेल, ही सगळी संपत्ती आपल्या वंशाच्या दिव्यालाचं द्यायला पाहिजे, आता काय करायचं, असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहतात.

Marathi Goshta अमोलला नुकत्याचं जन्मलेल्या मुलीचाही खूप राग येतो आणि तो या मुलीचं तोंडही पाहायचं नाही, असं ठरवतो. तर दुसरीकडे परत मुलगीचं झाली, हे समजल्यावर तृप्तीसुद्धा खूप दुःखी असते. तिलाही या नुकत्याचं जन्मलेल्या मुलीचा राग आलेला असतो. तुझ्यामुळे माझा नवरा माझ्यापासून दूर जाईल, तो नाराज होईल, या विचाराने ती या मुलीचं तोंडही पाहायचं नाही, असं ठरवते.

तेथे उभी असलेली नर्स हे सगळं पाहत असते. या दोघांच्या बोलण्यावरून तिला समजलेलं असतं की, त्यांना मुलगा हवा होता आणि आता मुलगी झाली आहे. नर्स अमोलजवळ येते आणि म्हणते, “साहेब तुम्हाला ही मुलगी नकोय ना.” अमोल म्हणतो, “काय बोलताय तुम्ही, तुमचा काय संबंध ?” नर्स म्हणते, “मला सगळं माहिती आहे, तुम्हाला मुलगा हवा होता, परंतु दुसऱ्यांदाही मुलगीचं झाली आणि आता तुम्ही तिच्यावर चिडला आहेत, मी तुमची मदत करू शकते.”

Marathi Goshta अमोल विचारतो, “तू काय मदत करशील आमची ?” नर्स म्हणते, “तुम्हाला मुलगा हवा आहे ना, परंतु तुम्हाला जर ही मुलगी घरात ठेवायची नसेल, तर मी तिला घेऊन जाते. मला पैसे द्या, मी तिला एखाद्या अनाथाश्रमात सोडेल. माझ्या खूप ओळखा आहेत.”

Marathi Katha

अमोल विचार करतो, “बरोबर आहे, ही मुलगी आपल्यासाठी अनलकी आहे, ही झाली आणि माझं मुलगा होण्याचं स्वप्न भंगलं. तिला नाही घरात ठेवायचं.” असा विचार करून तो तृप्तीजवळ येतो आणि तृप्तीला ही गोष्ट सांगतो. एक आई असूनसुद्धा तृप्ती यासाठी तयार होते आणि म्हणते, “मला ही मुलगी नकोय. तुम्ही तिला देऊन टाका.”

Marathi Goshta अमोल या नर्सला तिने सांगितलेले पैसे देतो आणि काही मिनिटांपूर्वी जमलेल्या मुलीला तिला देऊन टाकतो. नर्स अनाथ आश्रमात या मुलीला घेऊन जाते.

एक वर्षानंतर अमोल आणि तृप्ती या दोघांना मुलगा होतो. हे दोघे खूप खुश होतात. तर तिकडे त्यांची मुलगी मात्र अनाथ आश्रमात वाढत असते. आई वडिलांशिवाय एक अनाथ म्हणून जगत असते.

या घटनेला जवळपास 25 वर्ष उलटतात. अमोल आणि तृप्ती या दोघांच्या मुलाचं नाव युवराज असतं. युवराज हा खरचं एखाद्या युवराजसारखा वागत असतो. अमोल आणि तृप्ती त्याचे खूप लाड करतात. राजकुमारासारखं त्याला वाढवतात. त्यामुळे युवराज हा पूर्णपणे बिघडतो. त्याला अनेक व्यसन लागतात. तो कोणताही कामधंदा करत नाही. फक्त त्याच्या आई बापाची संपत्ती उडवत असतो.

Marathi Emotional Story

Marathi Goshta आपला मुलगा युवराज बिघडलाय, हे अमोल आणि तृप्तीला कळलेलं असतं. आता त्याचं लग्न करून देऊ, म्हणजे तू सुधारेल, या विचाराने ते त्याचं लग्नही करून देतात. परंतु अमोलची बायको संजनासुद्धा मोठ्या घरची बिघडलेली मुलगी असते. सासू-सासरे घरात नको, त्यांचा त्रास नको, म्हणून ती युवराजचे कान भरून अमोल आणि तृप्ती या दोघांनाही घराबाहेर काढते आणि वृद्धाश्रमात पाठवून देते.

ज्या मुलासाठी आपण एवढं सगळं केलं, त्या मुलाने आपल्याला घराबाहेर काढलं आणि वृद्धाश्रमात पाठवून दिलं, म्हणून अमोल आणि तृप्ती खूप दुःखी होतात. हे दोघे वृद्धाश्रमात येतात. तेथे त्यांची भेट केअरटेकर सुनंदाशी होते.

Marathi Goshta सुनंदाला पाहून या दोघांना मोठा धक्काचं बसतो. कारण सुनंदा तीच नर्स असते, जिने 25 वर्षांपूर्वी त्यांच्या दुसऱ्या मुलीला अनाथ आश्रमात पाठवलं होतं. सुनंदा या दोघांना ओळखते आणि विचारते, “तुम्ही दोघे येथे कसे, देणगी द्यायचीये का वृद्धाश्रमाला ?”

अमोल म्हणतो, “नाही, देणगी नाही द्यायची. आम्ही दोघे येथे राहायला आलोय. ज्या मुलासाठी आम्ही इतकं काही केलं, त्या मुलाने सुनबाईच्या सांगण्यावरून आम्हाला घराबाहेर हाकललं. आमच्याकडे आता राहायला दुसरी कोणतीही जागा नाहीये. म्हणून येथे राहायला आलोय.”

Maharashtrachi Hasyajatra Actor New Car : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने घेतली नवी कार
https://faktyojana.com/maharashtrachi-hasyajatra-actor-new-car/

सुनंदाच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि ती म्हणते, “तुम्ही पहिलेचं नाही आहात, ज्यांच्याबरोबर हे घडतंय  तुमच्यासारखे अनेक आहेत. आता तुम्ही येथे आला आहात, तर तुम्हाला समजेलचं” सुनंदा या दोघांना वृद्धाश्रमात राहायची जागा देते.

Marathi Goshta संध्याकाळी तृप्ती अमोलला म्हणते, “अहो आपल्यावर ही काय वेळ आली आहे ? आयुष्यभर इतक्या ऐशो आरामात राहिलो आणि आयुष्याचा शेवट या वृद्धाश्रमात होणार.” अमोल म्हणतो, “आपल्याचं कर्माची फळ आहेत. आपण आपल्या दुसऱ्या मुलीला जन्मतःच अनाथ आश्रमात पाठवलं. तिचे आईबाप जिवंत असताना, स्वतःचं घर असताना, एक अनाथ म्हणून तिला मोठं व्हावं लागलं. मग आपल्या आयुष्याचा शेवटसुद्धा या वृद्धाश्रमातचं होणार. हाच न्याय आहे.” सुनंदा म्हणते, “खरं बोलताय तुम्ही, हीच आपली शिक्षा आहे.”

Marathi Sad Story

दुसऱ्या दिवशी या वृद्धाश्रमात मेडिकल कॅम्प असतो. डॉक्टरांची एक टीम सर्व वृद्धांना चेक करायला आलेली असते. प्रार्थना नावाची एक डॉक्टर सगळ्या लोकांशी खूपच प्रेमाने बोलते. त्यांचा चेकअप करते. अमोल आणि तृप्तीला पाहून ती सुनंदाला विचारते, “मावशी हे आपल्या आश्रमात नवीन आले आहेत का ?”

Marathi Goshta सुनंदा सांगते, “हो प्रार्थना कालचं आले आहेत हे आपल्या आश्रमात. गडगंज श्रीमंत आहेत, परंतु यांच्या मुलाने त्यांना वृद्धाश्रमात पाठवून दिलं. प्रार्थना अमोल आणि तृप्तीचा हात हातात घेते आणि म्हणते, “आई बाबा नका काळजी करू, मी गॅरेंटी देते, येथे तुम्ही तुमच्या घरापेक्षा जास्त सुखी आणि आनंदी राहाल.”

अमोल आणि तृप्तीला प्रार्थनाचा स्वभाव खूपचं आवडतो. प्रार्थना दुसऱ्या पेशंटला चेक करायला निघून जाते. तृप्ती सुनंदाला म्हणते, “किती चांगली मुलगी आहे ना.” सुनंदा म्हणते, “कधीकधी माणसाच्या तोंडातून नकळतपणे सत्य निघून जातं. जे त्यालाही माहीत नसतं.”

Marathi Goshta अमोल विचारतो, “कोणत सत्य ?” तर सुनंदा सांगते, “ती तुम्हाला आई बाबा म्हणाली, हे सत्य होतं. तुम्ही तिचे आई-बाबा आहात. ती तुमचीचं मुलगी आहे.” हे ऐकून अमोल आणि तृप्तीला जबर धक्का बसतो. ते विचारतात, “हे काय बोलतेस तू सुनंदा ?”

तर सुनंदा सांगते, “तुमची दुसरी मुलगी, जिला तुम्ही माझ्याकडे दिलं होतं. हू तीच मुलगी आहे, प्रार्थना.” अमोल आणि तृप्तीचा यावर विश्वासचं बसत नाही आणि ते प्रार्थनाकडेचं पाहू लागतात. तृप्ती विचारते, “सुनंदा तू खरं बोलतेस का ? ही तर इतकी शिकलेली डॉक्टर, चांगल्या घरातील दिसत आहे, मग असं कसं ?”

सुनंदा सांगते, “मी तिला अनाथाश्रमात सोडलं. तेथेच ती मोठी झाली. ती लहानपणापासूनचं खूप हुशार होती. ती खूप शिकली. गव्हर्मेंट कॉलेजमधून तिचा मेडिकलला नंबर लागला. जास्त फीज नव्हती. तिची हुशारी मात्र खूप होती आणि ती स्वतःच्या जीवावर डॉक्टर बनली.

Marathi Goshta स्वतः एक अनाथ असल्यामुळे तिला अनाथ आश्रमातील मुलं आणि वृद्धाश्रमातील वृद्ध लोकांबद्दल खूप आपुलकी आहे आणि हे मेडिकल कॅम्प तीच अरेंज करते. तुम्ही त्या युवराजसाठी हिला अनाथाश्रमात सोडलं आणि त्या युवराजने तुम्हाला या वृद्धाश्रमात आणून सोडलं. परंतु आता तीच अनाथ आश्रमात सोडलेली मुलगी तुमच्यासमोर येऊन डॉक्टर म्हणून उभी राहिली आहे, तुमची काळजी घेतेय.”

अमोल आणि तृप्तीचे डोळे पाण्याने डबडबडलेले असतात. त्यांचा विश्वासचं बसत नाही. तृप्ती प्रार्थना कडे जाऊ लागते. तर अमोल तिचा हात धरतो आणि म्हणतो, “नाही तृप्ती, हे सत्य फक्त आपल्यामध्येचं रहायला हवं. तिला कधीही कळायला नको. कारण काही क्षणांपूर्वी ती आपल्याशी किती प्रेमाने, आपुलकीने बोलली. आपल्याला आई-बाबा म्हणाली. पण जर तिला हे सत्य कळलं की, आपण तिला अनाथाश्रमात सोडलं. त्याचं खरं कारण कळलं, तर ती आपला द्वेष करेल. यानंतर कधी आपलं तोंडही पाहणार नाही.

Marathi Goshta त्यामुळे तिला हे सत्य न कळलेलचं बरं. कमीत कमी ती आपल्याला आई-बाबा अशी हाक मारेल. आपल्याशी प्रेमाने बोलेल, मला तेवढं पुरेसं आहे.” तृप्तीला सुद्धा अमोलची ही गोष्ट पटते आणि ती म्हणते, “अहो खरं बोलताय तुम्ही. देवाने आपल्याला खूप मोठी शिक्षा दिली आहे. परंतु प्रार्थनाच्या रूपाने त्या शिक्षेवर त्या जखमेवर मलमसुद्धा दिलाय आणि हा मलम आपल्या उरलेल्या आयुष्यासाठी पुरेसा आहे.”

Marathi Goshta त्या दिवसानंतर अमोल आणि तृप्तीचा मुलगा युवराज परत कधीही त्यांना भेटायला येत नाही. त्यांची साधी विचारपूसही करत नाही. परंतु प्रार्थनाचे मात्र अमोल आणि तृप्तीशी ऋणानुबंध जुळतात आणि ती दर आठ दिवसांनी वृद्धाश्रमात येते. या दोघांची चौकशी करते. त्यांच्याबरोबर वेळ घालवते.

परंतु अमोल आणि तृप्ती कधीही तिला सत्य सांगत नाही की, आम्हीचं तुझ्या आई बाबा आहोत. तूच आमची मुलगी आहेस.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची Marathi Goshta. नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top