Prathamesh Parab Marriage News अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर या दोघांचं लग्न झालं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या लग्नानंतरचा पहिला सण गुढीपाडवाही साजरा केला आणि आता प्रथमेशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय, जो चांगलाचं व्हायरल होतोय.
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, प्रथमेशची बायको क्षितिजा त्याच्या डोक्याची मालिश करून देतेय आणि या व्हिडिओला सुख म्हणजे नक्की हे असतं असं कॅप्शन प्रथमेशने दिलंय. याचा अर्थ लग्नानंतर क्षितिजा प्रतिमेच्या डोक्याची मालिश करते, हेच आयुष्यातील खरंच सुख आहे, असं प्रथमेशला सुचवायचंय.
प्रथमेशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि या व्हिडीओवर चांगल्याचं मजेशीर कमेंट येत आहेत. अनेकांनी लिहिलंय की, नव्याची नवलाई आहे. तू प्राजुशी टाईमपास केला होतास ना. एक वर्ष होऊ दे, मग तुला कळेल. अशा मजेशीर कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.
Prathamesh Parab Marriage News
दरम्यान प्रथमेश आणि क्षितिजा या दोघांची ओळख instagram वर झाली होती. Instagram वर गप्पा मारता मारता हळूहळू दोघांची एकमेकांशी ओळख झाली, मग भेट झाली आणि भेटीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांनी नुकतंच लग्नही केलं.
Prathamesh Parab Marriage News प्प्रथमेशची बायको क्षितिजा एक फॅशन मॉडेल आहे. त्याचबरोबर ती सामाजिक कार्यकर्तेही आहे. तिला लिखाणाची आवड आहे. हे दोघे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात आणि एकमेकांबरोबरचे सुंदर फोटोग्राफ सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रेक्षकांची या फोटोला चांगलीच पसंती मिळते.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने विकत घेतली नवीन कार
प्रथमेश परबने टाइमपास, टाइमपास 2 आणि टाइमपास 3 यासारख्या चित्रपटातून मोठी प्रसिद्धी मिळवली. बालक पालक चित्रपटात त्याची छोटीशी पण मजेशीर भूमिका होती. त्यानंतर रवी जाधवने त्याला टाइमपास या चित्रपटात दगडूची भूमिका दिली आणि त्याने या भूमिकेचं सोनं केलं.
दगडू आणि प्राजु या दोघांच्या प्रेम कहानीला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली. चित्रपटाचे डायलॉग’ चित्रपटाची गाणी, चित्रपटातील कलाकार, हे सगळेचं प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर प्रथमेश परबने कधी मागे वळून पाहिलं नाही. मराठी बरोबरचं त्याने दृश्यम आणि दृश्यम 2 या दोन हिंदी चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
तर तुम्हाला आवडते का प्रथमेश परब आणि क्षितिजाची जोडी Prathamesh Parab Marriage News नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग मनोरंजनाच्या बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !