महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत.

हास्यजत्रेतील अभिनेता प्रथमेश शिवलकरने आनंदाची बातमी दिली आहे.

प्रथमेशने नुकतीच महिंद्रा थार ही नवीन गाडी खरेदी केलीय.

त्याने इंस्टाग्रामवर आपल्या आई बाबांसोबतचा फोटो शेअर करत माहिती दिली.

प्रथमेशने आपल्या आईवडिलांच्या हस्ते नवीन गाडीची डिलिव्हरी स्वीकारली

फोटोंमध्ये त्याच्या आई बाबांच्या डोळ्यातला आनंद, समाधान आणि कौतुक दिसलं.

प्रथमेशने आपल्या नवीन महिंद्रा थारसोबतचे फोटोसुद्धा शेअर केले.

त्याने या पोस्टला भाग 1 म्हटलं आहे आणि भाग 2 लवकरच येणार आहे.

आता भाग 2 काय असेल यासाठी सर्वांची उत्सुकता वाढली आहे.

सर्वांनी प्रथमेशला कमेंट्स करत नवीन गाडीसाठी शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत.