Maharashtrachi Hasyajatra Actor New Car महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकार फॅन्सला एकानंतर एक आनंदाचे धक्के देत आहेत. काही दिवसांपूर्वीचं प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने मर्सिडीज खरेदी केली होती आणि आता या कार्यक्रमातील आणखी एका अभिनेत्याने नवी कोरी एसयूव्ही खरेदी केली आहे.
या अभिनेत्याचं नाव आहे प्रथमेश शिवलकर. प्रथमेश शिवलकरने आपल्या लिखाणाने आणि अभिनयाने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवलंय, सर्वांची मन जिंकली आहेत.
पारू मालिकेतील या अभिनेत्याने मालिका सोडली
प्रथमेश शिवलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये दिसत आहे की, त्याने नवी कोरी महिंद्रा थार गाडी खरेदी केलीये. प्रथमेश चे आई बाबा या नवीन गाडीची चावी घेताय आणि त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतोय. प्रथमेशही आनंदी आणि समाधानी दिसतोय.
Maharashtrachi Hasyajatra Actor New Car
या फोटोला कॅप्शन देताना यासाठीचं केला होता अट्टाहास भाग 1 असं लिहिलंय. आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आपला मुलगा यशाची पायरी सर करतोय, याबद्दलचा अभिमान पाहून आनंद होतोय असं त्याने सांगितलं.
काही दिवसांपूर्वी प्रथमेश शिवलकरने एक स्पेशल व्हिडिओ शेअर केला होता आणि आपल्या नवीन सिनेमाबद्दल सांगितलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद खांडेकर करतोय. तर लेखन प्रथमेश शिवलकर करतोय. या चित्रपटामध्ये स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी आणि हास्यजत्रेचे सर्व कलाकारही दिसणार आहेत.
हास्यजत्रा फेम प्रथमेश शिवलकरने विकत घेतली नवी कार
Maharashtrachi Hasyajatra Actor New Car प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश या दोघांची जोडी मनोरंजन विश्वात खूप प्रसिद्ध आहे. दोघे कॉलेजच्या काळापासून एकत्र काम करतात, एकत्र लिखाण करतात आणि सादरीकरणही करतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून त्यांनी चांगलीचं प्रसिद्धी मिळवली आणि आता स्वतःची नवीन फोर व्हीलर गाडी खरेदी केल्यामुळे प्रथमेश खूप खुश आहे.
प्रथमेशच्या या सोशल मीडिया पोस्टवर सगळेजण लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. आपणही प्रथमेशला या नवीन गाडीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि मनोरंजन विश्वाशी निगडीत अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप धन्यवाद !