Paaru Zee Marathi Serial : पारू मालिकेतून या प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली एक्झिट

Paaru Zee Marathi Serial

Paaru Zee Marathi Serial झी मराठी सध्या नवीन नवीन मालिका घेऊन येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीबरोबर प्रतिस्पर्ध्या करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या मालिका आणणं एवढंच झी मराठीचं उद्दिष्ट आहे. झी मराठीने पारू ही मालिका सुरू केलीये आणि या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलंय.

शरयू सोनवणे आणि प्रसाद जवादे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीतचं लोकप्रिय झाली आहे. Paaru Zee Marathi Serial मालिकेत पारू हे मुख्य पात्र असून सध्या तिच्या लग्नाच्या विविध घडामोडी मालिकेत घडत आहेत. परंतु आता या मालिकेतील प्रसिद्ध कलाकाराने एक्झिट घेतलीये आणि सोशल मीडियावर आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

Paaru Zee Marathi Serial

या अभिनेत्याचं नाव आहे सचिन देशपांडे. अभिनेता सचिन देशपांडेने काही दिवसांपूर्वीचं पारू मालिकेत एंट्री घेतली होती. पारुशी लग्न करण्यासाठी तो आला आणि पारूला चांगलाच त्रास दिला होता. त्याचं हे नकारात्मक पात्र होतं. त्यामुळे प्रेक्षक त्याच्यावर चिडले. परंतु सचिनचा अभिनय सर्वांनाचं आवडला होता.

आता सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये आणि सांगितलंय की, त्याचा पारू या मालिकेतील प्रवासा संपला आहे. त्याचा रोल काही दिवसांसाठीचं होता. त्याने मालिकेतील पारू म्हणजेचं अभिनेत्री शरयूला खूप त्रास दिला. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र त्यांची चांगली मैत्री झाली आहे आणि आता लुडो खेळामध्ये चीटिंग करू नको, असंही त्यांनी शरयूला सांगितलंय.

शुभविवाह मालिकेतील आकाश खऱ्या आयुष्यात कधी लग्न करणार

एकूणचं या पोस्टवरून दिसून येत आहे की, सचिन देशपांडे हा काही दिवसचं पारू मालिकेच्या सेटवर होता, परंतु सर्व कलाकारांबरोबर त्याची चांगलीचं गट्टी जमली आहे आणि तो या मालिकेला आणि  कलाकारांना मिस करणार, एवढं मात्र नक्की.

अभिनेता सचिन देशपांडे प्रेक्षकांचा लाडका आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. पण त्याची सर्वात जास्त लक्षात राहणारी भूमिका म्हणजे झी मराठीवरील होणार सुन मी या घरची या मालिकेत त्यांनी तेजस्वी प्रधान म्हणजेचं जानवीचा मित्र. ही भूमिका त्याने साकारली होती आणि ती सर्वांनाचं आवडलेली.

तर तुम्ही पाहता का Paaru Zee Marathi Serial पारू ही मालिका आणि तुम्हाला सचिनची भूमिका आवडली होती का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top