Shriram Sister Shanta : प्रभू श्रीरामांची बहिण शांताची गोष्ट माहितेय का ?

Shriram Sister Shanta

Shriram Sister Shanta रामायणात प्रभू श्रीराम यांना किती भाऊ बहीण होते ? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला, तर त्याचं एकच उत्तर मिळतं की, प्रभू श्री राम यांना तीन भाऊ होते भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. त्यांना कोणतीही बहीण नव्हती.

परंतु ही चुकीची माहिती आहे. प्रभू श्रीराम यांना एक बहीण होती. आणि ती प्रभू श्रीराम यांची सख्खी बहिण होती. ती राजा दशरथ आणि माता कौशल्या यांची मुलगी, प्रभू श्रीराम यांची मोठी बहीण होती.

Shriram Sister Shanta

हे ऐकून तुम्हालाही नक्कीचं आश्चर्य वाटलं असेल. आज आपण प्रभु श्रीराम यांच्या मोठ्या बहीणीबद्दल Shriram Sister Shanta जाणून घेऊया.

तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, जर प्रभू श्रीराम यांना मोठी सख्खी बहीण होती, तर मग रामायणात तिचा उल्लेख का येत नाही ? तिच्याबद्दल कुठेच का चर्चा केली जात नाही ? आपण त्याबद्दलही जाणून घेऊया.

वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणात प्रभू श्रीरामांच्या मोठ्या बहीणीचा Shriram Sister Shanta उल्लेख आढळत नाही. परंतु दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या रामायणात श्रीरामांच्या मोठ्या बहीणीबद्दल विस्तीर्णपणे माहिती दिली गेलीये.

प्रभू श्रीराम आणि त्यांच्या भावंडांच्या जन्माआधी राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांना शांता नावाची एक मुलगी झाली होती. शांता ही लहानपणापासूनच सर्व गुणांनी परिपूर्ण होती. तिला वेदांचंही ज्ञान होतं आणि शिल्पकलेतही ती निपुण होती.

प्रभू श्रीरामांची मोठी बहीण शांता

परंतु प्रभू श्रीराम आणि त्यांच्या भावंडांच्या जन्माआधीचं राजा दशरथने शांताला दत्तक देऊन टाकलं होतं. मग असं काय झालं की, राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीला दत्तक दिलं.

याचं कारण असं आहे की, राणी कौशल्या यांना एक बहीण होती वर्षीणी. म्हणजेचं वर्षीणी ही शांता आणि प्रभू श्रीराम यांची मावशी होती. वर्षीणीचं लग्न अंगदेशचा राजा राजा रोमपद याच्याशी झालं होतं.

Shriram Sister Shanta राजा रोमपद आणि राणी वर्षीणी यांना कोणतंही मूलबाळ नव्हतं. त्यामुळे ते खूप दुःखी होते. जेव्हा राणी वर्षीणी अयोध्येत त्यांच्या बहिणीला राणी कौशल्याला भेटण्यास आली. तेव्हा शांताला पाहून, तिच्यातील गुण पाहून, राणी वर्षीणीची अशी इच्छा झाली की, शांता ही आपली मुलगी असायला हवी.

त्यामुळे राणी वर्षीणीने राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्याकडे शांता मला दत्तक द्या, अशी मागणी केली. राणी वर्षीणीला मूलबाळ नसल्याने ती खूप दुःखी रहायची. बहिणीचं हे दुःख राणी कौशल्याला पाहवलं गेलं नाही. तिची ही मागणी त्यांना अमान्य करता आली नाही आणि त्या शांताला दत्तक देण्यासाठी तयार झाल्या.

रामायणातील माहिती नसलेल्या गोष्टी 

तर रघुकुलाच्या प्रथेनुसार मुलींना रघुकुलाची गादी सांभाळण्याचा अधिकार नसतो. अयोध्येची राणी शांता कधीही होऊ शकली नसती. म्हणून राजा दशरथही शांताला राजा रोमपद आणि राणी वर्षीणीला यांना दत्तक देण्यासाठी तयार झाले.

खूप लहान असतानाचं शांता अयोध्येपासून दूर असलेल्या अंगदेशाची राजकुमारी म्हणून निघून गेली. त्यामुळेच वाल्मिकी ऋषींच्या रामायणात तिचा कोणताही उल्लेख आढळत नाही.

Shriram Sister Shanta आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीचं पडला असेल की, शांताचं पुढे काय झालं ? तर झालं असं की, शांता ही अंगदेशाची राजकुमारी बनली. एकदा राजा रोमपद शांताशी गप्पा मारत होते. त्याचवेळेस त्यांच्या राज्यातील एक गरीब ब्राह्मण शेतकरी तेथे आला आणि पावसाळ्यात शेती संदर्भातील समस्या राजा पुढे मांडू लागला. परंतु गप्पा मारण्यात व्यस्त असलेल्या राजा रोमपद यांनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्याची समस्या सोडवली नाही. त्यामुळे हा गरीब ब्राह्मण खूप दुःखी झाला आणि राजा रोमपदचं राज्य सोडून निघून गेला.

Shriram Navami 2024

राजाने गरीब ब्राह्मण शेतकऱ्याचा असा अपमान केला, हे पाहून इंद्रदेव खूप क्रोधीत झाले आणि त्यांनी अंगदेशावर आपली वक्रदृष्टी वळवली आणि अंगदेशावर त्यावर्षी दुष्काळ पडला. राज्यात दुष्काळ पडल्याने राजा रोमपद खूप दुःखी झाले.

हेही वाचा : लाखों वर्षांपासून जिवंत असलेले ७ चिरंजीवी

Shriram Sister Shanta या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी राजा रोमपद रुंग ऋषीकडे गेले. तेव्हा ऋषीरुंग यांनी दुष्काळातून मुक्त होण्यासाठी त्यांना काही उपाय सांगितले. या उपायांमुळे अंगदेश दुष्काळातून मुक्त झाला. त्यामुळे राजा रोमपद यांनी आनंदी होऊन शांताचं लग्न या ऋषींशी लावून दिलं.

तर तुम्हाला माहित होतं का, प्रभू श्रीरामांना एक बहिणसुद्धा आहे ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या इतर पौराणिक कथाही नक्कीचं पहा. अशाच नवीन नवीन पौराणिक कथांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

धन्यवाद !

Scroll to Top