Marathi Emotional Story : मृत्यूआधीचं नवऱ्याने बायकोसाठी लिहिलं पत्र नवरा बायकोची अधुरी प्रेमकहाणी

Marathi Emotional Story

Marathi Emotional Story आठ दिवसांपूर्वीचं निलेश हे जग सोडून गेला होता. अवघ्या तिसाव्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. निलेशची पत्नी अक्षराला अजूनही विश्वास पटत नव्हता की, निलेश तिला सोडून गेला आहे. त्यांची दोन वर्षांची छकुलीसुद्धा रोज त्याची आठवण काढायची आणि तिला खोटं खोटं समजावताना अक्षरालाही रडू यायचं.

निलेश गेल्यापासून अक्षरा रोज रात्री त्यांच्या लग्नाचा अल्बम काढून बसायची आणि ते आनंदी क्षण आठवायची. आजही तिने तसंच केलं आणि पुढच्या पानावर तिला एक चिठ्ठी सापडली. तिने ही चिठ्ठी उघडून पाहिली, तर हे निलेशचं तिच्यासाठीचं शेवटचं पत्र होतं. त्याने आपल्यासाठी मृत्यूआधीचं हे पत्र लिहून ठेवलंय, हे पाहून अक्षराला मोठा धक्काचं बसतो.

Marathi Emotional Story

अक्षरा हे पत्र वाचू लागते. निलेशने यामध्ये लिहिलेलं असतं, “काय गं पिल्लू, तुला नक्कीचं आश्चर्य वाटलं असेल की, निलेशने मृत्यूआधीचं पत्र कसं काय लिहिलं ? खरं सांगायचं तर, मला नव्हतं माहित की मी मरणार आहे. परंतु माझ्या मनात असाचं एकदा विचार आला होता की, जर अचानक आपण हे जग सोडून गेलो, तर आपल्या बायकोला मनातील गोष्टी, इच्छा सांगायच्या राहून जातील. तेव्हा गंमत गंमत म्हणूनचं मी हे पत्र लिहिलंय. जर मी म्हातारपणापर्यंत मेलो नसतो, तर तुला हे पत्र वाचून दाखवलं असतं.”

Marathi Emotional Story निलेशचं हे पत्र वाचताना अक्षराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तिचा विश्वासचं बसत नाही की, निलेशने आधीचं असा विचार करून ठेवला होता. अक्षरा हे पत्र पुढे वाचते. तर निलेश लिहितो, “मी नाही, तर तू हे पत्र वाचतेस, याचा अर्थ मी खरंच या जगात नाहीये आणि रडून रडून तर तुझी वाट लागली असेल ना. सॉरी मी थोड्या विनोदी भाषेतचं लिहिणार आहे. कारण मला माहिती आहे, तू खूप दुःखी असशील. माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर स्माईल यावी, यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न केले आणि आता मेल्यानंतरही करणार आहे.

आपली छकुली कशी आहे गं ? बरी आहे ना. माझी खुप आठवण काढत असेल ना. पप्पा, पप्पा कुठे गेलेत, ममा सांग ना. असं विचारत असेल ना तुला. लहान आहे ती अजून. सांग बाहेर गेलेत. तुझ्यासाठी खाऊ आणायला, लवकर येतील. थोडी मोठी झाली की, तिला आपोआपचं समजायला लागेल.

मराठी इमोशनल स्टोरी

Marathi Emotional Story अक्षरा मला माहित आहे, जोडीदाराशिवाय आयुष्य जगणं खूप अवघड असतं आणि तू तर अजून सुरुवातही केलेली नाहीये. फक्त 25 वर्षांची आहेस तू. माझे आई-बाबा आणि तुझे आई बाबा नक्कीचं येत्या काही दिवसांमध्ये तुझं दुसरं लग्न करून देण्याचा विचार करतील. तेव्हा त्याला नकार देऊ नकोस. नक्की लग्न कर.”

अक्षरा खूप रडू लागते आणि नकारार्थी मान डोलावते. ती म्हणते, “नाही निलेश तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. मी नाही लग्न करणार.”

हेही वाचा : त्या मुलीचं पहिलं आणि शेवटचं प्रेमपत्र

निलेश पुढे लिहितो, “मला माहितीये. तू म्हणत असशील, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचार नाही करू शकत. पण अगं आता मी या जगात नाहीये आणि माझ्यासाठी तू तुझं आयुष्य असं दुःखात नको काढूस. आता आपलं कुटुंब नक्कीचं योग्य तो निर्णय घेईल, हे मला माहितीये.

Marathi Emotional Story आर्थिक गोष्टीबद्दल बोलायचं झाल्यास, मी तुमच्या दोघींची सोय होईल इतके पैसे सोडून जातोय. तरी ते पैसे चांगल्या ठिकाणी गुंतव, म्हणजे वाढत्या महागाई बरोबर तुमच्या दोघींच्या भविष्यासाठी पैसे कमी नाही पडणार. आपल्या छकुलीला जे काही बनायचं असेल, ते बनू दे. तिची जी इच्छा असेल, ती नक्की पूर्ण कर.

नवरा बायकोची रडवणारी गोष्ट

Marathi Emotional Story आयुष्याचा काही भरोसा नसतो. माझ्यावरून तर तुला कळलंच असेल. त्यामुळे जे काही करायचं, ते आज करायचं. आत्ता करायचं. उद्याच्या भरोशावर बसलो, तर ते काम नाही पूर्ण होत.

आपणसुद्धा आपल्या भविष्यासाठी किती स्वप्न पाहिली होती ना. लग्नानंतर हनिमूनसाठी आपण गोव्याला गेलो होतो. तेव्हा तू तिथे किती लाजायचीस. आपण परत आलो आणि तू म्हणाली, ‘मी नवीन होते म्हणून लाजले पण आता नाही लाजणार. मला तिथे खूप मजा करायची आहे. आपण परत जाऊ. परंतु आज जाऊ, उद्या जाऊ, असं म्हणता म्हणता वेळ निघून गेली गं आज आपलं ते स्वप्न राहून गेलं.

Marathi Emotional Story जमलं तर ते स्वप्न नक्कीचं पूर्ण कर. आपल्या मुलीला पण घेऊन जा. दोघी मस्त एन्जॉय करा. मी तुमच्या बरोबरचं आहे असं समजा.”

Marathi Emotional Story अक्षरा निलेशच्या आठवणीत खूप रडू लागते. निलेशच्या पत्राला ती कवटाळते आणि तिच्या अश्रूंचा बांध तुटतो. ती ढसाढसा रडू लागते. काही क्षणानंतर ती स्वतःला कशीबशी सावरते आणि पुन्हा हे पत्र वाचू लागते.

मराठी कथा

Marathi Emotional Story निलेश पुढे लिहितो, “अक्षरा आपली छकुली हळूहळू मोठी होईल. तिला जे हवं, ते सगळं पहा. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. मी जर असतो, तर मीही तेचं केलं असतं. तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देऊ नको. यानंतर तूही स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न कर. कोणावरही अवलंबून राहू नकोस.

तुला खरं सांगायचं, तर एवढ्या लवकर जाण्याची माझीही इच्छा नव्हती. पण आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना गं. तुझ्यासारखी बायको मला मिळाली, हे माझं भाग्य आहे आणि आता कुठे एक जन्म संपला आहे. अजून तर सहा जन्म बाकी आहेत ना. पुढचं आयुष्य देवाकडून थोडं मोठं मागून घेईल. म्हणजे म्हातारा होईपर्यंत तुझ्याबरोबर मला जगता येईल. चल आता लिहिणं बंद करतो. काळजी करू नको, रडू नको, मी आहे नेहमी तुझ्याबरोबर.”

निलेशने लिहिलेलं शेवटचं पत्र संपलेलं असतं. निलेशच्या आठवणीत अक्षराच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि ती निलेशच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या ठरवते.

तर मैत्रिणीनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा. नक्कीचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा. 

खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top