Marathi Katha : भावाचा विश्वासघात करणाऱ्या बहिणीची गोष्ट

marathi katha

Marathi Katha मिलिंदचं मोठे काका त्याच्यावर खूप चिडलेले होते आणि त्याला चांगलंचं सुनावत होते. मिलिंद खाली मान घालून सगळं ऐकत होता. मिलिंदची बायको सुद्धा खाली मान घालून सगळं ऐकत होती. एकही शब्द बोलण्याची तिची हिंमत नव्हती.

काका म्हणतात, “अरे नालायका लाज नाही का वाटत तुला ? तुझे बाबा जाऊन अजून सहा महिने सुद्धा नाही झालेत आणि तू तुझ्या आईला ही सांभाळू शकत नाही का ? तुला आईला सांभाळायचं तरी काय आहे रे, तुझ्या बापाने भला मोठा पैसा मागे ठेवला आहे. तुझ्या आईला दरमहा 25 हजाराची पेन्शन सुद्धा मिळणार आहे. तरीही तू तुझ्या आईला सांभाळू शकत नाही का ? लाज वाटते तुझ्यासारख्या मुलाची.”

मिलिंदला हा अपमान नाही सहन होत आणि तो मोठ्या काकांना म्हणतो, “काका बस झालं आता. यापेक्षा जास्त खोटे आरोप आणि अपमान मी नाही सहन करू शकत. आतापर्यंत मी आपल्या नात्याचा आणि वयाचा सन्मान केला, त्यामुळे गप्प बसलो. परंतु कोर्टात सुद्धा प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा हक्क असतो. मला सुद्धा माझी बाजू मांडण्याची संधी मिळालीचं पाहिजे.”

Marathi Katha : भाऊ बहिणीची इमोशनल गोष्ट

Marathi Katha काका चिडून म्हणतात, “तू काय बाजू मांडणार. तुझ्या बहिणींनी मला सगळं सांगितलंय. तू आणि तुझ्या बायकोने कसा तुझ्या आईचा छळ केला. तिला घराबाहेर काढलं आणि त्यांच्याकडे सोडून आलास. तेही कशासाठी तर त्या पेन्शनच्या पैशांसाठी आणि फंडच्या पैशासाठी. तुझी आई म्हणाली की, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत तो पैसा तुला नाही देणार, तर तू लगेचं आईला घराबाहेर काढलास का ?

मिलिंद म्हणतो, “नाही काका, हे सगळे आरोप खोटे आहेत. मी असं काहीही केलेलं नाहीये. मला काय गरज आहे, आईच्या पैशांची ? मी आणि माझी बायको मिळून महिन्याला लाख रुपयापेक्षा जास्त कमावतो. चांगल्या घरात राहतो. मग मी हे सगळं कशाला करेल, तुम्हीच विचार करा ना.”

काका म्हणतात, “माणसाची हाव कधी संपत नाही. तू एक नंबरचा स्वार्थी आहेस. तुला काय म्हणायचंय, तुझ्या बहिणी खोटं बोलताय का ?” मिलिंद म्हणतो, “हो काका माझ्या बहिणी खोटं बोलताय. कारण आईच्या पैशांची हाव मला नाही, तर त्यांनाचं आहे. त्यांना हे सगळे पैसे लागतात.

Marathi Katha स्वतःच्या बहिणीबद्दल मला असं नाही बोलायचं. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती किती हालाखीची आहे, हे तुम्ही जाणता. त्यामुळे त्यांनीच या सगळ्या अफवा पसरवल्यात. माझ्याबद्दल तुम्हाला खोटं नाट सांगितलंय. मला नको आईचा पैसा, मला फक्त माझी आई हवी आहे. हवं तर तुम्ही येथेच फैसला करा. आईचा फंडचा पैसा आणि पेन्शन दर महिन्याला तुम्ही माझ्या बहिणींना देत जा, फक्त माझी आई माझ्याजवळ राहू द्या.”

काकभुशुंडी पौराणिक कथा

मराठी कथा

तेवढ्यात मिलिंदच्या बहिणी तेथे येतात आणि म्हणतात, “बस झालं मिलिंद. आमच्यावर खोटे नाते आरोप लावू नको. आम्ही असं काही केलेले नाही. मान्य आहे, आम्ही तुझ्यापेक्षा गरीब आहोत. परंतु आईच्या पैशांवर आमचा कधीही डोळा नव्हता. तूच एक नंबरचा स्वार्थी आहेस.”

marathihelper.com

मागच्या महिन्यात आईचा पाय किती दुखत होता, तेव्हा आईची काळजी घ्यायची सोडून तुम्ही दोघे तुमच्या मुलाबरोबर मस्तपैकी दुसऱ्या राज्यात फिरायला गेला होतात. आईला माझ्या घरी सोडलं. तेव्हा नाही का तुझ आईवरचं प्रेम जागृत झालं. तेव्हा का तिला सोडून गेलास तू ?”

Marathi Katha मिलिंद म्हणतो, “ताई तेव्हा आईनेचं मला सांगितलं होतं की, तुमचं आधीपासून बुकिंग आहे, तर तुम्ही जा. मी थांबते तुझ्या बहिणीकडे. मी नाही तुला तुझ्याकडे पाठवून दिलं. मी आणि माझी बायको तर ट्रिप कॅन्सल करायला तयार होतो, पण आईनेचं नाही ऐकलं. आणि तू याचं मुद्द्याचा फायदा घेतला आणि मला विलन बनवलं.

कधी कधी तर मला वाटतं की, या सगळ्याचा सूत्रधार तू नाही, तर तुझा नवरा आहे.  तू माझी बहीण आहेस आणि स्वतःच्या भावाबरोबर तू असं नाही वागू शकत.”

मिलिंदच्या बहिणीला खूप राग येतो आणि ती म्हणते, “खबरदार माझ्या नवऱ्याबद्दल एक शब्दही बोललास तर.” मिलिंद म्हणतो, “आता आला का राग. मग मागील काही महिन्यांपासून तुम्ही माझ्या बायकोबद्दल ज्या अफवा पसरवताय. सगळ्या नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये तिच्याबद्दल नाही नाही ते बोलताय. हे ऐकून मला किती राग आला असेल.

मराठी बोधकथा

Marathi Katha तुम्ही माझ्याबरोबर तिलाही व्हिलन बनवलं. एक तर आधीच सर्वांना असं वाटतं की, सून ही वाईटचं असते आणि त्यात तुम्ही तिच्याबद्दल आणखीनच विष कालवलं. ती कशी आईचा छळ करते. आईला त्रास देते, हे सगळं तुम्ही नातेवाईकांना रंगून रंगून सांगितलं आणि आता त्याचा आम्हाला किती त्रास होतोय, सगळेजण आमच्यावर संशय धरतात.

आम्हालाचं वाईट बोलतात. कारण मुलगा, सून वाईट आणि मुलगी खूप चांगली ही आपल्या समाजाची धारणाचं आहे. परंतु नाण्याच्या दोन बाजू असतात. सगळीचं मुलं वाईट नसतात आणि सगळ्याचं मुली चांगल्या नसतात.

आता मी यानंतर कोणालाही स्पष्टीकरण देणार नाही. फक्त एवढे म्हणेल की, आई माझ्या घराचे दरवाजे नेहमी Marathi Katha तुझ्यासाठी उघडे आहेत. मला तू हवी आहे. तुझा पैसा नाही. असं म्हणून मिलिंद आपल्या बायकोला घेऊन तिथून निघून जातो.

कोण खरं आणि कोण खोटं हाचं प्रश्न काकांसमोर उभा असतो. पण त्यांनाही निर्णय घेता येत नाही.

तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा. नक्कीचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी Marathi Katha आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद ! 

Scroll to Top