BMCM Collection यावर्षी रमजान ईदच्या दिवशी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या दोघांचा बडे मिया छोटे मिया हा ॲक्शनपट मोठ्या धुमधडाक्यात रिलीज करण्यात आला होता. परंतु या चित्रपटाची कमाई खूपचं धक्कादायक आहे. ज्यामुळे बॉलीवूड आणि चित्रपटाच्या कलाकारांना जबर धक्का बसलाय.
गुरुवार रमजान ईदचा दिवस असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी होती. तरीसुद्धा या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 15 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी कोणतीही सुट्टी नसल्याने शुक्रवारच्या दिवशी या चित्रपटाची कमाई 50 टक्क्यांपेक्षा खाली उतरली आहे आणि बडे मिया छोटे मियाने BMCM Collection अवघ्या 7 कोटी रुपयांची कमाई केलीये.
BMCM Collection अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन
म्हणजेचं पहिल्या दोन दिवसात बडे मिया छोटे मिया हा चित्रपट फक्त BMCM Collection 22 कोटी रुपये कमवू शकला आहे आणि एवढ्या मोठ्या बिग बजेट चित्रपटासाठी ही कमाई खूप कमी आहे. जवळपास 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आत्ताच सुपर फ्लॉप मानला जात आहे.
मागील काही दिवसांपासून अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या दोघांचे ग्रहमान काही ठीक दिसत नाहीये आणि आता बडे मिया छोटे मियाने तर त्यांना जमिनीवरचं आपटलंय, यात शंका नाही. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर आला होता, तेव्हाचं प्रेक्षकांना हा ट्रेलर फारसा आवडला नव्हता.
FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका
असं म्हटलं जात होतं की बडे मिया छोटे मिया फ्लॉप जाईल आणि आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांनाही चित्रपट फारसा आवडलेला नाहीये. धमाकेदार ॲक्शन दाखवायचा नादात चित्रपटाची पटकथा आणि गोष्ट याकडे लक्ष देण्यात आलं नाहीये, असं सगळे म्हणताय.
त्यातचं बडे मिया छोटे मियासमोर अजय देवगनच्या मैदान या चित्रपटाचं मोठं आव्हान निर्माण झालंय. मैदान चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. समीक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलंय आणि आता हा चित्रपट वेग पकडतोय. त्यामुळे बडे मिया छोटे मियाचं कलेक्शन दिवसेंदिवस ढासळत चाललंय.
मैदान चित्रपटाने पहिल्या दिवशी 5 कोटींची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई वाढली आहे. पुढील काही दिवसात मैदान नक्कीचं बडे मिया छोटे मियापेक्षा जास्त कमाई करेल असं दिसतंय.
तुम्ही बडे मिया छोटे मिया चित्रपट पाहिलाय का ? तुम्हाला आवडला की नाही ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडित बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !