रुपाली भोसले ही मराठी टेलिव्हिजनवरील अतिशय सुंदर आणि उत्तम अभिनेत्री आहे.
तिने मराठीसोबतच अनेक हिंदी मालिकांमध्ये अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत.
सध्या ती आई कुठे काय करते मालिकेतील संजना या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झालीय.
रुपाली सोशल मीडियावर नेहमी आपले सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
नुकताच तिने गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारण्याचा व्हिडिओ शेअर केला होता.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघालेल्या महिलांच्या मोटारसायकल रॅलीमध्ये अनिरुद्धसोबत सहभागी झाली
रुपालीने नुकतंच निळ्या रंगाची नऊवारी पैठणी परिधान करून मस्त फोटोशूट केलं आहे.
नाकात कारवारी नथ, केसात फुलांचा गजरा, गळ्यात मोत्यांचे दागिने असा मराठमोळा लूक
रुपाली या फोटोंमध्ये खरीखुरी अप्सराचं दिसतेय.
तिच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत कौतुक केलंय.