महाराष्ट्राची हास्यजत्रामधून लोकप्रिय झालेला अभिनेता गौरव मोरे आता हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे.

गौरव आता आपल्याला लवकरच सोनी टीव्हीच्या मॅडनेस मचाएंगे या कॉमेडी शोमध्ये दिसेल.

सोनी टीव्हीने इंस्टाग्रामवर गौरवच्या कॉमेडी स्किटचा व्हिडिओ शेअर केला आहे.

तो अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता कुशल बद्रिके यांच्यासोबत काम करताना दिसतोय.

गौरवला अचानक हिंदीमध्ये सोनी टीव्हीच्या कॉमेडी शोमध्ये पाहून त्याच्या फॅन्सना धक्काच बसला आहे.

गौरवचे फॅन्स त्याच्या या यशाबद्दल व्हिडिओवर कमेंट करत आनंद व्यक्त करत आहेत

गौरव नुकताच मुंबई इंडियन्सच्या क्रूबरोबरसुद्धा दिसला होता त्यामुळे त्याचे फॅन्स खुश झाले होते.

त्यानंतर आता लगेचच गौरवने ही मोठी मजल मारली आहे. त्यामुळे सगळे आनंदात आहेत.

आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा असं म्हणताना ऐकण्यात मजा येईल.

गौरव लवकरच अल्याड पल्याड, महापरिनिर्वाण या दोन मराठी चित्रपटांमध्ये दिसणार