लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी हे गुढीपाडव्यानिमित्त एका महिलांच्या मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते.
नुकताच त्यांनी या मोटारसायकल रॅलीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला.
मिलिंद गवळींनी या मोटारसायकल रॅलीच्या निमित्ताने स्त्रियांचं कर्तृत्व आणि शक्तीबद्दल भाष्य केलं आहे.
ठाण्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त महिलांची मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.
आई कुठे काय करते मालिकेतून अनिरुद्ध आणि संजनाला आमंत्रित करण्यात आलं होतं.
त्यांनी सांगितलं की यावेळी 1000 पेक्षा जास्त महिला मोटारसायकल चालवत होत्या.
रॅलीमध्ये महिला नऊवारी नेसून फेटा बांधून, पुरुषांना लाजवतील अशा मोटारसायकल चालवत होत्या.
ते म्हणाले माझी लेक मिथिला ज्यावेळी एनफिल्ड चालवते तेव्हा मला तिचा गर्व वाटतो.
अनेक पुरुषांना आजही सायकलसुद्धा चालवता येत नाही, तिथे या मुली हे करून दाखवतात.
कोकीलाबेन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी तेही सांगितलं.