LIC Jeevan Shanti Policy | एलआयसी जीवन शांती पॉलीसी 2024

LIC Jeevan Shanti Policy

LIC Jeevan Shanti Policy

LIC Jeevan Shanti Policy लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून वरिष्ठांपर्यंत, महिलांपासून लहान बाळांपर्यंत एलआयसीकडे प्रत्येक वर्गासाठी एक प्लॅन आहे, एक पॉलिसी आहे. आयुष्याच्या कोणत्या वळणावर तुम्हाला कशाची आवश्यकता आहे ? कशाची गरज पडू शकते ? हा सगळा विचार करून एलआयसीने या पॉलिसी तयार केल्या आहेत.

जसं की सरकारी नोकरांना रिटायरमेंटनंतर दरमहा पेन्शन मिळते. परंतु प्रायव्हेट नोकरी करणारे किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना रिटायरमेंटनंतर पेन्शनची कोणतीही व्यवस्था नाहीये. मग त्यांचा रिटायरमेंटनंतर उदरनिर्वाह कसा चालणार ? त्यांना पैसे कुठून मिळणार ? या गोष्टीचा विचार एलआयसीने केला आहे आणि अशा लोकांसाठी एक पॉलिसी सुरू केली आहे.

एलआयसीच्या या पॉलिसीचं योजनेचं नाव आहे एलआयसी जीवन शांती (LIC Jeevan Shanti Policy). रिटायर झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात शांती यावी, त्याला दरमहा पेन्शन मिळावी, आर्थिक उत्पन्न स्थिर राहावं, याचा विचार करूनचं एलआयसीने ही योजना सुरू केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला  रिटायरमेंटनंतर किंवा तुम्हाला जेव्हा हवं आहे, त्या दिवसानंतर दरमहा पेन्शन मिळते.

मग ही एलआयसी जीवन शांती पॉलिसी नेमकी आहे तरी काय ? या LIC Jeevan Shanti Policy पॉलिसीच्या पात्रता आणि अटी काय आहेत ? या पॉलिसीमध्ये कशी गुंतवणूक करायची ? आणखीन लाभ काय मिळतील ? आज आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहोत.

एलआयसी जीवन शांती पॉलिसीचं उद्दिष्ट

ज्या लोकांकडे एक मोठी रक्कम आहे आणि त्यांना ती गुंतवायची आहे. ती रक्कम गुंतवून दरमहा एक आर्थिक स्थिरता देणारी रक्कम परत मिळवायचीये, अशा लोकांसाठीचं एलआयसीने जीवन शांती पॉलिसी सुरू केली आहे.

सध्या प्रायव्हेट क्षेत्रात नोकरी करणारे किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे रिटायरमेंटनंतर काय ? रिटायरमेंटनंतर दरमहा खर्च कसा चालणार ? त्या लोकांसाठी एलआयसीची जीवन शांती पॉलिसी बेस्ट ऑप्शन आहे.

एलआयसी जीवन शांती पॉलिसीची वैशिष्ट्ये

एलआयसीने सुरु केलेली ही LIC Jeevan Shanti Policy पॉलिसी खूपचं वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता आपण या पॉलिसीची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

1) या LIC Jeevan Shanti Policy पॉलिसीत गुंतवणूक करणारी व्यक्ती भारतीय असावी.

1) 30 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती एलआयसी जीवन शांती पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकते.

2) या LIC Jeevan Shanti Policy पॉलिसीमध्ये कमीत कमी 1.5 लाख रुपये गुंतवावे लागतात. तर जास्त पैसे गुंतवण्याची कोणतीही मर्यादा नाहीये.

3) या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर एलआयसी तुम्हाला जीवन विम्याचा लाभ ही देतं.

4) एलआयसीच्या जीवन शांती पॉलिसीमध्ये एक रकमी पैसे गुंतवायचे असतात. हे पैसे गुंतवल्यानंतर तुम्ही आजपासून पाच वर्षानंतर, दहा वर्षानंतर, पंधरा वर्षानंतर, वीस वर्षानंतर दरमहा पेन्शन मिळवू शकतात.

5) या LIC Jeevan Shanti Policy पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आयकरातही सूट मिळते. आयकर कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची कर सवलत घेता येते.

5) योजनेचा कालावधी सुरू असताना गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला जीवन विम्याचा लाभ आणि दरमहा पेन्शन हे दोन्ही फायदे दिले जातात.

एलआयसी जीवन शांती पॉलिसीच्या पात्रता आणि अटी

या LIC Jeevan Shanti Policy पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एलआयसीने काही पात्रता आणि अटी घालून दिल्या आहेत, आपण त्या पाहुयात.

1) या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक रकमी दीड लाख रुपये गुंतवावे लागतात.

2) पॉलिसी धारकाचं वय कमीत कमी 30 वर्षे असायला हवं.

3) या LIC Jeevan Shanti Policy पॉलिसीमध्ये कमीत कमी पाच वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते.

एलआयसी जीवन शांती पॉलिसीमध्ये गुंतवणूक कशी करायची

या LIC Jeevan Shanti Policy पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एलआयसीने ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

तुम्ही एलआयसीच्या वेबसाईटवर जाऊन ही पॉलिसी खरेदी करू शकता किंवा एजंट मार्फत ही या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात.

Gruh Laxmi Yojana 2024 | कर्नाटक गृहलक्ष्मी योजनेची माहिती

एलआयसी जीवन शांती पॉलिसीचे फायदे

एलआयसी नेहमीचं भारतीयांचा विचार करून वेगवेगळ्या पॉलिसी लॉन्च करत असते. या पॉलिसी सर्वांसाठी फायदेशीर असतात. प्रत्येक वयोगटासाठी त्यांच्याकडे पॉलिसी आहे आणि मार्केटमध्ये इतर कोणतीही कंपनी एलआयसी बरोबर कधीही स्पर्धा करू शकत नाही. कारण  एलआयसी ही एक सरकारी कंपनी आहे.

एलआयसीमध्ये गुंतवलेले पैसे हे सुरक्षित असतात. त्याचबरोबर जो परतावा एलआयसी देण्यासंबंधीत आपल्याला वचन देते, तो परतावा आपल्याला मिळणारचं असतो. त्यात काही कमी जास्त होत नाही. मार्केटमध्ये कितीही चढ उतार आले, तरी एलआयसीमध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना कोणतीही काळजी करण्याची गरज नसते, ते निवांत असतात.

त्यातचं एलआयसीने सुरु केलेली ही जीवन शांती पॉलिसी तर खूपचं फायदेशीर आहे. या LIC Jeevan Shanti Policy पॉलिसीचे एक नाही, अनेक फायदे आहेत. सध्याचा काळ हा औद्योगीकरणाचा आहे. सगळीकडे लोक प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकऱ्या करताय, आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्या करताय. सरकारी नोकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

प्रायव्हेट नोकरीमध्ये सरकारी नोकऱ्यांपेक्षा कदाचित जास्त पैसे मिळतात. परंतु सरकारी नोकरदारांना जी नोकरी बद्दलची शाश्वती असते. नोकरी पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर त्यांना जी पेन्शन मिळणार असते तसा लाभ खाजगी नोकरदारांना मिळत नाही. तशीच काहीतरी गोष्ट स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा आहे.

पगार कितीही जास्त असला, आयुष्यभर कितीही पैसे जमवून ठेवलेले असले, तरीसुद्धा रिटायरमेंट नंतर दरमहा उत्पन्नाचं काय ? उदरनिर्वाहाचं काय ? हा प्रश्न अनेक लोकांसमोर असतो आणि या प्रश्नाचं उत्तर जीवन शांती योजना घेऊन आली आहे.

जा लोकांना रिटायरमेंटनंतर एक मंथली पेन्शन हवी आहे. दर महिन्याला काहीतरी उत्पन्न मिळायला हवं, अशी त्यांची इच्छा आहे. ते लोक या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतात. कमीत कमी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करणं या योजनेमध्ये आवश्यक आहे. म्हणजे जर तुमच्याकडे एक रकमी पैसे असतील, तर ही LIC Jeevan Shanti Policy योजना तुमच्यासाठी खूपचं फायदेशीर आहे.

एलआयसी ही एक जीवन विमा कंपनी असल्यामुळे या योजनेत पैसे गुंतवल्याचा आणखीन एक फायदा म्हणजे तुम्हाला जीवन विम्याचा लाभ सुद्धा मिळतो. म्हणजेचं तुमची गुंतवणूक तर सुरक्षित राहते, तुम्हाला काही वर्षानंतर चांगला परतावाही मिळणारचं असतो, परंतु जर या कालावधीत तुमचं काही बरं वाईट झालं, तर तुमच्या कुटुंबाची सुद्धा काळजी या योजनेमार्फत घेतली जाईल.

एलआयसी गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला जीवन विम्याचा लाभही देतं आणि त्याने जे पैसे गुंतवलेले आहेत, त्या प्रमाणात त्याला दरमहा पेन्शनसुद्धा देईल. म्हणजे कुटुंबाचं भविष्य सुद्धा सुरक्षित राहतं.

मार्केटमध्ये दरमहा पेन्शन मिळण्यासाठी इतरही अनेक योजना आहेत. परंतु एलआयसीच्या या योजनांचा मुख्य फायदा म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतात. गुंतवणूकदाराचे भविष्य सुरक्षित राहतं आणि त्याचबरोबर गुंतवणूकदाराच्या कुटुंबाचं भविष्य सुद्धा सुरक्षित राहतं. असे तिहेरी फायदे या योजनांमध्ये मिळतात.

त्यामुळेचं मार्केटमध्ये कितीही खाजगी कंपन्या आल्या, त्यांचे कितीही जास्त परतावे देणारे प्लॅन्स आले, तरीसुद्धा लोकांचा विश्वास हा एलआयसी वरच आहे. एलआयसी ही भारतातील नंबर वन जीवन विमा कंपनी आहे आणि आता त्यांच्या गुंतवणूक योजना सुद्धा गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेत आहेत. लोक त्यामध्ये पैसे गुंतवत आहेत आणि चांगला परतावा मिळवत आहेत, हे मात्र नक्की.

FAQ’sएलआयसी जीवन शांती योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : जीवन शांती योजना कोणी सुरू केली आहे ?

उत्तर : ही LIC Jeevan Shanti Policy योजना सरकारी भारतीय विमा कंपनी एलआयसीने सुरू केली आहे.

2) प्रश्न : एलआयसी जीवन शांती योजनेमध्ये कमीत कमी किती रुपयांची गुंतवणूक करता येते ?

उत्तर : या LIC Jeevan Shanti Policy योजनेमध्ये कमीत कमी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. तर जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाहीये.

3) प्रश्न : एलआयसी जीवन शांती योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?

उत्तर : ज्या लोकांकडे एक रकमी पैसे आहेत आणि ज्यांना काही वर्षानंतर दरमहा एक ठराविक रक्कम त्यांच्या अकाउंटवर यावी अशी इच्छा आहे. त्या लोकांसाठी एलआयसीने जीवन शांती पॉलिसी सुरू केली आहे. म्हणजे एक प्रकारे दरमहा पेन्शन या योजनेच्या माध्यमातून मिळवता येते.

4) प्रश्न : एलआयसी जीवन शांती पॉलिसीमध्ये कोणाला गुंतवणूक करता येते ?

उत्तर : ज्या भारतीय व्यक्तीचे वय 30 वर्ष आहे, तो व्यक्ती या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो.

5) प्रश्न : एलआयसी जीवन शांती योजनेमध्ये जीवन विम्याचा लाभ मिळतो का ?

उत्तर : होय, या LIC Jeevan Shanti Policy योजनेअंतर्गत एलआयसी जीवन विम्याचा लाभ ही देतं. योजनेदरम्यान जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला, तर एलआयसी जीवन विम्याचा लाभ आणि त्याचबरोबर दरमहा पेन्शनही कुटुंबाला मिळते.

एलआयसीची ही LIC Jeevan Shanti Policy योजना त्या लोकांसाठी खूपचं फायदेशीर आहे, ज्या लोकांना रिटायरमेंटनंतर दरमहा पेन्शन हवी आहे. त्यांचा हा प्रश्न एलआयसीने खूपचं सोप्या पद्धतीने सोडवला आहे. कारण जर तुमच्याकडे एकरकमी पैसे असतील, तर ते गुंतवायचे कोठे हा प्रश्न अनेक लोकांसमोर असतो. एलआयसीच्या या योजनेमध्ये पैसेही गुंतवता येतात, ते सुरक्षितही राहतील आणि रिटायरमेंटनंतर पेन्शनची समस्या सुद्धा सुटेल.

तुमच्या मनात एलआयसी जीवन शांती योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अशाचं गुंतवणूकीच्या योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top