Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 | महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना

Maharashtra Kukkutpalan Yojana 2024

Maharashtra Kukkutpalan Yojana 2024

Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 राज्य आणि देशातील बेरोजगारी हटवणं, तरुणांच्या हाताला काम देणे, त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढवणे, हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य असतं. आपल्या देशात आणि राज्यात बेरोजगारीची समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. त्यामुळे राज्यात जास्तीत जास्त नोकऱ्या वाढवणं, त्याचबरोबर लोकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणं हेही सरकारचं कर्तव्य आहे.

आपल्या देशामध्ये सुशिक्षित तरुणांच्या तुलनेत नोकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सरकारचा भर तरुणांना व्यवसाय करायला लावण्यावर आहे. जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे सरकारचे उद्दिष्ट असतं. आणि आता याच उद्दिष्टाला नजरेसमोर ठेवून महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, याचा वापर ते कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतात.

मग ही महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना (Maharashtra Kukkutpalan Yojana 2024) नेमकी आहे तरी काय ? या योजनेचा किती लाभ मिळतो ? या योजनेअंतर्गत किती कर्ज मिळतं ? या Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहेत ? अर्ज कसा करायचा ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही खूपचं वैशिष्ट्यपूर्ण Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 योजना आहे. आपण या योजनेच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.

1) शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, हा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या कुक्कुटपालन योजनेचा प्राथमिक उद्देश आहे.

2) राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायाची एक संधी मिळवून देणे, हाही या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

3) या योजनेअंतर्गत इच्छित सुशिक्षित तरुणांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ज्याचा वापर ते कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतात.

4) कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजार ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलं जातं.

5) कर्ज मिळालेल्या रुकमेनुसार हे कर्ज फेडण्याची मुदत पाच वर्ष ते दहा वर्षां दरम्यान असते. कर्जाची रक्कम आणि व्याजावरही सरकारकडून सबसिडी देण्यात येते.

6) राज्यातील सरकारी बँक, ग्रामीण बँक, सहकारी बँक, कृषी बँक यांच्यामार्फत हे कर्ज वाटप केले जातात.

महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेसाठी पात्रता आणि अटी

या Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 योजनेअंतर्गत अर्ज करायचा असल्यास सरकारने काही पात्रता आणि अटी आखून दिल्या आहेत, आपण त्या पाहुयात.

1) अर्जदाराला कुक्कुटपालन या विषयाचं शिक्षण किंवा अनुभव असला पाहिजे.

2) कुक्कुटपालन करण्यासाठी अर्जदाराकडे जमीन उपलब्ध असायला हवी.

3) अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ निवासी असावा.

4) जर अर्जदार आधीचं शेळीपालन किंवा मेंढीपालन असे व्यवसाय करत असेल, तर तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

5) महाराष्ट्र राज्यातील 18 ते 60 या वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते.

महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालीलप्रमाणे कागदपत्र असणे आवश्यक आहे.

1) अर्जदाराचं आधार कार्ड

2) अर्जदाराचा रहिवासी दाखला

3) अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो

4) पोल्ट्री फार्म संबंधित परमिट

5) अर्जदार बँक अकाउंट पासबुक

6) अर्जदाराचा मोबाईल नंबर

महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज कसा करायचा

या Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 योजनेत अर्ज करण्यासाठी कोणतीही ऑनलाइन पद्धत उपलब्ध नाहीये. योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

त्यासाठी तुमच्या नजीकच्या कोणत्याही सरकारी किंवा सहकारी कृषी बँकेत तुम्ही जाऊ शकता. येथे गेल्यावर तुम्हाला महाराष्ट्र कुक्कुटपालन योजने संबंधित माहिती विचारावी लागेल.

तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर बँकेकडून तुम्हाला या योजनेचा अर्ज दिला जाईल.

या अर्जात लिहिलेली संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडून तुम्ही अर्ज बँकेत जमा करायचा आहे.

पुढे बँकेचे अधिकारी आणि सरकारी अधिकारी या अर्जाची छाननी करतील आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज मंजूर होईल.

महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना का महत्त्वाची

सध्या आपल्या देशात दोन खूप मोठ्या समस्या आहेत. पहिली आहे शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांचं आयुष्यमान, जीवनमान दिवसेंदिवस खालावत चाललंय. त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली आहे आणि दुसरी मोठी समस्या म्हणजे तरुण बेरोजगारांची. देशात तरुणांची संख्या मोठी आहे. ते सुशिक्षित सुद्धा आहेत. परंतु त्यांच्या हाताला काम नाहीये, त्यांना नोकरी नाहीये.

या दोन समस्या सोडवणं, हे सरकारचं प्राथमिक उद्देश आहे. त्यामुळे या दोन्ही समस्या एकाचं वेळेस सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र कुकुटपालन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून जास्त उत्पन्न मिळत नाही. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे खूप कमी जमीन आहे. त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह चालत नाही. असे तरुण शेतकरी ज्यांना शेतीबरोबरचं एखादा जोडधंदा करायचा आहे. असे तरुण बेरोजगार ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. शेतीशी निगडित व्यवसाय करायचा आहे. शेती जमीन आहे. परंतु व्यवसाय करण्यासाठी कर्ज नाहीये.

अशा शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगार तरुणांची समस्या लक्षात घेऊनचं महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा संबंध सरकारने सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी या दोघांशी जोडला आहे. म्हणजे ते एकमेकांचे पूरक आहेत. असं नेहमी म्हटलं जातं की, जर शेती ही शाश्वत करायची असेल. फायदेशीर बनवायची असेल, तर शेतकऱ्यांनी फक्त शेतीच्या उत्पन्नावर मर्यादित न राहता त्याबरोबर एक शेती पूरक असा जोडधंदा करायला हवा.

जसं की अनेक शेतकरी शेती बरोबरचं दुग्ध व्यवसाय सुद्धा करतात. कारण गाय आणि म्हैस यांच्यासाठी लागणारा चारा त्यांना स्वतःच्या शेतातूनचं मिळतो. त्यामुळे त्यांचा खर्चही वाचतो. त्याचबरोबर दिवसभर शेतकरी शेतात काम करून सकाळ-संध्याकाळ दूध व्यवसाय करू शकतो.
शहराजवळ राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय करूनचं आपल्या शेती व्यवसायाला फायदेशीर बनवलं आहे. ते मोठ उत्पन्नही घेताय.

तसंच अनेक शेतकरी आपल्या शेततळ्यांमध्ये मत्स्य पालनही करत आहेत. मेंढी पालन, शेळीपालन यांसारखे शेतीतील जोडधंदे ही अनेक शेतकरी करत आहेत आणि आता त्याच्या जोडीला सरकारने कुक्कुटपालनचा पर्याय सुद्धा त्यांना उपलब्ध करून दिला आहे. कुक्कुटपालन हा खूपच फायदेशीर उद्योग आहे. जेथे शेतकरी मोठा नफा कमवू शकतात.

आपल्या येथे अशी अनेक कुटुंब आहेत. जेथे घरातील जेष्ठ व्यक्ती शेती करतात. परंतु त्यांची तरुण मुलं शिकली आहेत. मात्र त्यांना एक तर शहरांमध्ये नोकरी मिळत नाहीये किंवा त्यांची नोकरी करण्याची इच्छाचं नाहीये. आपल्या गावी राहून शेतामध्ये काहीतरी नवीन करावं, त्यातून उत्पन्न मिळवावं अशी त्यांची इच्छा असते.

अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ही योजना खूपचं फायदेशीर आहे. आपल्या शेत जमिनीचा वापर ते या व्यवसायासाठी करू शकतात. त्यांना सरकारकडून कर्ज म्हणजे भांडवल सुद्धा उपलब्ध होईल आणि आपल्याचं गावात राहून व्यवसाय करण्याची त्यांची इच्छा नक्कीचं पूर्ण होईल.

हेही वाचा : Jharkhand School Chhatra Cycle Yojana | झारखंड स्कूल छात्र सायकल योजना

कारण सध्या गावांमधून शहरांकडे होणारं पलायन ही सुद्धा खूप मोठी समस्या आहे. गावं ओसाड होत चालली आहेत. तर शहरं ही गर्दीने पूर्णपणे भरून गेली आहेत. जिकडे तिकडे ट्रॅफिक आहे. जिकडे तिकडे लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे आणि असंही नाहीये की, शहरात गेल्यावर सगळ्यांचं आयुष्यमान सुधारतं.

अनेक तरुणांना शहरात केल्यावर कमी पगाराच्या नोकऱ्या मिळतात. जिथे काम जास्त असतं आणि पगार कमी असतो. त्याचबरोबर शहरात राहण्याचा खर्चही मोठा असतो. घर भाडं, जेवण यासारख्या गोष्टीही खूप महाग असतात. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा उरत नाही. अशावेळेस अनेक तरुण हे निराश सुद्धा होतात की, एवढं शिक्षण घेऊन आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली नाही आणि पैसेही उरत नाहीये.

या समस्यांवर तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने आणलेली ही महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 खूपचं उपयुक्त आहे, यात शंका नाही.

FAQ’s महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 अंतर्गत कोणाला कर्ज दिलं जाईल ?

उत्तर : या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि बेरोजगार तरुण यांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

2) प्रश्न : महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अट कोणती आहे ?

उत्तर : कुक्कुटपालन करण्यासाठी जमीन असणं खूप महत्त्वाचं असतं. जर अर्जदाराकडे जमीन उपलब्ध असेल, तरच त्याला या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.

3) प्रश्न : महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेअंतर्गत किती रुपयांचं कर्ज मिळतं ?

उत्तर : या योजनेअंतर्गत 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज महाराष्ट्र सरकार उपलब्ध करून देत.

4) प्रश्न : महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना सुरू करण्याचा सरकारचा उद्देश्य काय आहे ?

उत्तर : शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवणं आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

5) प्रश्न : महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेत कर्जाची परतफेड किती वर्षांमध्ये करावी लागते ?

उत्तर : या Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जावर पाच ते दहा वर्षांची परतफेड आहे.

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ही Maharashtra Kukkutpalan Yojana 2024 योजना खूपचं कौतुकास्पद आहे. शेतकरी आणि बेरोजगार तरुणांनी या योजनेचा नक्कीचं लाभ घ्यायला हवा, यात शंका नाही.

तुमच्या मनात महाराष्ट्र कुक्कुटपालन योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि अशाचं सरकारी योजनांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top