Pradhanmantri Kusum Yojana 2024 | प्रधानमंत्री कुसुम योजना

Pradhanmantri Kusum Yojana 2024

Pradhanmantri Kusum Yojana 2024

Pradhanmantri Kusum Yojana 2024 भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. देशातील मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतीवरचं त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि शेती करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते पाणी म्हणजेचं सिंचन व्यवस्था.

भारत देशाचं क्षेत्रफळ आणि वातावरणातील भिन्नता पाहता अशी अनेक राज्य आहेत, जेथे पावसाचं प्रमाण कमी जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी सिंचन व्यवस्थेवर अवलंबून राहावं लागतं. त्यातचं अनेक ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना आकाशाकडे डोळे करावे लागतात आणि होणाऱ्या पावसावरचं अवलंबून राहावं लागतं.

त्यामुळे दिवसेंदिवस भारतातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय होत चालली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचं असेल, त्यांचं जीवनमान, आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, तर देशभरात सिंचन व्यवस्था झाली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे.

अनेक शेतकरी शेतात पाणी पोहोचण्यासाठी विहिर किंवा बोरवेलचीही मदत घेतात. परंतु विहीर आणि बोरवेलमधून पाणी उपसायचं असल्यास पंपची गरज असते आणि हे पंप खूप महाग असतात. अनेक शेतकरी शेतात विहिर किंवा बोरवेल घेऊ शकत नाही. त्यांना कर्ज घ्यावं लागतं. ते कर्जबाजारी होतात.

म्हणूनचं अशा शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने प्रधानमंत्री कुसुम योजना (Pradhanmantri Kusum Yojana 2024) राबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री कुसुम योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान योजना.

मग ही प्रधानमंत्री कुसुम योजना नेमकी आहे तरी काय ? या Pradhanmantri Kusum Yojana 2024 योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणता फायदा देण्यात येईल ? या योजनेच्या पात्रता आणि अटी काय आहेत ? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ? आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

प्रधानमंत्री कुसुम योजना

भारत सरकारने प्रधानमंत्री कुसुम योजनेचे तीन घटक ठरवले आहेत.

1) या Pradhanmantri Kusum Yojana 2024 योजनेअंतर्गत सर्वात आधी दहा हजार मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पांना एकत्र जोडणे.

2) 20 लाख सौर कृषी पंपांची स्थापना करणे

3) आणि तिसऱ्या घटकात 20 लाखांपैकी 15 लाख सौर कृषी पंपांच सौरकरणं करण

या योजनेसाठी भारत सरकारने 34000 कोटी रुपयांचं बजेट ठेवलं आहे आणि या योजनेच्या दुसऱ्या चरणात जे 20 लाख सौर कृषी पंप स्थापन केले जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेत सम्मिलित करून घेण्यात येईल आणि त्यांना शेतामध्ये सौर पंप बसवण्याच्या उद्देशाने प्रोत्साहित करण्यासाठी सबसिडी दिली जाईल.

प्रधानमंत्री कुसुम योजनेची वैशिष्ट्ये

या Pradhanmantri Kusum Yojana 2024 योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप लावण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल आणि सबसिडी दिली जाईल.

ही सबसिडी 3 एचपी, 5 एचपी आणि 10 एचपीचे सौर पंप लावण्यासाठी देण्यात येईल. आता आपण वेगवेगळ्या सौर पंपसाठी किती सबसिडी मिळेल आणि त्यांची किंमत काय आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.

1) 3HP DC सबमर्सिबल पंपची किंमत 2 लाख 32 हजार रुपये आहे. या योजनेअंतर्गत सरकार 1 लाख 40 हजार रुपयांची सबसिडी देतं. शेतकऱ्याला पंप घेण्यासाठी उरलेलं 88 हजार रुपये आणि 5 हजार रुपये टोकन म्हणून द्यावे लागतात.

2) 3HP AC सबमर्सिबल पंपची किंमत 2 लाख 30 हजार रुपये आहे. यासाठी सरकार 1 लाख 30 हजार रुपये सबसिडी देईल आणि बाकीचे पैसे 5 हजार रुपयांच्या टोकनबरोबर शेतकऱ्यांना द्यावे लागतील.

3) 5HP सबमर्सिबल पंपची किंमत 3 लाख 27 हजार रुपये आहे. सरकार या पंपवर 1 लाख 96 हजार रुपयांची सबसिडी देतं. शेतकऱ्यांना उरलेले 1 लाख 25 हजार आणि 5 हजार रुपये टोकन द्यावे लागतील.

4) 10HP AC सबमर्सिबल पंपची किंमत 5 लाख 57 हजार रुपये आहे. सरकार या पंपवर 2 लाख 66 हजार रुपयांची सबसिडी देईल. उरलेले 2 लाख 84 हजार आणि 5 हजार रुपये टोकन शेतकऱ्यांना द्यावे लागतील.

या Pradhanmantri Kusum Yojana 2024 योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन बुकिंग करावी लागेल आणि 5 हजार रुपये टोकन भरावे लागतील. शेतकऱ्यांचा कृषी पंप कन्फर्म झाल्यानंतर त्यांना एक आठवड्याच्या आत उरलेले पैसे भरावे लागतील. नाहीतर त्यांचा अर्ज रद्द करून 5000 टोकन जप्त करण्यात येईल.

या योजनेसाठी सरकार फक्त कृषी पंपवर सबसिडी देणार आहे. बोरिंग किंवा विहीर स्वतःच शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने घ्यावी लागेल. 3 HP आणि 5HP पंपसाठी 6 इंच आणि 7HP & 10HP साठी 8 इंचाची बोरिंग घ्यावी लागेल.

शेतकऱ्यांनी केलेला अर्ज मान्य झाल्यानंतर शेतात शहानिशा करण्यासाठी सरकारी अधिकारी येतील आणि त्या ठिकाणी बोरिंग नसेल तर, शेतकऱ्याचा अर्ज रद्द करून टोकन दिलेली रक्कम जप्त करण्यात येईल.

हेही वाचा : Rajiv Gandhi Parivar Vima Yojana | राजीव गांधी परिवार विमा योजना

प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज कसा करायचा

या Pradhanmantri Kusum Yojana 2024 योजनेमधील सोलर पंप बसवण्याची जबाबदारी केंद्र सरकारने राज्य सरकारांकडे दिली आहे. राज्य सरकार आपापल्या राज्यांमध्ये दरवर्षी या योजनेबद्दल अर्ज मागवत असतं आणि एक ऑनलाईन पोर्टल सुरू करतं. ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज करायचा असतो.

प्रधानमंत्री कुसुम योजनेचे महत्त्व

रात्रंदिवस शेतकरी त्याच्या शेतामध्ये कष्ट करत असतो. शेतकऱ्याच्या कष्टाला फक्त दोनच गोष्टींची जोड लागते, पहिलं आहे धरणी माय आणि दुसरं पाणी. आपल्या देशातील वातावरण प्रत्येक 10 किलोमीटरला बदलत असतं. त्यामुळे तेथे पडणारा पाऊस, सिंचनाची व्यवस्था या गोष्टींचा शेतकऱ्यांच्या शेतामधील उत्पन्नावर खूप मोठा परिणाम होतो.

जर शेतकऱ्यांना त्यांना हवं तेवढं आणि हवं तेव्हा पाणी शेतापर्यंत मिळालं, तर ते शेतामध्ये सोनं पिकवू शकतात, यात शंका नाही. परंतु आपल्या देशातील अनेक ठिकाण अशी आहेत, जेथे अजूनही शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था नाहीये. त्यांना आपल्या शेतात पाण्यासाठी खूप झगडावं लागतं किंवा बळीराजाला इंद्र देवावरचं अवलंबून राहावं लागतं. पाऊस पडेल आणि त्यांच्या शेतात पाण्याची व्यवस्था होईल.

त्यातचं जर सरकारकडून सिंचनाची व्यवस्था झाली नाही, तर स्वतःच्या शेतात बोरिंग घेणं, विहीर घेणं आणि त्यात पाण्यासाठी पंप बसवणं या सगळ्या गोष्टी खूप खर्चिक असतात. आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती या गोष्टींसाठी त्याला परवानगी देत नाही.

परंतु शेतकऱ्यांना शेतात अन्न तर पिकवायचंच आहे. त्यासाठी ते कर्ज घेतात, कर्जबाजारी होतात. परंतु जर त्यांना हे कर्ज परत करता आलं नाही. तर काही शेतकरी चुकीची पावलंही उचलतात. या सर्व समस्यांवर तोडगा म्हणूनचं भारत सरकारने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या Pradhanmantri Kusum Yojana 2024 योजनेचे वेगवेगळे चरण आहेत. या चरणां अंतर्गतच शेतकऱ्यांच्या शेतात 20 लाख सोलर पंप बसवण्याचं उद्दिष्ट सरकारने ठरवलं आहे. हा सोलर पंप बसवण्याचे खूप फायदे होतील. सर्वात महत्त्वाचं तर शेतकऱ्यांना कोणत्याही पंपाचे पैसे परवडत नाही, किंमत परवडत नाही. सरकार या सोलर पंपवर चांगली सबसिडी देणार आहे.

दुसरं म्हणजे अनेकदा शेतकरी त्याच्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था करतो. पंपची व्यवस्था करतो, परंतु विजेची व्यवस्था त्याला करता येत नाही. शेतकऱ्यांना दिवसभर नाही, तर रात्रीच्या वेळेस वीज दिली जाते आणि शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात शेताला पाणी द्यायला जावं लागतं. तेथे अनेक वेळेस त्यांच्यावर हिंसक प्राण्यांकडून हल्लाही केला जातो. या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या कौटुंबिक आयुष्यावर सुद्धा परिणाम होतो.

परंतु जेव्हा हे सोलर पंप शेतामध्ये बसवले जातील, तेव्हा शेतकऱ्यांना विजेची गरज पडणारचं नाही. सौर उर्जेवर हे पंप चालतात. त्यामुळे शेतकऱ्यांना वाटेल तेव्हा ते आपल्या शेताला पाणी देऊ शकतात. रात्री शेतावर जाण्याची त्यांना गरज पडणार नाही. त्यातच त्यांना वीज बिल भरण्याचीही गरज पडणार नाही. असे एक ना अनेक फायदे या Pradhanmantri Kusum Yojana 2024 योजनेचे आहेत.

प्रधानमंत्री कुसुम योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1) प्रश्न : प्रधानमंत्री कुसुम योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?

उत्तर : या योजनेअंतर्गत देशभरात 20 लाख सौर कृषी पंप शेतात बसवले जाणार आहे.

2) प्रश्न : प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी केंद्र सरकारने किती बजेट ठेवलं आहे ?

उत्तर : या Pradhanmantri Kusum Yojana 2024 योजनेसाठी केंद्र सरकारने 34000 कोटी रुपयांचं बजेट नक्की केलं आहे.

3) प्रश्न : प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंपावर किती सबसिडी मिळते ?

उत्तर : या योजनेअंतर्गत सरकार तीन एचपी, पाच एचपी, सात एचपी आणि दहा एचपीच्या सौर पंपावर वेगवेगळी सबसिडी देते.

4) प्रश्न : प्रधानमंत्री कुसुम योजनेचा फायदा काय आहे ?

उत्तर : प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिले जातील. ते सौरऊर्जेवर चालतात. त्यामुळे त्याला विजेची गरज पडत नाही. शेतकऱ्यांना जो विजेचा असंतुलित पुरवठा होतो किंवा अवेळी पुरवठा होतो, त्यामुळे त्यांना जे प्रॉब्लेम येतात. ते या योजनेमुळे दूर होतील.

5) प्रश्न : शेतात विहीर किंवा बोरवेल खणण्याचा खर्च सरकारद्वारे दिला जातो का ?

उत्तर : नाही, या Pradhanmantri Kusum Yojana 2024 योजनेअंतर्गत फक्त सौर कृषी पंपवर सबसिडी दिली जाते. बोरवेल किंवा विहिरीचा खर्च शेतकऱ्याने स्वतःचं करायचा असतो.

एकूणचं भारत सरकारने सुरू केलेली ही प्रधानमंत्री कुसुम योजना (Pradhanmantri Kusum Yojana 2024) खूपचं फायदेशीर आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात कृषी पंप बसवायचा आहे. त्यांनी नक्कीचं या योजनेचा लाभ घ्यायला हवा.

तुमच्या मनात प्रधानमंत्री कुसुम योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीचं प्रयत्न करू आणि आणखी सरकारी योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top