7 Chiranjeevi In Kaliyug आपल्या सर्वांच्या कानावर एक वाक्य हमखास येतं, की जो या जगात जन्माला आलाय, एक ना एक दिवस त्याचा मृत्यू नक्की होणार. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं हे शरीर एक दिवस या पंचमहाभूतांमध्येचं विलीन होणार.
या जगात, या पृथ्वीवर कुणीही अमर नाहीये. पण जर मी तुम्हाला सांगितलं की, आज या जगातचं, या पृथ्वीवरचं, असे सात व्यक्ती आहेत, जे अमर आहेत. त्यांना चिरंजीवी म्हटलं जातं. हे ऐकून तुम्हाला नक्कीचं आश्चर्य वाटेल. मग कोण आहेत हे चिरंजीवी ? कोण आहेत हे 7 Chiranjeevi In Kaliyug ? आज आपण त्यांच्याबद्दलचं जाणून घेऊया.
7 Chiranjeevi In Kaliyug
आपल्या धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार असे सात चिरंजीवी 7 Chiranjeevi In Kaliyug आहेत, जे मागील हजारो वर्षांपासून जिवंत आहेत आणि कलियुगाच्या अंतापर्यंत ते या पृथ्वीवरचं राहतील. जोपर्यंत पुन्हा एकदा सतयुगाला सुरुवात होत नाही.
हे सात चिरंजीवी आहेत, संकटमोचन बजरंग बली, भगवान परशुराम, असुरराज बली, कृपाचार्य, अश्वत्थामा, विभीषण आणि महर्षी व्यास.
हे सातही चिरंजीवी 7 Chiranjeevi In Kaliyug कोणत्यातरी वरदानाने, शापाने किंवा नियमाने बांधले गेले आहेत आणि मागील हजारो वर्षांपासून ते आपल्या पृथ्वीवरच जिवंत आहेत.
या चिरंजीवीबद्दल असंही म्हटलं जातं की, जेव्हा भगवान विष्णू कलियुगातील त्यांचा कल्की अवतारात जन्म घेतील. तेव्हा हे सात चिरंजीवी त्यांच्याबरोबर कली दानवाविरुद्ध होणाऱ्या महायुद्धात सहभागी होतील.
लाखों वर्षांपासून जिवंत असलेले हे 7 चिरंजीवी
मग या सात चिरंजीवींची 7 Chiranjeevi In Kaliyug गोष्ट नेमकी काय आहे ? ते आपण एक एक करून जाणून घेऊया.
संकटमोचन महाबली हनुमान : महाबली हनुमानाची गोष्ट आपल्या सर्वांना माहितीये. त्यांना अमरत्वाचं वरदान मिळालं होतं. प्रभू श्रीरामाचे परमभक्त असलेले हनुमान यांचा उल्लेख रामायणात आहे आणि त्यानंतर हजारो वर्षांनी घडलेल्या महाभारतातसुद्धा त्यांचा उल्लेख आढळून येतो. महाभारतात त्यांनी पांडवांपैकी एक असलेल्या भिमाचा अहंकार मोडला होता.
सध्या सुरू असलेल्या कलियुगात संत तुलसीदास यांनी बजरंग बलीचं दर्शन केल्याची आख्यायिका आहे. संत तुलसीदास यांनी रामचरित मानस या महाकाव्याची रचना केली होती.
महाबली हनुमान पृथ्वीवर भगवान विष्णूंच्या कल्की अवताराची वाट पाहत आहेत. जेव्हा भगवान कल्की पृथ्वीवर जन्म घेतील आणि कली दानवाविरुद्ध युद्ध लढतील, तेव्हा बजरंगबली या युद्धात त्यांच्या बाजूने सामील होतील, असंही म्हटलं जातं.
भगवान परशुराम : भगवान परशुराम यांना भगवान विष्णूंचा सहावा अवतार म्हटलं जातं. त्यांचा जन्म सतयुगात झाला होता. आधी त्यांचं नाव राम ठेवण्यात आलं, परंतु त्यानंतर भगवान शंकर यांनी त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन त्यांना परशु हे अस्त्र दिलं. तेव्हापासून ते परशुराम या नावाने ओळखले जाऊ लागले.
भगवान परशुराम यांचा उल्लेख रामायणात आणि महाभारतातही आढळतो. रामायणात जेव्हा प्रभू श्रीराम यांनी माता सीतेच्या स्वयंवरात शिवधनुष्य मोडलं होतं, तेव्हा भगवान परशुराम तेथे आले होते.
महाभारतातही गंगापुत्र भीष्म यांचे ते गुरु होते. त्याचबरोबर सूर्यपुत्र कर्ण यांनाही धनुर्विद्या भगवान परशुराम यांनीचं शिकवली होती.
भगवान परशुराम आजही पृथ्वीवर आहेत, असं म्हटलं जातं.
असुरराज बली : राजा बली हे महादानी होते. त्यांच्याजवळ कुणीही दान मागायला आलं, तर ते मनमोकळेपणाने ती वस्तू त्यांना दान करायचे. परंतु या गोष्टीचा त्यांना खूप अहंकार झाला आणि ते देवांचं राज्य असलेल्या स्वर्गावर सुद्धा हक्क सांगू लागले.
तेव्हा स्वर्गलोकाला वाचवण्यासाठी भगवान विष्णू यांनी वामन अवतार धारण केला आणि ते राजा बलीकडे दान मागायला गेले. राजा बलीने त्यांना काहीही मागण्यास सांगितलं. तेव्हा मला फक्त तीन पावलं जमीन हवी आहे, असं भगवान विष्णूचा अवतार वामन म्हणाले. राजा बली यासाठी तयार झाले. तेव्हा भगवान विष्णूंच्या वामन अवताराने फक्त दोन पावलातचं तिन्ही लोक व्यापून टाकले. आणि तिसऱ्या पावलात त्यांनी राजा बलीवरचं पाऊल ठेवलं आणि त्यांना पाताळलोकात धाडलं. असं म्हटलं जातं की, राजा बली अजूनही पाताळात जिवंत आहेत.
हेही वाचा : बजरंग बलींनी पंचमुखी हनुमान अवतार का घेतला
विभीषण : रामायणातील विभीषण आपल्या सर्वांनाचं माहितीये. रावणाचा छोटा भाऊ असलेल्या विभीषणने प्रभू श्रीराम यांची मदत केली होती. रावणाच्या मृत्यूनंतर विभीषण लंकेचा राजा बनला. विभीषणला अमरत्वाचं वरदान प्राप्त आहे आणि असं म्हटलं जातं विभीषण अजूनही या पृथ्वीवर जिवंत आहे.
अश्वत्थामा : महाभारतातील गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा अजूनही या पृथ्वीवर जिवंत आहे. परंतु वरदानामुळे नाही तर एका श्रापामुळे. महाभारताच्या युद्धात जेव्हा गुरु द्रोणाचार्य यांचा पांडवाच्या हातून मृत्यू झाला. तेव्हा अश्वत्थामा खूप चिडला आणि पांडवांचा बदला घेण्यासाठी त्याने रात्रीच्या अंधारात पांडवांच्या पुत्रांची हत्या केली.
आपल्या मुलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पांडवांनी अश्वत्थामाचा पाठलाग केला. अर्जुन आणि अश्वत्थामामध्ये युद्ध सुरू झालं. तेव्हा या दोघांनी एकमेकांवर ब्रह्मास्त्र चालवलं. परंतु महर्षी वेद व्यास त्यांच्या सांगण्यांवरून अर्जुनाने ब्रह्मास्त्र मागे घेतलं.
परंतु अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र मागे कसं घ्यायचं, हे माहीत नव्हतं. त्यामुळे त्याने चक्क अर्जुनाचा पुत्र असलेल्या अभिमन्यूची पत्नी उत्तरा जी त्यावेळेस गरोदर होती, तिच्या पोटावरच हे ब्रह्मास्त्र चालवलं.
हे पाहून भगवान श्रीकृष्ण यांना राग अनावर झाला आणि त्यांनी अश्वत्थामाच्या माथ्यावर असलेला मनी काढून घेतला. या जखमेतून रक्त वाहू लागलं. तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी अश्वत्थामाला कलियुगाच्या अंतापर्यंत या पृथ्वीवर तू असाच भटकत राहशील. तुझ्या डोक्यावरची जी जखम आहे, त्यातून रक्त वाहत राहील. या पृथ्वीवर तू राहिलास तरी कोणताही प्राणी, कोणताही मनुष्य तुझ्याजवळ भटकणार नाही. तुझ्या अंगाची दुर्गंधी येत राहील, त्यामुळे तुला घोर जंगलात राहावं लागेल, असा श्राप दिला.
तेव्हापासूनचं अश्वत्थामा या पृथ्वीवर जिवंत आहे आणि भटकतोय.
महर्षी व्यास : महर्षी व्यास यांनी महाभारताची रचना केली होती. त्यांनाही चिरंजीव असल्याचं वरदान प्राप्त आहे. ते अजूनही या पृथ्वीवर जिवंत आहेत.
कृपाचार्य : कृपाचार्य हे महाभारताच्या काळात होते. त्यांनी कौरवांच्या बाजूने पांडवाविरुद्ध युद्ध लढलं. त्यांनाही चिरंजीवी असल्याचं वरदान प्राप्त होतं. ते अजून या पृथ्वीवर जिवंत आहेत.
ते हे आहेत ते सात चिरंजीवी 7 Chiranjeevi In Kaliyug जे अजूनही या पृथ्वीवर जिवंत आहेत. कलियुगाच्या अंतापर्यंत ते पृथ्वीवर राहतील. असं म्हटलं जातं की, जेव्हा भगवान विष्णू त्यांच्या कल्की अवतार पृथ्वीवर जन्माला येतील आणि कली दानवाविरुद्ध युद्ध लढतील. तेव्हा हे 7 Chiranjeevi In Kaliyug त्यांच्याबरोबर युद्धात सामील होतील आणि कलीदानाचा नाश करतील. त्यानंतर कलियुग संपेल आणि पृथ्वीवर पुन्हा एकदा सतयुगाला सुरुवात होईल.
तर तुम्हाला माहिती होती का, ही सात चिरंजीवींची 7 Chiranjeevi In Kaliyug कथा ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या इतर कथाही नक्कीचं पहा. अशाच पौराणिक कथांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद !