24 Carrot Gold Vs 22 Carrot Gold आपल्या देशातील लोकांना सोनं किती आवडतं, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. मग एखादा सण असो, लग्न असो किंवा नसो ज्याच्याकडे पैसा असतो, तो सोनं खरेदी करतो. सोन्यात गुंतवणूकसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते.
24 Carrot Gold Vs 22 Carrot Gold
परंतु सोनं घेताना कोणतं सोनं घ्यायचं, हा प्रश्न आपल्यासमोर येतो. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट की आणखी कोणतं. मग तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, हे 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट नेमकं आहे तरी काय आणि सोनं यामध्ये कसं विभागलं जातं ?
कॅरेट ही सोन्याची शुद्धता मोजण्याचं मापक आहे. (24 Carrot Gold Vs 22 Carrot Gold) म्हणजेचं 24 कॅरेट सोनं हे सर्वात जास्त शुद्ध मानलं जातं. 99.9% इतकी त्याची शुद्धता असते. या सोन्यामध्ये इतर कोणताही धातू किंवा अशुद्धी नसते.
त्यामुळे जास्तीत जास्त लोक सोन्याचे दागिने घेताना 24 कॅरेट सोन्याचे दागिने घेतात. हे दागिने चांगले शुद्धतेचे असतात. त्यांना किंमतही जास्त असते. फक्त त्यात एकचं कमी असते, ते म्हणजे शुद्ध सोनं असल्यामुळे ते जास्त मजबूत नसतं आणि हे दागिने घडवणं काही सोपं काम नाहीये.
24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यामधील फरक
ही तर झाली 24 कॅरेट सोन्याची गोष्ट. आता इतर 22 किंवा 18 कॅरेट सोन्यामध्ये शुद्धता कमी असते. कारण त्यामध्ये सोन्या व्यतिरिक्त तांबे, चांदी असे धातू मिक्स केलेले असतात.
अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्याची मोठी संधी
हे धातू सोन्यामध्ये (24 Carrot Gold Vs 22 Carrot Gold) मिक्स करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या सोन्यापासून जे दागिने बनवले जातील, ते मजबूत असायला हवेत. परंतु हे धातू मिक्स केल्याने आणि शुद्धता कमी झाल्याने 22 कॅरेट किंवा इतर सोन्याची किंमत कमी होते.
आता प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार 24 कॅरेट किंवा 22 कॅरेटमध्ये सोन्याचे दागिने घडवू शकतो. ज्या लोकांना सोन्याच्या दागिने घडवायचे नाहीयेत, फक्त गुंतवणूक करायची आहे. त्यांच्यासाठी 24 कॅरेट सोनं अगदी योग्य आहे. परंतु ज्या लोकांना सोन्याचे दागिने घालून मिरवायचेत, त्यांच्यासाठी 22 किंवा 18 कॅरेटचे सोनं (24 Carrot Gold Vs 22 Carrot Gold) उपयोगी आहे.
तर तुम्हाला सोन्याच्या या कॅरेटमधला फरक माहित होता का ? नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !