पेट्रोल पंपावर जाताच 10000 रुपये दंड जर तुम्ही मोडला हा नियम

पेट्रोल पंपावर जाताच 10000 रुपये दंड

पेट्रोल पंपावर जाताच 10000 रुपये दंड. सध्या आपल्या देशामध्ये वाहतुकीचे नियम आणखीन कठोर करण्यात येत आहेत. जे वाहन मालक नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर दंड आकारला जातोय आणि आता जर तुमच्या गाडीचं पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणजेचं पीयूसी सर्टिफिकेट नसेल, तर तुम्हाला मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुणे येथे पेट्रोल पंपावर वाहतूक पोलिसांतर्फे कॅमेरे बसवण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे आणि या कॅमेर्‍यांचं काम असेल की, पेट्रोल पंपावर येणाऱ्या गाड्यांचा डेटा एकत्र करणं आणि त्यानंतर या गाड्यांकडे पीयूसी म्हणजेचं पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट आहे की नाही, ते चेक करणार. ज्या गाड्यांकडे हे सर्टिफिकेट नसेल आणि त्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असतील, त्यांच्यावर जवळपास 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.

पेट्रोल पंपावर जाताच 10000 रुपये दंड

सध्या सरकारचा कल वातावरणातील प्रदूषण कमी करण्याकडे आहे. सर्वात जास्त प्रदूषण होतं पेट्रोल आणि डिझेल वाहनांमधून. अनेक वाहनांचे मालक हे पीयूसी सर्टिफिकेट काढत नाहीत. अशा गाड्यांमधून खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं. त्यामुळेचं आता वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचं ठरवलंय.

15 वर्षापेक्षा जास्त जुन्या असलेल्या गाड्यांमधून प्रदूषणाचं प्रमाण जास्त असतं. अनेकवेळेस वाहन चालक गाड्यांचा मेंटेनन्स करत नाहीत. पियूसी सर्टिफिकेटही काढून घेत नाही. परंतु त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे, ते सर्रासपणे अशी वाहनं वापरत असतात.

पेट्रोल पंपावर जाताच 10000 रुपये दंड
पेट्रोल पंपावर जाताच 10000 रुपये दंड

सध्या तरी महाराष्ट्रातील पुणे शहरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा असे कॅमेरे बसवण्यात येतील आणि मग त्यानंतर संपूर्ण देशातचं ही योजना राबविण्यात येईल. म्हणजे सरकारने अशा वाहनांवर आणि वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उचलण्याचं ठरवलंय.

पेट्रोल पंपावर जाताच 10000 रुपये दंड
पेट्रोल पंपावर जाताच 10000 रुपये दंड

अनेक वेळेस रस्त्यावर वाहतूक पोलिसांना पाहून अशा गाड्यांचे मालक रस्ता बदलतात. परंतु पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी तर प्रत्येकाला जावंच लागतं आणि तिथेचं अशी यंत्रणा असेल, तर नियम न पाळणारे वाहनधारक वाचू शकणार नाही, एवढे मात्र नक्की.

Top 5 Selling SUV In India भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या SUV

तर तुम्हाला काय वाटते या नियमाबद्दल ? नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top