100 वर्षं जगायचंय मग आजचं या पाच सवयी जीवनशैलीत समाविष्ट करा

100 वर्षं जगायचंय

100 वर्षं जगायचंय जेव्हा आपण एखाद्या वडीलधाऱ्याचा आशीर्वाद घेतो, तेव्हा ते आपल्याला दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद देतात. 100 वर्षं जगण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु आजच्या जीवनशैलीमुळे 100 वर्ष काय 60-70 वर्ष जगणं सुद्धा जवळपास अशक्य झालंय.

परंतु आजही असे अनेक लोक आहेत, जे 100 वर्ष जगताय. जपान सारख्या देशात तर अनेक लोक 100 पेक्षा जास्त वर्ष जगतात. मग काय आहे त्यांचं दीर्घायुष्याचं सिक्रेट आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात असे कोणते बदल घडवून १०० वर्ष जगू शकता, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

How To Live For 100 Years
How To Live For 100 Years

100 वर्षं जगायचंय

100 वर्ष जगण्यासाठी तुम्हाला या पाच सवयी तुमच्या जीवनशैलीत आणाव्या लागतील, आपण त्या एकेक करून पाहूया.

1) सकाळी लवकर उठणे : आजकाल अनेक लोकांना रात्री उशिरापर्यंत जागण्याची आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते. पण ही सवय तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम करते. त्यामुळे जर तुम्हाला दीर्घायुषी व्हायचं असेल, शंभर वर्ष जगायचं असेल, तर सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.

2) कोवळ ऊन घ्या : आता सकाळी तर तुम्ही उठालं, पण सकाळी उठल्यावर काय करायचं ? तर सकाळी उठल्यावर सूर्याचा कोवळ ऊन घेणं तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

3) रोज सकाळी व्यायाम करा : 100 वर्षं जगायचंय दीर्घायुष्यासाठी सर्वात मोठा उपाय किंवा ट्रीक म्हणजे रोज व्यायाम करणे. व्यायाम केल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहील. रोगराई तुमच्यापासून दूर राहील आणि तुम्ही खूप मोठं आणि सुंदर आयुष्य जगू शकाल.

4) चांगल्या अन्नाचं सेवन : आज-काल लोकांना स्ट्रीट फूड आणि हॉटेलमध्ये जाऊन जेवायला खूप आवडतं. परंतु याचा दुष्परिणाम तुमच्या प्रकृतीवर आणि पुढे जाऊन आयुष्यावर होतोय. त्यामुळे शुद्ध आणि सात्विक जेवण जेवल्याने तुम्ही दीर्घायुषी बनू शकता.

5) 100 वर्षं जगायचंय अनेक वेळेस आपण बाहेर खायचं टाळतो. परंतु घरात अन्न बनवण्यासाठी जे तेल आपण वापरतो, ते केमिकल प्रोसेसने बनवलेलं असतं. त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल तुम्ही तुमच्या आहारात सामील करून घेऊ शकता. त्याचबरोबर सकाळी उठल्यावर लिंबू आणि मध गरम पाण्यातून पिल्याने शरीरातील अशुद्धी दूर होतात.

१२ वी नंतर करिअरची संधी

या सर्व सवयी तुमच्या आयुष्यात आणून तुम्ही नक्कीचं तुमचं आयुष्य वाढवू शकतात आणि शंभर वर्ष जगण्याचं उद्दिष्ट पूर्ण करू शकता.

तर तुम्हाला किती वर्ष जगायचंय, नक्कीचं कमेंट करुन सांगा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचं इतर लेखही नक्कीचं वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top