ॲपल टी पिण्याचे फायदे मित्रांनो आता छान पावसाळा सुरू होतोय. सगळीकडे जोरदार पाऊस होणार आणि वातावरणात आल्हाददायक गारवा पसरेल. इतकं सुंदर वातावरण पाहून प्रत्येकजण निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासाठी घाई करेल आणि त्यासोबतच पाऊस पडताना प्रत्येक घर चहा आणि भज्यांची पार्टीसुद्धा होणार. पावसाळ्यात चहा आणि भज्यांची पार्टी करण्याची मजा काही वेगळीच असते.
पण काही जणांना चहा प्यायला आवडत नाही किंवा आरोग्याच्या काही तक्रारींमुळे चहा सोडून ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी असे वेगळे प्रकारचे चहा घेत असतात. आज आम्ही तुम्हाला चहा आणि दुसऱ्या चहांसाठी एक खूपच उत्तम आणि हेल्दी पर्याय सांगणार आहोत. तो म्हणजे ॲपल टी.
ॲपल टी पिण्याचे फायदे
ॲपल टी म्हणजे सफरचंदापासून बनवलेला चहा.
असं म्हणतात तुम्ही रोज एक सफरचंद खाल्लं तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही आणि तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही.
सफरचंद ॲपल टी पिण्याचे फायदे हे आपल्या तब्येतीसाठी खूपच उत्तम असते तसंच सफरचंदपासून बनवलेला ॲपल टीसुद्धा तब्येतीसाठी अत्यंत फायदेशीर असतो. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते.
ॲपल टी कसा बनवायचा ?
आज आम्ही तुम्हाला ॲपल टी कसा बनवायचा तेसुद्धा शिकवू :
ॲपल टी बनवायला खूपच सोपी असते तुम्ही सहज बनवू शकता.
ॲपल टी किसलेलं सफरचंद आणि लिंबाच्या रसापासून बनते.
1. ॲपल टी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यात आवश्यक तेवढे पाणी घ्या आणि ते पाणी गरम करा.
2. हे पाणी उकळले की त्यात किसलेलं सफरचंद, लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे साखर मिसळा किंवा तुम्ही साखरेऐवजी मधसुद्धा टाकू शकता.
3. ॲपल टी पिण्याचे फायदे यानंतर चहा काही मिनिटे उकळवा आणि यामध्ये दोन ग्रीन टी बॅग टाका.
4. ग्रीन टी बॅग चहामध्ये पाच मिनिटे ठेवा आणि त्यानंतर चहा गाळून घ्या.
हा शेतकरी लाल केळी पिकवून कमावतोय लाखों रुपये
तुमची सहज सोपी ॲपल टी तयार आहे. तुम्ही स्नॅक्ससोबत ॲपल टी घेऊ शकता.
तुम्हाला जर नेहमीचा चहा किंवा ग्रीन टी घेऊन बोअर झाला असाल तर ॲपल टी खूपच नवीन आणि टेस्टी ऑप्शन ठरेल त्यामुळे एकदा ॲपल टीचा आस्वाद नक्की घेऊन पहा.
मित्रांनो तुम्हाला हा आर्टिकल आवडला असेल तर आमचे दुसरे आर्टिकलसुद्धा नक्की वाचा.
खूप खूप धन्यवाद !