हसताय ना हसायलाच पाहिजे मधील ही अभिनेत्री लग्नाची बेडी मालिकेतील अभिनेत्याची पत्नी 

हसताय ना हसायलाच पाहिजे

हसताय ना हसायलाच पाहिजे हा नवाकोरा कॉमेडी शो नुकताच कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालाय. डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण, सुपर्णा श्याम हे सर्व कलाकार या शोमध्ये दिसत आहेत. या कलाकारांमध्ये अनेक जुने कलाकारही आहेत आणि एक नवीन चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

ती कलाकार आहे अभिनेत्री सुपर्णा श्याम. तिने बराच काळ अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला होता पण आता ती या शोमधून पुन्हा एकदा परतली आहे.

हसताय ना हसायलाचं पाहिजे
हसताय ना हसायलाचं पाहिजे

हसताय ना हसायलाच पाहिजे 

ही अभिनेत्री सुपर्णा श्याम ‘लग्नाची बेडी‘ मालिकेतील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठकची पत्नी आहे. अभिनेता संकेत पाठक ‘लग्नाची बेडी’ मालिकेत राघव रत्नपारखीची भूमिका साकारतोय. संकेत आणि सुपर्णा या दोघांचं लग्न मागच्यावर्षी खूप धुमधडाक्यात झालं होतं. या दोघांच्या लग्नात अभिनेत्री निवेदिता सराफ उपस्थित होत्या. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

Shyam Pathak Wife
Shyam Pathak Wife

संकेत आणि सुपर्णाची पहिली भेट ही दुहेरी मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यांची एकमेकांशी चांगली ओळख झाली. मग हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. याशिवाय त्यांनी छत्रीवाली या मालिकेतही काम केलं होतं. मागील सहा वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Actor Sanket Pathak Wife Suparna Shyam  

संकेत आणि सुपर्णाची जोडी खूपच छान आहे. अनेकदा ते दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. फॅन्सना त्यांच्या जोडीचे फोटो खूप आवडतात. हे दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताय. आता सुपर्णा ब्रेकनंतर ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोमध्ये पुन्हा एकदा दिसतेय. प्रेक्षकांना तिचा अभिनय कसा वाटतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा. 

तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top