स्टार प्रवाहवर नवी मालिका टीव्ही मालिका हे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतात. चाहते हे आपल्या आवडत्या मालिकेसोबत आणि त्यातील कलाकारांशी मनाने जोडले जातात. मालिकेतील पात्रं ही तर आपल्या घरातील सदस्यच होऊन जातात. रोजच्या रोज या मालिकेचे नवीन भाग पाहिल्याशिवाय आपला दिवस संपत नाही.
पण या मालिका जेव्हा कधी प्रेक्षकांचा निरोप घेतात तेव्हा मात्र प्रेक्षकांना खूप वाईट वाटतं. हेच तर त्यांचं प्रेम मालिकेतील कलाकारांना हवं असतं ज्यामुळे ते पुन्हा पुन्हा नव्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.
स्टार प्रवाहवर नवी मालिका
आता लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर एक लोकप्रिय अभिनेत्री पुनरागमन करणार आहे. याबद्दल स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तीन पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत. पण ही अभिनेत्री नक्की कोण हे अजून सांगण्यात आलेलं नाही.
एका पोस्टमध्ये ‘ती परत येतेय‘ प्रोमो बघायला विसरू नका, गुरुवार 9 मे, 7 AM असं लिहण्यात आलंय. या पोस्टनंतर चाहत्यांनी कोणती अभिनेत्री परत येतेय त्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली.
प्रसिद्ध अभिनेत्री स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत
तर दुसऱ्या पोस्टमध्ये, तुमची लाडकी अभिनेत्री तुम्हाला भेटायला खूप उत्सुक आहे. तुम्ही ही उत्सुक आहात ना ? प्रोमो बघायला विसरू नका. गुरुवार 9 मे, 7 AM असं लिहलंय.
या पोस्टनंतर तर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच जास्त वाढलीय. यातच आता स्टार प्रवाहने तिसरी पोस्टसुद्धा शेअर केलीय.
त्यात लिहलंय की, स्टार प्रवाहवर नवी मालिका मालिकेचा प्रोमो येतोय फक्त 24 तास बाकी. गुरुवार 9 मे, 7 AM.
आता यावरून स्पष्ट झालंय की स्टार प्रवाहवर लवकरच एक नवीन मालिका सुरू होतेय आणि या मालिकेचा प्रोमो 9 मेला सकाळी 7 वाजता दाखवला जाणार आहे. या मालिकेतून एक लोकप्रिय अभिनेत्री पुनरागमन करतेय.
सुबोध भावेने 33 वर्षांपूर्वी बायकोला केलं होतं प्रपोज
आता ही अभिनेत्री नक्की कोण असू शकते याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स करत आपला अंदाज लावायला सुरुवात केलीय.
काहींना वाटतंय सर्वांची फेव्हरेट अभिनेत्री हृता दुर्गुळे टीव्हीवर परत येतेय. तर काहीजण ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर कमबॅक करणार असं म्हणताय. यासोबतच अभिनेत्री मृणाल दुसानिस, अभिनेत्री शिवानी सुर्वे पुनरागमन करणार असाही अंदाज लावला जातोय. ‘कुण्या राजाची तू गं राणी’ परत येणार असंही बोललं जातंय.
पण या स्टार प्रवाहवर नवी मालिका मालिकेतून नेमकी कोणती अभिनेत्री पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे तर सर्वांना 9 मेला सकाळी 7 वाजताच कळेल. प्रेक्षक या नवीन प्रोमोची खूपच आतुरतेने वाट पाहताय.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !