सोनी मराठीवर प्रेक्षक भडकले. आजकाल तुम्ही जे मराठी चॅनल पहाल त्यावर काही नवीन मालिका सुरू होण्याची घोषणा करण्यात आलीय. तर काही जुन्या मालिका बंद होणार असल्याचीही बातमी येतेय. दुसऱ्या चॅनलप्रमाणे सोनी मराठी चॅनलवरही नवीन मालिका सुरू होणार आहेत.
काही दिवसांपूर्वी चॅनलवर ‘जय जय शनिदेव’ ही मालिका सुरू झाली. आता येत्या 10 जूनपासून ‘भूमीकन्या साद घालते निसर्गराजा’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. यात अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यानंतर लवकरच अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनारची ‘तू भेटशी नव्याने‘ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोनी मराठीवर प्रेक्षक भडकले
या नवीन मालिका सुरू होणार आहेत तर काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. आता एक लोकप्रिय मालिका वर्षभराच्या आत बंद होणार असल्याची माहिती समोर आलीय त्यामुळे सोनी मराठीवर प्रेक्षक भडकले.
सोनी मराठीवरील ‘राणी मी होणार‘ ही मालिका लवकरच बंद होणार आहे. ही मालिका मागील वर्षी 21 ऑगस्ट 2023 पासून सुरू होती. या मालिकेत मल्हार आणि मीराची प्रेमकहाणी दाखवण्यात आलीय. अभिनेता सिद्धार्थ खिरीड आणि अभिनेत्री संचिता कुलकर्णी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यासोबत पूर्णिमा तळवळकर, संजय कुलकर्णी, स्वाती देवल, उषा नाईक हे कलाकारही दिसत आहेत. सिद्धार्थ आणि संचिताची जोडीसुद्धा प्रेक्षकांना फार आवडत होती.
Sony Marathi Popular Serial To Go Off Air
पण ही मालिका लवकरच बंद होणार असल्याचं समोर आलं आहे. येत्या 8 जूनला या मालिकेचा शेवटचा भाग दाखवला जाणार आहे अशी माहिती समोर आलीय. ही मालिका बंद होण्यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही पण मालिकेला मिळत असलेली कमी टीआरपी हे कारण असू शकतं. सोनी मराठी चॅनलकडून लवकरच याबद्दल अधिकृत घोषणासुद्धा करण्यात येईल.
आता ‘राणी मी होणार’ ही मालिका बंद होणार असल्यामुळे या मालिकेचे फॅन्स खूपच नाराज होतील. खूप लवकर ही मालिका आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पण सोनी मराठी चॅनलवर सुरू होणाऱ्या नवीन मालिका नक्कीच आपलं भरपूर मनोरंजन करतील.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !