लक्ष्मी माता होईल तुमच्यावर प्रसन्न. आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास असावा, घरात पैशांची कोणतीही कमी नसावी. समृद्धी असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येकजण झगडत असतो, प्रयत्न करत असतो, कष्ट करत असतो.
अनेकदा कष्ट करूनसुद्धा, प्रयत्न करूनसुद्धा हे शक्य होत नाही. अशावेळेस मनात प्रश्न येतो की, मी तर इतके प्रयत्न करतोय, एवढे कष्ट करतोय. मग माता लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न का होत नाहीये ? मग अशा वेळेस काही वास्तुशास्त्राचे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील ही आर्थिक अडचण दूर करू शकता. तुमच्या घरातही माता लक्ष्मीचा नेहमी वास राहील, वरदहस्त राहील आणि घरात पैशांची कोणतीही कमी असणार नाही.
लक्ष्मी माता होईल तुमच्यावर प्रसन्न
मग कोणते आहे ते सोपे उपाय ? कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरावर, तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि घरात कोणत्याही वस्तूची कमी राहणार नाही, आज आपण त्याबद्दलचं जाणून घेऊया.
आपल्या भारतीय परंपरेमध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तुळशीचं रोप असणं खूपचं शुभ मानलं जातं. तुळशीला माता लक्ष्मीचचं एक रूप मानलं गेलंय आणि ज्या घरासमोर तुळशीचे रोप असतं, जेथे रोज तुळशीची पूजा केली जाते, तेथे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्या घरात कधीही पैशाची कमी राहत नाही.
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तुळशीचे रोप असण्याबरोबरचं स्वास्तिक चिन्ह असणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. स्वास्तिक चिन्हामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते. त्यामुळे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक चिन्ह असणं खूप शुभ मानलं जातं.
वजन कमी करण्यासाठी करा हे उपाय
हिंदू धर्मात दिवा लावणं हे शुभ मानलं जातं. त्यामुळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवा असणं चांगलंच. पण घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दिवा असल्यास तोही संध्याकाळच्या वेळेस प्रज्वलित केल्यास घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. असं म्हटलं जातं की, जेव्हा संध्याकाळची वेळ होते, तेव्हा लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करते. अशा वेळेस घराच्या बाहेर जर दिवा पेटलेला असेल, तर लक्ष्मी मातेचे स्वागत होतं आणि घरात लक्ष्मीचा वास होतो. त्या घरात कधीही अन्नधान्य आणि पैशांची कमी राहत नाही.
तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असावा यासाठी हे सगळे उपाय नक्कीचं करून पहा आणि अशाचं नवीन नवीन माहितीसाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
खूप खूप धन्यवाद !