विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर हा मागील अनेक वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवतोय. त्याच्या जबरदस्त कॉमेडीचे भरपूर फॅन्स आहेत. प्रसादने सादर केलेले सर्वच कॉमेडी स्कीट्स प्रेक्षकांना खूप आवडतात. हास्यजत्रेत त्याने साकारलेल्या ‘अवली लव्हली कोहली’ सारख्या अनेक व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा सोबतच त्याने चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. धर्मवीर, लोच्या झाला रे, एकदा येऊन तर बघा या चित्रपटात त्याने काम केलंय. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यानेच केलंय.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर वाढदिवस
नुकताच 5 मेला प्रसादचा वाढदिवस होऊन गेला. त्याने आपला हा वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रांसोबत आनंदात साजरा केला. वाढदिवसा निमित्त त्याने हास्यजत्रेच्या सेटवर सर्वांना पाणीपुरी पार्टी दिली होती. त्या पार्टीचे फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
आता प्रसादने आपल्या घरात साजरा केलेल्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत आणि त्यासोबतच वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यासाठी पोस्ट शेअर केलीय आणि हा वाढदिवस कसा साजरा केला तेसुद्धा सांगितलं.
प्रसादने या पोस्टमध्ये लिहलंय की,
नमस्कार
सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार 5 मे ला माझ्या वाढदिवसादिनी तुम्ही सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा मला पाठवल्या……..
योगायोगाने 5 मे हा जागतिक हास्यदिन म्हणून सुद्धा साजरा केला गेला … यामुळे आनंद द्विगुणित झाला …
तुम्ही भरभरून पाठवलेले केक्स आणि गिफ्ट्स आणि बुकेज शुभेच्छा सगळं व्यवस्थित पोहोचल
रात्री 12 वाजता केक कापून सुरू झालेला वाढदिवस …वाड्या काका च्या फोनपासून प्रवास करत हास्यजत्रा च्या सेट वर पाणीपुरी पार्टी करत आणि रात्री घरच्या सोबत डिनर आणि दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता परत केक कापून संपवला ….
…
वाढदिवसादिनी आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी काम करायला मला खुप आवडत सो यंदा ही 5 तारखेला महाराष्ट्राची हास्याजत्रा च शूट करत असल्यामुळे थोडा बिझी होता पण जमेल तेवढ प्रत्येकाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न केला …. ज्यांना केला नसेल त्याचे आभार मानतो… आणि एकच प्रार्थना करेन असाच आशीर्वाद आणि प्रेम ठेवा ….
तुमचं हे प्रेम आणि शुभेच्छा प्रचंड ऊर्जा, समाधान आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे
Plz keep blessing देव सगळ्यांना खुश ठेवो.
गौरव मोरेने सोडली महाराष्ट्राची हास्यजत्रा
या शब्दांत प्रसादने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रसादच्या या पोस्टवर कमेंट्स करत त्याच्या फॅन्सनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मनोरंजनविश्वातील अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की फॉलो करा.
तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद !