या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी पडला दरोडा, 10 तोळे सोनं झालं लंपास

मराठी अभिनेत्रीच्या घरी पडला दरोडा

मराठी अभिनेत्रीच्या घरी पडला दरोडा. मनोरंजन विश्वातून एक खूपचं धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे हिच्या राहत्या घरावर दरोडा पडला आहे. स्वतः अभिनेत्री श्वेता शिंदेने याबद्दल माहिती दिलीये. तिने सांगितलं की, ती तिच्या कुटुंबाबरोबर साताऱ्यातील पिरवाडी या गावात राहते आणि तिच्या याच घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकत मोठी चोरी केली.

परंतु सुदैवाने यावेळेस तिच्या घरात कुणीही नव्हतं. तिच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती उपस्थित नव्हती. म्हणून तिने देवाचे आभार मानले आहेत. श्वेता शिंदेने पुढे सांगितलं की, तिच्या घरातील दहा तोळे सोनं चोरीला गेलंय. आणखीन काय काय चोरीला गेलंय, याबद्दल ती पाठपुरावा करत आहे.

मराठी अभिनेत्रीच्या घरी पडला दरोडा
मराठी अभिनेत्रीच्या घरी पडला दरोडा

मराठी अभिनेत्रीच्या घरी पडला दरोडा

श्वेता शिंदेने याबद्दल पोलीस तक्रार केलीये. लवकरचं आपली सक्षम पोलीस यंत्रणा या चोरीचा सुगावा लावेल, अशी तिला आशा आहे. श्वेता शिंदेने ही माहिती दिल्यानंतर सगळीकडे खळबळ माजली आहे. परंतु आता पोलीस या चोरीचा पाठपुरावा करत आहे, लवकरचं ते चोरांना शोधून काढतील, अशी सर्वांना आशा वाटतेय.

श्वेता शिंदे ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. मागील काही वर्षात तिने मराठी मालिका निर्मिती क्षेत्रातही चांगला जम बसवला आहे. लागिरं झालं जी या मालिकेतून तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. ही मालिका चांगलीच गाजली आणि त्यानंतर तिने पुन्हा कधीही मागे वळून पाहिलं नाही.

मराठी अभिनेत्रीच्या घरी पडला दरोडा
मराठी अभिनेत्रीच्या घरी पडला दरोडा

सध्या ती झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेची निर्मिती करतेय. त्याचबरोबर लवकरचं तिची लाखात एक आमचा दादा ही मालिका सुद्धा येणार आहे. या मालिकेतून प्रसिद्ध अभिनेता नितीश चव्हाण टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय.

लाखात एक आमचा दादा
लाखात एक आमचा दादा

श्री स्वामी समर्थ मराठी गोष्ट

एकीकडे करिअरमध्ये श्वेता शिंदे यशस्वी होत असताना, तिच्याबद्दल अशी धक्कादायक बातमी समोर आल्यामुळे सगळ्यांना खूप काळजी वाटत आहे. पोलीस लवकरचं या प्रकरणाचा शोध घेतील, अशी सर्वांना अपेक्षा आहे.

मनोरंजन विश्वाशी निगडित अशाचं नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखन नक्कीच वाचा.

खूप खूप धन्यवाद !

Scroll to Top